पोवाड्या संबंधी थोडेसे –
मराठीतील अनेक वाङ्मयीन प्रकारातील एक लेखन प्रकार. सर्वसाधारणपणे ऐतिहासिकदृष्ट्या ज्यांनी कर्तृत्व गाजवलेले असते अशांची गाथा यात वर्णिलेली असते. शूर, वीर रस प्रधान असा हा गद्य आणि पद्य या दोन्हींचे मिश्रण असलेला प्रकार. हा केवळ वाचण्याचा विषय नसतो तर सादरीकरणातून तो जास्त प्रभावी होतो. पोवाडा सादर करणारे शाहीर रामजोशी, शाहीर साबळे ही नावे आपल्या परिचयाची असतील. आमच्या वर्गातील एका सहाध्यायीने श्रीमद्भगवद्गीतेवर पोवाडा रचला आहे तो आपणा सर्वांसाठी सादर. आधी शब्दांद्वारे आनंद घ्या. मग आम्ही वर्गभगिनींनी सादर केलेला पहा.
मराठीतील अनेक वाङ्मयीन प्रकारातील एक लेखन प्रकार. सर्वसाधारणपणे ऐतिहासिकदृष्ट्या ज्यांनी कर्तृत्व गाजवलेले असते अशांची गाथा यात वर्णिलेली असते. शूर, वीर रस प्रधान असा हा गद्य आणि पद्य या दोन्हींचे मिश्रण असलेला प्रकार. हा केवळ वाचण्याचा विषय नसतो तर सादरीकरणातून तो जास्त प्रभावी होतो. पोवाडा सादर करणारे शाहीर रामजोशी, शाहीर साबळे ही नावे आपल्या परिचयाची असतील. आमच्या वर्गातील एका सहाध्यायीने श्रीमद्भगवद्गीतेवर पोवाडा रचला आहे तो आपणा सर्वांसाठी सादर. आधी शब्दांद्वारे आनंद घ्या. मग आम्ही वर्गभगिनींनी सादर केलेला पहा.
प्रारंभी नमन कृष्णाला ऽऽ हो ऽऽ
प्रारंभी नमन कृष्णाला, नमन अर्जुनाला, नमन हो व्यास महर्षींना
भगवद्गीतेचे गाऊ या गान हो ऽऽ जी जी जी जी जी ॥ध्रु.॥
वासुदेव संथा वर्ग अमुचा, घेई वसा गीता पाठाचा
सांगतो शाश्वत मार्ग सुखाचा हो ऽऽ जी जी जी जी जी
गद्य – कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांच न भूतो न भविष्यति असे युद्ध सुरू होणार होते. शंखांच्या आणि रणवाद्यांच्या आवाजाने , शत्रूवर आक्रमण करण्यासाठी वीरांचे रक्त सळसळू लागले आणि आता युद्धाला सुरुवात होणार इतक्यात –
बोलिला अर्जुन हो कृष्णाला, रथ माझा नेई मध्याला, पाहतो दोन्ही बाजू सैन्याला.
कोण वीर सज्ज लढण्यास हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
कृष्णाने रथ हाकिला, सैन्याच्या मधोमध नेला
कुरुवंश सारा पाहण्याला, उतावीळ पार्थ कि हो झाला.
गद्य – आणि काय आश्चर्य!
आपले गुरू बंधू पाहून, कासावीस झाला अर्जुन,
पडला हो घशाला शोष, गेली गात्रे सारी ढेपाळून,
थरथरा कापे हात पाय, दिले धनुष्यबाण टाकून.
झाला भ्रमिष्ट की पार्थ हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
गद्य – कृष्णाकडे केविलवाण्या नजरेने बघत, डोळ्यातून पाणी गाळीत अर्जुन म्हणाला, क़ृष्णा! केशवा!!
हे सारे माझे जीवलग, याना मारू कसे मी सांगॽ
गुरूहत्या घोर पातक, जातील पिढ्या नरकांत.
होईन मी कुलनाशक, काय करू होऊन शासकॽ
नाही लढणार मी आता ठाम हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
त्याची ही अवस्था पाहून, कृष्ण हसून म्हणाला, अर्जुना!
अरे, भ्याड की तू नामर्दॽ क्षत्रियांस नाही शोभत.
युद्धाहून अधिक श्रेयस, मार्ग नाही तुला रे अन्य!
तू निभाव तुझा रे धर्म हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
गद्य – हे ऐकून अर्जुनाला कोड पडलं. काय कराव हे कळेना.
व्याकूळ होऊन भरल्या कंठाने कृष्णाला म्हणाला,
मी आलो तुला रे शरण, कसे चुकतील जन्म न मरणॽ
सन्न्यास श्रेष्ठ की कर्म ॽ मज काही कळेना धर्म.
तूच देई मजला ज्ञान हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
मग काय म्हणे भगवंत, कशी घातली त्याने समजूतॽ
त्याच्या वाणीचे अमृत, घ्या पिऊनी व्हाल तुम्ही तृप्त.
धन्य होती करिती रसपान हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
गद्य – प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून प्रकटलेली, कोटी कोटी सूर्यांच्या प्रकाश तेजापेक्षाही प्रखर, ज्ञानाच तेज असलेली ही गीता
माऊली आपल्याला काय सांगतेॽ
सांगे देह असे नश्वर, अन् आत्मा राही निरंतर.
प्रकृतीच दाविते रंग, रजो-तमाचा होता संग.
हे जीवाशिवाचे ज्ञान, अति गुह्य आज तू जाण.
मन स्थीर करुनि माझ्यात हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
गीता सांगे धर्म, कर्म, मोक्ष, कसा साधावा परमोच्च.
व्यवहारी असे जो कुशल, चुकवी कर्माचे बंध.
तरी राखावा समभाव, घेऊनि मनाचा ठाव.
हे युद्ध नसे हा यज्ञ, तू ऊठ, आता हो सज्ज
तोडूनि कर्माचे पाश हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
गद्य – भगवंताची वाणी अर्जुनाच्या दुभंगलेल्या मनाला पुनरुज्जीवन देणारी ठरली.
जो बोध अर्जुनाला केला, तोच साह्य करी अपुल्याला
बळ देई नित्य झुंजण्याला, नेई त्वरित तरुन भक्ताला.
गद्य – त्यासाठी काय करावॽ
तुम्ही घ्या हो गीतेची संथा, जी नेई भक्तीच्या पंथा.
करी सार्थक जीवनगाथा, इथे टेकवील जो माथा.
जो कोणी शरण भगवंता हो ऽऽ जी जी जी जी जी ॥
पोवाडा शाहीर
सौ. संगीता मिलींद पळशीकर
पुणे
Thank you for sharing your enlightening content on Antarang. This blog belongs to all of us and is a platform to share, express views, opinions and ideas. Please continue to share more such articles. Let's make it live experience for all.
ReplyDeleteThanking you,
Antarang team