Tuesday 1 September 2020

कल्याणी

आज आमच्या एकुलत्या एका कन्येचा वाढदिवस होता. जावयांसहा तिलाच घरी बोलावलं होतं. कल्याणीने अगदी फक्कड बेत केला होता. बिर्याणी, फ्लाॕवर रस्सा, टामॕटोचं सार,गुलाबजाम, पु-या, चटणी, कोशिंबीर, पापड....आणखी काय काय सांगू? तोंडाला नुसतं पाणी सुटलं होतं. पण मी सध्या डाएटवर होतो. त्यामुळे कल्याणीने माझ्यासाठी मात्र भाकृरी आणि पालेभाजी बनवली होती. आणि मोठे उपकार केल्यासारखा १ गुलाबजाम वाढला होता..

पण त्यामुळे माझं तोंड इतकं खवळलं होतं की मध्यरात्री आता कुणाचा पहारा नाही असं पाहून मांजरीच्या पावलांनी हळूच स्वयंपाकघरात गेलो. सुदैवाने सगळे पदार्थ उरले होते. पण सगळे फ्रीजमध्ये.. नाईलाजाने बिर्याणी, रस्सा यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पु-यांची एक चवड, चटणी आणि चांगले ५/६ गुलाबजाम पोटात गेल्यावर पोटोबा जरा तृप्त झाला. आणखी एखाददुसरा गुलाबजाम घ्यावा म्हणून जरा वळलो..  .तो दोन्ही हात कमरेवर ठेऊन रखमाईच्या थाटात उभी आसलेली कल्याणी मला दिसली. शरमिंदेपणाने हसत मी म्हणालो, " कल्लू, मी एखादा मोठा गुन्हा केलाय असं बघू नकोस ग प्लीज माझ्याकडे.. अग, भुकेने पोटात गुरगुर आवाज होत होता ग! म्हणून.."
तिची नजर टाळून मी पुन्हा म्हणालो, "अग, हो! कबूल आहे मला! मागच्या महिन्यात माझ्या छातीतून कळा येऊ लागल्या तेव्हा मीही घाबरलो होतो. डाॕ. श्रीखंड्यांनी ३०/४०पौंड वजन कमी करायला सांगितलंय मला... पण मला ही उपासमार नाही सहन होत ग! भूक लागते मला एकसारखी.. असं उपासाने मरण्यापेक्षा मी चक्क हार्टफेलनी मेलो तरी परवडेल!" आसं म्हणून मी जिभ चावली. मरणाचं नाव काढलं तर कल्याणीच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतील म्हणून धास्तीने मी तिच्याकडे पाहू लागलो. वजनामुळे मला आधूनमधून धाप लागत होती. हाय ब्लडप्रेशरचा नविनच त्रास सुरू झाला होता. हे सगळं खरं असलं तरी त्याचा एवढा बाऊ करण्याचं काही कारण नव्हतं. मी काही इतक्यात मरत नाही असं मला वाटत होतं. पण नेमकं याच्या उलट तिला वाटत होतं. आता ती चिडेल, रागवेल, रडेल माझी चांगली खरडपट्टी काढेल असं मला वाटलं.. पण तसं काहीच घडलं नाही. " चाला, झोपा आता.. रात्र खूप झाली आहे .. असं म्हणून ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली.. आणि माझ्या अंगावर हात टाकून शांत झोपी गेली. 

दुस-या दिवसापासून तिने माझे सगळे डाएट बंद करून टाकले आणि मला म्हणाली, "आजपासून परत पहिल्यासारखं.. तुम्हाला जे हवं ते जितक्या वेळा हवं तितक्या वेळा खा. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. अगदी मालासुद्धा त्यात एका मर्यादेपलिकडे लुडबूड करण्याचा अधिकार नाही. तुमचं सगळं डाएट सांभाळताना मला नाही का त्रास होत? तुम्हाला सगळं सांगून समजावून झालं आहे. तुमच्यासाठी त्रास घ्यायलाही तयार आहे. यापुढे मी बापडी अधिक काय करणार?जाणत्या मनुष्यास दारूड्याची कितीही कणव आली तरी त्याचा काय उपयोग?"... "ए, हे बरोबर नाही हं! माझ्या खाण्याची तुलना दारूड्याशी करतेस तू?" मी एकदम उसळून म्हणालो. तसं ती शांतपणे म्हणाली, " दारूच्या व्यसनासारखंच हे अती खाण्याचं व्यसनच आहे. आणि तेही तितकंच घातक आहे.. जाऊ दे! मी आता हट्ट सोडलाय." असं म्हणून ती तिच्या कामाला निघून गेली. 
      
पण त्यादिवसापासून मी अगदी खूश होतो. माझ्या जिभेचे चोचले आगदी भरपूर पुरवून घेत होतो. त्या दिवसापासून कल्याणीही खूप बदलली होती. घरातील दिव्याचा फ्यूज गेला तेव्हा तो कसा लावायचा हे तिने माझ्याकडून शिकून घेतले. ड्रायव्हिंग शिकून घे शिकून घे असे मी तिच्या मागे लागायचो आणि ती दुर्लक्ष करायची.. पण आता स्वातःहूनमाझ्या मागे लागून तिने ड्रायव्हिंग शिकून घेतलं.. आधी टू व्हिलर.. मग फोर व्हिलर.. आपले फंड्स कसे किती आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सूक झाली. मी तिला सगळं समजावून सांगितलं. शेअर्स, विमा, ग्रॕच्युइटी, प्राॕव्हिडंट फंड्स, फिक्स डिपाॕझिट्स, बँकबॕलन्स याकडे तिने यापूर्वी कधीघ फारसं लक्ष दिलं नव्हतं.पण आता मात्र तिने सगळे छान समजावून घेतले. मला हा सुखद धक्काच होता. आज मला म्हणाली, " मी आता पुन्हा शिवणाचा क्लास जाॕईन करणार आहे. ब-याच दिवसात शिवणयंत्राला हात लागलेला नाही. धूळ खात पडलंय मशीन.. अजून अॕडव्हान्स काही शिकून घ्यायचं बळ माझ्यात आहे तंवर शिकून घेते." मी तिला नको नकोच म्हणत होतो.. पण क्लास जाॕईन केला. छान छान ड्रेसेस शिवू लागली, अलिकडे ती जरा माॕड झाली होती. फॕशनेबल ड्रेसेस घालू लागली होती. त्यामुळे मुळातच छान असणारी कल्याणी आता अधिक सुरेख दिसू लागली होती. मी ही सुखावतंच होतो. एके दिवशी तिने माझी परवानगी घेऊन जुनं खंडलेलं मंगळसूत्र नव्या फॕशनप्रमाणे घडवून घेतलं. पाहाणा-याला एखादी चेनच आहे असे वाटावे असे होते. अगदी खाली वाट्यांच्या पदकाजवळ उगीच थोडेसे काळे मणी होते. मला काही ते फारसे आवडले नाही. पण मी काही बोललो नाही. या दरम्यान माझे खाणे पिणे मात्र मी अगदी मनसोक्त मला हवे तसे करत होतो. चमचमीत पदार्थांवर ताव मारत होतो. दर २/३ तासांनी मला भूक लागत असे आणि खाल्ल्याशिवाय मला राहावत नसे. मला जे हवं ते कल्याणी मला करून देत होती. त्यामुळे मी जाम खूश होतो. 
     
एकदा कल्याणी घरात नसताना असंच मी भरपेट जेवल्यावर माझ्या पोटातून कळा येऊ लागल्या. पण मी फार घाबरलो नाही. जेल्यूसिलच्या गोळ्या चघळल्यावर मला बरे वाटले. इतक्यात माझा फोन वाजला. हिच्या क्लासच्या इनामदार बाईंचा फोन होता. " कल्याणी फडके आहेत का?" त्यांनी चौकशी केली. मी म्हटलं,"नाही.. त्या बाहेर गेल्या आहेत. " तेव्हा त्या म्हणाल्या," त्यांना एक निरोप सांगाल का?" " काय निरोप सांगायचाय?" "त्यांना सांगा की, परवाच्या परिक्षेत त्यांचा १ला नंबर आलाय. आणि एका मान्यवर कंपनीत त्यांना फॕशन डिझायनर म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता आहे. " " त्यांना नोकरी करायची आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला?" मी संतापून विचारलं .. तेव्हा त्या म्हणाल्या," अहो, आसं नाही.. नोकरीमुळे त्यांचा एकटेपणा कमी होईल. विडो असल्यामुळे सध्या त्या घरी एकट्याच असतात. त्यांना विरंगुळाही होईल आणि चार पैसेही मिळतील. नाही का?" "अहो, त्या विडो आहेत हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी त्यांचा नवराच बोलतोय" असं म्हणून मी रागाने फोन खाली आपटला. तिच्या यायचीच वाट बघू लागलो. इतक्यात ती अतिशय उत्साहाने आत येऊन सांगू लागली, " अहो, ऐकलंत का?अहो, माझा की नाही परिक्षेत पहिला नंबर आलाय.. चांगल्या जाॕबची आॕफरही आल्ये." इतक्यात मी तिच्यावर भडकलो. " हो. फोन आला होता त्यांचा. तू विडो आहेस असा समज आहे त्यांचा. या या असल्या मंगळसूत्रामुळेच त्यांचा असा समज झाला असणार! विडो व्हायची इतकीच हौस असली तर होईल तसंच!" असं म्हणून मी रागारागाने घराबाहेर पडलो. चांगलीच भूक लागली होती मला. कोप-यावरच्या कॕफेत जाऊन कोल्ड काॕफी आणि २/४ डोनट हाणूयात.. असा विचार करून कॕफेकडे जाऊ लागलो. इतक्यात मला तिचे शब्द आठवले.. अती खाणे हे दारूच्या व्यसनासारखे व्यसनच आहे. आत्ता तासाभरापूर्वी खाल्लेल आसताना पुन्हा कशी भूक लागली? मनात असा विचार येताच मी चरकलोच.. खरंच हा सवयीचा करिणाम असेल का? हे व्यसनच असेल का? आपल्या चुकीच्यासवयीमुळे खरंच आपल्याला मरण आलं तर...आपल्याला मरण येईल यापेक्षा कल्याणी विधवा होईल आपल्यामुळे! मी धावतच परत निघालो. घरी येऊन बघतो तो कल्याणी तिथेच खुर्चीवर तशीच बसून होती. रडूनरडून तिचे डोळे सुजले होते. मी तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन म्हणालो,"मी मूर्ख आहे ! बेअक्कल आहे! मला क्षमा कर. माझी चूक माला कळली आहे. मला माझे खाणे कमी करायचे आहे. कृपा करून मला मदत कर." मग काय?ती मला याबाबतीत मदत करायला तत्परच होती. माझे डाएटिंग पुन्हा सुरू झाले. आता मी मनावर घेतले होते. आणि कल्याणी माझ्या पाठिशी होती. अगदी मध्यरात्रीही मला भूक लागली तरी ती मला काहीतरी पथ्याचे करून खायला घालत होती. उत्कट प्रेमाचा हा साक्षात्कारच होता. हळूहळू माझी अती खाण्याची सवय सुटली आणि नवीन उत्साहात मी माझे जीवन व्यतित करू लागलो. 
      
आणि मग एके दिवशी ती मला म्हणाली, " तुम्हाला एकगुपित सांगू का? त्या दिवशी इनामदारबाईंनी फोन माझ्या सांगण्यावरूनच केला होता. मी प्रौढ कुमारिका आहे असे सांगायला सांगितले होते. पण त्यांनीच ही अधिक मात्रा दिली आणि ती बरोबर लागू पडली." मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती माझ्याकडे बघत मिष्कील हसत होती. तिची युक्ती सोळा आणे सफल झाली होती.
"कल्याणी! काय आहेस ग तू! तुझ्या कल्याणकारी शक्तीपुढे मी नतमस्तक आहे! भारावलो आहे !! निःशब्द आहे!!!"

Shital Joshi

शब्द

शब्द तर उसने आहेत, करतात बोलवत्याची चाकरी.

आज ह्या वहीत तर उद्या दुसऱ्याच्याच पानांवर, करतात बेलगाम बेफिकीर मुशाफिरी.

शब्द होतात कधीकधी मिंधे, बांधतात स्वतःच्याच पापांचे बुधले.

मग अचानक घुमजाव करून, पुनः सफरीवर जायला मोकळे.

K. Vrishali

Own your smile

Own your smile  


I have this simple question for you. Do you own your smile? Or does someone else have a control over it? Some of you may find my question funny, weird or a little stupid even. So let me first tell you about a little incident, that happened nearly ten years ago. In those days, we weren’t living here in this big city, we were staying at a relatively small place, where everybody knew everybody. It was one fine winter morning and I was taking my regular morning walk. Since childhood I have this habit of flashing a smile at unknown people, if they look agreeable to me. So when I saw this respectable lady of my own age coming from the opposite side, I smiled brightly at her. In my experience normally people would smile back and go about their business. This lady in question however stopped in her tracks, quite unsure how to respond to my unsolicited beaming smile and asked me a little awkwardly, “Do I know you? Have we met earlier?” I said, “No, why do you ask?” She said, “You smiled at me...so I thought, may be..” Her face still looked pretty confused. I said, “Oh that! You see, I smile at everybody. That’s my habit!” She seemed a little amused as her perfectly plucked eyebrows raised, a small smile curving her mouth. She nevertheless asked me my name, told me hers and we did some small talk. Since then we began smiling at each other and exchanging hellos regularly. But her question lingered in my mind for a long time. If I didn’t know her, if we two hadn’t met earlier, was it any of my business to smile at her in the first place? Let’s assume a different scenario, where you see some person on the road coming from the opposite direction. You are quite sure, you know this person from somewhere but can’t attach a name to that face , cannot even figure out, where actually you both could have met. So naturally you are a little hesitant to smile first for fear of embarrassment. You are afraid that they won’t smile back and you would be left standing there, feeling like a complete fool. So you don’t smile, the other person also doesn’t smile and life continues as usual. So basically, in order to avoid this perceived embarrassment, you decide, not to smile first. You would just look in their direction, see if they take the first step, see if they smile first. If they do, you would happily oblige, won’t you? But suppose, if you smile at them and they don’t smile back....So what? Is that such a dreadful thing? Why should it bother you so much? Does that hurt your ego badly ? I say, it should not. It only proves, that you have a better memory than them. It proves, that they don’t have the decency to return your smile. They may not be as genteel as you, or they may be even a bit impertinent. It’s their fault , and certainly not yours.So you mustn’t feel the need for these self imposed restrictions on your smile. I, for one, do not let any other person’s behavior or attitude dictate my own smile. It’s after all my smile, so I should be the one to exercise control over it. I should decide, when to smile or at whom. This attitude gives me a kind of super power and a confidence while going about in my daily interactions and moving in all kinds of social circles. In my seminars on public speaking and communication skills, I always ask my audience to make a habit of practicing their smile at home in front of the mirror. Believe me - to smile confidently is an art, that can be perfected with practice. We must all remember, no one can take away the smile on our face without our permission. I urge you to ask yourself this question, “Am I always the one to smile first in a chance encounter with a stranger?”



 


Written By : Mrs Leena Sohoni 

कृष्ण...एक अनुपम बालरूप

 कृष्ण...एक अनुपम बालरूप,

आकृती काळी, तेजोमय स्वरूप!
कृष्ण...गोकुळातील विस्मयकारी बाललीला,
मानव, पशु-पक्षी, वृक्ष-वेली-पर्वत साऱ्यांचा सहजीवी आनंदमेळा!
कृष्ण...एक अलौकिक अद्वैत,
कृष्णाआधी राधेचे नाम, एक दैवी संकेत!
कृष्ण...एक जिवलग सखा,
सखी द्रौपदीचा अविरत पाठीराखा!
कृष्ण...एक विलक्षण प्रेमरोगी,
सुदामा, विदुराच्या निरपेक्ष, निरलस प्रेमाचा अनुरागी!
कृष्ण...आजन्म रिपुदमन,
कंस, चाणूर, शिशुपालादी खलांचे निर्दालन!
कृष्ण...एक धूर्त राजकारणी,
जरासंध अन जयद्रथाची कपटाने उलथवली करणी!
कृष्ण...एक प्रेमळ,चतुर पती,
मत्सरी सत्यभामेच्या कलाने घेत रुक्मिणीवर उधळी प्रीती!
कृष्ण...असामान्य स्त्री-दाक्षिण्य,
जरासंधाच्या बंधनातून सोडवलेल्या सोळा हजार भविष्यहीन नारींना पत्नीपदाने केले धन्य!
कृष्ण...पांडवांचे सर्वस्व,
निःशस्त्र सारथ्य करूनही, पांडवांकरवी प्रस्थापित करवले, अधर्मावर धर्माचे वर्चस्व!
कृष्ण...एक असामान्य कर्मयोगी,
सारी इतिकर्तव्ये यथासांग पार पाडतानाही निर्लेप अन वैरागी!
कृष्ण...एक युगंधर,
अर्जुन निमित्तमात्र, वैश्विक पातळीवर जीवनाचे सार सांगणारी भगवदगीता, एक तत्वज्ञान, अजरामर!!!

आकांक्षा

पर्यटन व्यवसायातील अध्वर्यु...! (भाग १)

 शीला आणि शरद किराणे...

पर्यटन व्यवसायातील अध्वर्यु...! (भाग १)

किराणे मूळचे सोलापूर जवळच्या खेड्यातले. पांच बहिणी , दोघे भाऊ आणि आईवडील मिळून चरितार्थासाठी १९५० मध्ये पुण्यात आले. धाकटा शरद स्टॅंडर्ड ऑइल मिल्सच्या ( HP ) पेट्रोल पंपावर कामाला लागला. ४- ५ वर्षात पंप बंद झाला ; पण धंद्यातल्या खाचाखोचा शिकायला मिळाल्या. मग यात्रा कंपनीमध्ये नोकरी धरली.
भावाचाही व्यवसाय करण्याचा विचार झाला , तेव्हा दोघांनी मिळून १९५७ मध्ये ' जयलक्ष्मी यात्रा कंपनी ' ची मुहूर्तमेढ रोवली.
काशीसी जावे... नित्य वदावे... ही त्याकाळच्या पर्यटन-सीमा! सगळ्या कंपन्याच्या त्रिस्थळी, बद्रिकेदार , काशी - रामेश्वर ह्यासारख्या तीर्थक्षेत्रांना सहली जात.
मुंबईत त्या काळात एकच गुजराथी कंपनी होती. जेवण हा कळीचा मुद्दा असायचा. प्रवासात शरदकाकांना लोक भेटत. " तुमच्याशी संपर्क साधणं कठीण पडतं , " असं म्हणत. मग १९६१ च्या पानशेतच्या पुरानंतर शरदकाकांनी गिरगावला ' जयलक्ष्मी ' ची शाखा काढली.

त्या काळच्या सहली रेल्वेच्या C.T.S. च्या बोगीने व्हायच्या. रेल्वेने बनवलेल्या या डब्यांमध्ये दोन मोठी कंपार्टमेंट्स असत. यात ४०/ ४० माणसांची सोय होत असे. मध्यभागी स्वयंपाकघर आणि एक ऑफिस आसायचं. चार टॉयलेट्स. त्यातील दोनाचं बाथरूम मध्ये परिवर्तन केलं जायचं. सोबत शिधा आणि आचारीही असायचा. ताज्या भाज्या, दूध-दही ह्याची शहरांतून आवक व्हायची. घडीच्या टेबलांवर चालू गाडीतसुद्धा जेवणं व्हायची ! पर्यटन स्थळी गेल्यावर हे रेल्वेचे डबे गाडीपासून वेगळे काढून सायडिंगला ठेवत. तिथे चुली घालून स्वयंपाक होई , प्लॕटफॉर्मवर पंगती बसत. त्या ठिकाणचे स्थलदर्शन झाल्यावर तो डबा पुढच्या रेल्वेला शंटिंग करून जोडला जाई. सगळे सणवार ह्या डब्यातंच पार पडत. वीस ते चाळीस दिवसांच्या सहली असायच्या. सगळ्यांचक एक कुटुंबच होऊन जायचं !

१९६१ ते ६७ पर्यंत सगळा भारत पालथा घालून झाला. लोकांचं काश्मिरचं वेड वाढू लागलं होतं. हा एकटा व्यवास्थापक मोठमोठ्या सहली नेऊन कुठल्याही गोंधळाशिवाय कसा परत येतो... म्हणून लोक स्टेशनवर शरदकाकांना बघायला , भेटायला येत !
१९६५-६६ च्या सुमारास अमरनाथच्या एका सहलीत त्यावेळी अभावानेच येणारा असा तरुण मंडळींचा ग्रुप आला होता. एका सुखवस्तू घरातील सावळी, स्मार्ट, उंच, तरतरीत, हसतमुख, बोलकी मुलगी आणि ह्या सहलीतील गोरागोमटा, उमदा, हसरा, माणूसवेडा, महत्वाकांक्षी तरुण मालक ह्यांच्यात प्रेमबंध जुळले ...आणि एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पदावर असणाऱ्या नेरुरकरांची मुलगी शरदकाकांच्या ह्या बेभरवशाच्या उद्योगात पदर खोचून कामाला लागली. ३० एप्रिल १९६७ ला तिचं लग्नं काकांबरोबरच कष्टांशीही झालं ! मे महिन्यातच दोघेही चाळीसजणांची काश्मीरची सहल घेऊन गेले; तोच त्यांचा मधुचंद्र ! १९६७ च्या अखेरीस यांच्या कंपनीचं नामकरण ' आराधना ट्रॕव्हल सर्व्हिसेस ,' असं झालं.
सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सवलती मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. मुंबईच्या पार्ल्यात ' दयाळाश्रम ' हे आराधनाचं आॉफिस आणि किराण्यांचं घरही झालं !
शीलाकाकू एकटीनेही सहली घेऊन जाऊ लागल्या. बाई व्यवस्थापक म्हटल्यावर लोक बिचकत. पण किराण्यांचा लौकिक तोवर सर्वदूर झाला होता. वागण्यात आपलेपणा , गप्पा आणि स्वादिष्ट जेवण यामुळे स्नेहबंध निर्माण होण्यास वेळ लागत नसे. जाहिरातीची गरजही पडत नसे.
५ मे १९७७ ' काश्मीर स्पेशल ट्रेन' नंतर ह्या जोडीने मागे वळून पहिलं नाही.
एकदाच सहलीबरोबर काश्मिरला जाऊन आल्यावर काश्मिरसहली आता शीलाकाकूच नेऊ लागल्या. काकांनी ग्रुप दिल्लीला नेऊन सोडायचा; सहल पूर्ण करून झालेला ग्रुप घेऊन शीलाकाकूंनीही दिल्लीला परतायचं. लोकांची आदलाबदल करून काकू पुन्हा काश्मिरला रवाना होत असत. असे तीन तीन महिनेही जात. आजच्यासारखी फोनची सोयही नव्हती तेव्हा !
सीझन तोंडावर आला की घरात गडबड उडायची. शिधा बांधून घ्यायचा म्हणजे मसाले , चटण्या , मुरांबे , लोणची ... शेव - चिवड्यांचे प्रकार , दिवाळीसाठी अनरश्यापासूनचे फराळाचे पदार्थ ... याची तयारी घरातच व्हायची.
शरदकाकांकडे ६० जणांचा एक खास मित्रांचा गट होता. वर्षांच्या प्रारंभी एखाद्या रविवारी सर्वजण किराण्यांच्या घरी जमत. जगाचा , भारताचा नकाशा आणि कॅलेंडर जवळ असे. या बैठकीतून नवनवीन सहली जन्म घेत. कोस्ट-टू-कोस्ट (मुंबई ते चेन्नई समुद्रकिनाऱ्याने २२ दिवस) हे एक उदाहरण ! १९७९ मध्ये श्रीलंका सहलींचा जन्म झाला. मुंबई - रामेश्वर रेल्वेने आणि त्यापुढे रामेश्वर - तलैमन्नार (श्रीलंका) बोटीने , असा प्रवास व्हायचा. १९८० मध्ये श्रीलंका आणि लक्षद्वीपही सुरू झालं.

१९८२ मध्ये अंदमान सहलींचा प्रारंभ झाला. आठवड्यातून एकदाच विमान जायचे , यायचे... पर्यटकांची सोय युथ हॉस्टेलमध्ये केली होती. एका हॉलमध्ये ४० पुरुष, दुसऱ्यात ४० महिला आणि एका हॉलमध्ये किचन व डायनिंग. त्यानंतर दोनच वर्षांत N. K. INTERNATIONAL हॉटेल तयार झालं आणि त्याचं उदघाटन शीलाकाकूंनी -पर्यायाने आराधनाच्या ग्रुपने केलं. ६०/६२ च्या सुमारास अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जेलर असलेले व अंदमानातील महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक अण्णा हर्षे स्वतः आराधनाच्या प्रत्येक ग्रुपला अंदमानची संपूर्ण माहिती सांगण्यासाठी येत. अशी अनेक माणसे ह्या जोडीने जगभर जोडली.
अंदमाननंतर लेहलडाखचाही समावेश झाला.
१९८३ साली शरदकाकांनी पूर्वांचल - सेव्हन सिस्टर्सच्या सहली धडाक्यात सुरु केल्या. ह्या भागांत सहली नेणारी ' आराधना ' ही एकमेव पर्यटन संस्था होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या या सहली !

क्रमशः
स्वाती कर्वे

Soul Search Part 7

Soul Search Part 7 


Festivals are in focus amongst the pandemic. It really seems and feels very different this year. There is an added fervor and prayer amongst the chaos outside.
I myself got really involved and understood the essence of every festival much better. There is a lot of positive vibe with it and I love this feeling.
In the process of meeting the ends we were rushing to and fro, not that this has reduced or decreased in any way, but there is for sure an unknown stability and calmth and more so with prayers for the whole world.

Hope I draw this positivity in all aspects of life too.The zest involved in doing pooja for Krishna,devi,ganapathy and arranging the pooja place gave an unknown level of satisfaction and here I had a thought,which says
“The festivals should be a source of happiness,enjoyment,satisfaction peace and not negativity.It should be very simply done with good intentions and peace of mind.”

You see the outcome yourself and derive lots of happiness.

saraswati sankaranarayanan

Hindi Kavita

 जाने क्यों ?


आज तुम्हारी याद आ रही है …..

अक़्सर रात में मेरे फोन में वही एल्बम खुली रहती है

जिसमें सिर्फ़ तुम्हारी ही तस्वीरें scroll होती रहती है ,

आज भी तुम्हारी बदमाशियों की वहीं तस्वीरें आँखों के आगे आ रही है ,

जिनमें तुम्हारी cutness चश्मे से झांक रही है ….

कानों में वही मेरा फेवरेट गाना बज रहा है

जो अक़्सर तुम्हारी याद में सुना करती हूँ

सफ़र चल रहा है और आँखें बह रही है …..

जाने क्यों ?

आज तुम्हारी याद आ रही है !

याद आ रहे हैं तुम्हारे साथ बीते पल 

जब रात-रात भर आँखों में सिर्फ़ तुम्हारे ही ख़्वाब सजा करते थे ,

पलकों ने जैसे ठान ही लिया था एक चेहरे को ही बस नज़रों में कैद कर लिया था ….

घर मे मेरे आसपास तुम्हारा मंडराना

और एक नज़र भर तुमको देखकर वो सुकून पाना ….

कभी मस्तियां करते करते तो कभी किशोर के गानों के साथ झूमते 

मुझे परेशान करने वाली तुम्हारी वो शरारतें याद आ रही है …..

जाने क्यों ?

आज तुम्हारी याद आ रही है ……

जाने क्यों आज तुम्हारी याद आ रही है …..

आज भी हंसी आती है उन बातों को सोचकर ,

जब तुम्हारे एक छोटे-से मैसेज से भी मेरे दिल की धड़कनें बढ़ जाया करती थी ….

तुम्हें मालूम भी नहीं मैंने तुम्हारी हर chat को अनगिनत बार पढ़ा है ,

तुम्हारी लिखी उन चिट्ठियों में भी मैंने इतना सारा प्रेम तलाशा है ….

ताज्जुब की बात ही तो यही है मैंने प्रेम तलाशा और तुमने मुझे 

तुम एक कदम दोस्ती की ओर बढ़ाते गए ,

मैंने उससे भी आगे तुम्हारे लिए प्रेम के दो कदम बढ़ाये….

प्रेम और दोस्ती के बीच की हमारी वो हर बात याद आ रही है ,

जाने क्यों ?

आज तुम्हारी याद आ रही है …..

वो दिन जब तुम्हारे दोस्त तुम्हे मेरा नाम लेकर छेड़ा करते थे ,

मसखरी करने में मेरी सहेलियाँ कौनसी कम थी …

शायद तुम बहुत बार खीझ जाया करते थे ,

पर मै मन ही मन मुस्कुरा दिया करती थी ….

डायरी लिखते-लिखते तुम्हारे ख़्यालों में बितायी हर वो रात याद आ रही है ….

जाने क्यों ?

आज तुम्हारी याद आ रही है ….

शायद नहीं जानते तुम ….

बहुत कुछ लिखना चाहती हूँ तुम्हारे लिए….

जब तक स्याही के साथ सांसे चलती रहे ,

प्रेम के अथाह समन्दर में डूबकर भी लिखना चाहा है मेरा हर पल तुम्हारे लिए ….

मग़र कभी भी तुम्हें पूरी तरह लिख ना पायी…..

शायद प्रेम को परिभाषित करना मेरी कलम ने सीखा ही नहीं …..

जिस दिन परिभाषित हो जाओगे तुम और ये प्रेम ,

उस दिन मै , मै नहीं और तुम, तुम नहीं ….

उड़ने दो मुझे कल्पनाओं के इस आकाश में ,

हक़ीक़त से वाकिफ़ हूँ मग़र इन पंखों को तुमने ही दिशा दिखाई है …..

दोस्ती की सुबह और प्रेम की रात के बीच तुम्हारे साथ बितायी वो शामें याद आ रही है

जाने क्यों ?

आज तुम्हारी याद आ रही है ….

प्रज्ञा,,,,,,



मैं तुम्हें "miss"करती हूं...
"Miss"तो शायद एक लफ्ज़ है,मेरे आहेससत के लिए,जो मैं तुम्हारे बारे में महेसुस करती हूं।मुहोंब्बत इंसान को बहोत कमजोर कर देती है।
बहोत बेबस,मजबूर,महेकुम...और मुझे इन तीनों से डर लगने लगा है।
लेकिन इसके बावजूद तुम मेरी ज़िंदगी का मरकज़ बन गए हो।
तुमने एक दिन पूछा था"मेरी कौन सी बात तुम्हे अच्छी लगती है"?
मैं उस वक़्त बता नही पायी,,, मैं बताना चाहती थी,,
बस्स कहे नही पायी,,,
आज बताती हूँ,, तुम्हारी कौन सी बात है जो मुझे अच्छी नही लगती?
,मेरे इर्द गिर्द तुम्हारे अहसासात,,,,
मेरी वजूद में तुम्हारा आज भी ज़िंदा होना,,,
तुम्हारा प्यार करने का अंदाज़,,
हर बार जब तुम मेरे साथ होते हो,,
मैं आंखे मूंद लूं तो सामने आते है...
ये सारी सारी बातें मुझे तुम्हें बतानी थी।
वक़्त ही नही मिला,,,
लेकिन आज भी मैं तुम्हारे प्यार में मोम बन जाती हूँ।
तुम्हारी प्यार की तपिश में पिघलने लगती हूँ।
ये सारी बाते ,कितनी ही ख्वाहिशें तुमसे बंधी है,,,
याद है ,,तुमने एक बार मुझे संगेमरमर कहा था,,,
लेकिन मैं तो रेत की दीवार हूँ।
रोज रोज तुम्हारी यादों की पानी मे घुलती जा रही हूं,,,
लेकिन मुझे अब ढह जाने से डर लगता है।
क्यों कि थामने के लिए तुम भी नही हो,,,...

प्रज्ञा,,,,,,,,,

Kerala dish - Aviyal recipe

 Kerala dish - Aviyal 




Ingredients:

Vegetables - elephant yam, plantain, pumpkin, carrots, beans, Brinjal,cucumber, drum sticks, snake gourd etc:-. (the north Keralan Avial includes bitter gourd also) - 4 cups
Green chili slit lengthwise - 4 Nos
Salt - To taste
Curry Leaves - few strands
Tomatoe - 1 large or Curd - ½ to 3/4 cup yogurt or green mangoe- half
Coconut Oil
To Grind
Grated coconut - 2 cups
Cumin seeds – 1 teaspoon
Green chilli - 4 to 5
Garlic - 3 to 4 cloves
Shallot – 5 nos.
Turmeric powder - 1/2 tea spoon
Chilli powder - 1/2 tsp

Instructions:

Chop all the vegetables lengthwise, around 2 inches in length.
Cook all vegetables except mango / tomatoes with just enough water, turmeric powder and salt. Do not mix with spoon, instead shake the whole pan, so that the vegetables holds its cut shape.
Mean while in a food processor coarsely grind grated coconut, cumin seeds, turmeric powder, garlic, green chilies and few curry leaves.
Add the ground mix with the mangoes or tomatoes to the top of the cooked vegetables. (if you are adding yogurt add it now).
Cook in low fire for a minute and remove from fire.
Drizzle a table spoon of coconut oil and some curry leaves and serve warm.

By- Prachi Karekar, Stuttgart

Marathi Kavita

 तुझ येणं पूर्ण झाल ते स्वप्न.... आयुष्याच्या पुस्तकात ....

नवीन नात्याच आगमन.....

नभातल्या चंद्र ताऱ्याना सांगाव ओरडून....  
सूर्याच्या त्या कीरणाला घ्याव अंगनात बोलून....
आज जल्लोष माझ्या घरात....
परी आली माझ्या अंगनात....

तुझ्या येण्याची चाहूल मनी माझ्या होती.....
स्वप्नात मी तुझ्या केव्हाच रंगली होती....
स्पर्शाने तुझ्या मी माखली होती....
आनंदाने मी केव्हाच बहरली होती....

कुलाचा दीपक तू.....
प्रकाशाची वाट तू....
अंधाराला मार्ग दाखवणारी ....
माझी ज्योत तू.....

तुझ्या येण्याने घर भरभरून आले .....
आयुष्यात आमच्या दीप उजळले....
राजकुमारी तू माझी.....
ओळख तू माझी.....

Shital Ingole

Not a hair out of place

 

I was halfway through my yoga class when my phone suddenly went manic.  It started buzzing like a fax machine – message after message pinging in.  Something sensational has gone down in one of the groups, I thought to myself, going through my yoga poses.  I schooled my mind to stay on the routine but the moment it was done I scanned my phone to find the source of the virtual commotion.

One of my friends and her family – husband and two daughters, age 10 and 13 – had shaved their heads and donated their hair to cancer patients.  This was more of a shock because this friend of mine is one of the most put-together persons I have ever seen.  She has a natural flair for style and a zest for life that is almost bordering on unbelievable.  Following this declaration were a few pictures of them with shiny pates, and believe me you, they looked beautiful.  Radiant smiles and sparkling eyes – beauty in its finest form.  Following the pictures was a volley of messages – awe-inspired, shocked, reverent, unbelieving –the common thread being that everyone was applauding their courage and sacrifice.  A few hours into the day and the shock wore off and the jokes started about “hair-raising tales” and “letting one’s hair down”.  We are all close friends in that group so it was good-natured teasing and my friend, ever the sport, joined in the banter.

There was one comment that stayed in my mind because it mirrored a thought that I think most of us had.  “I would never be able to do it.  Even knowing that my hair will grow back, I cannot bring myself to even think of the idea.”  This was my exact thought, that I would not have the courage to do this in a thousand years, and I could not stop myself from ruminating on the subject long and hard.

From the time we are little, ideas of beauty are instilled in our mind through our surroundings and the people in our world.  Our looks are genetic in origin but our idea of beauty is an environmental influence.  No one ever sits us down to go through the check list.  It is one of those things that we get through osmosis from our surroundings.  Which is why beauty has different standards in different cultures and what is a sign of beauty in one culture may be something no one looks at twice in another culture.  Our looks or rather how we perceive ourselves when we look into the mirror are a huge part of our self-image and some things become so important to our self-image that we cannot imagine ourselves without them – for instance, without hair on our heads.

Many many years ago, widows were forced to shave their heads just so that they were no longer attractive to the men around them.  That practice served another purpose.  It distorted the woman’s self-image and crushed her spirit.  It was a constant reminder of the fact that she was a widow.  How far is that image from Persis Khambata or Protima Bedi when they shaved their heads.  The former did it for her character in a movie whereas the latter did it to make a statement.  A statement that women will not let themselves be held down by the dictates of tradition and society, that they have the right to choose how they want to look.

A little reading on the matter of hair brought to the surface so many stories of people who had lost their hair to cancer and also to another lesser known evil – alopecia areata.  Alopecia is an autoimmune disease that causes sudden loss of patches of hair in a seemingly healthy individual.  In a world where bad hair days are dreaded, these people had to step out of the house with bald patches on their head.  Desperation led them to try anything and everything anyone suggested; from ginger oil and rice water treatments to elixirs and serums from high-end cosmetic companies and quacks -- all apparently in a crusade of futility that put these tall claims to dust.  Some were lucky that their hair grew back as the condition subsided while others finally accepted the reality and settled for wigs or hair extensions from donors just such as my friend and her family.  Their newly acquired hair worked wonders for their emotional well-being and paved the way to their healing.

My appreciation for my friend multiplied tenfold as I went through my day, all of these thoughts swirling in my head.  Knowing that her hair would grow back could not have made the decision any easier.   It makes one wonder about some people’s reserves of courage.  By defying societal norms and deep-rooted ideas of self-image, this family has become an absolute icon for me.  They are not supermodels or Hollywood stars who will gain an advantage from this.  They were not forced to do it nor was it something that happened to them as a result of a condition.  They are common people like you and me and they chose to do this of their own free will; they wanted to do this for the strangers they have never met who are battling with a disease.

Anthropologist Margaret Mead was once asked by a student what she considered to be the first sign of civilization and she answered – a healed femur or thigh bone.  Mead explained that a broken femur takes six weeks to heal.  In other animals, a broken bone would mean certain death.  The evidence of a healed femur fracture in humans shows that someone took the person to safety, tended to him, brought him food and water, and nursed him back to health.  That is the first sign of civilization.

Today when we see the world around us, we see humans committing unspeakable crimes against humans, and it sometimes feels as though the end of civilization is near.  My friend and people like her give us hope.  Being a beacon of change, such people inspire us to become better versions of ourselves, to step out of the invisible circles we have drawn around ourselves and to make a difference to the world, to do something that actually matters.  I may not have the courage to do a gesture as magnanimous as yours, but thank you, my friend, for inspiring me to be a better person in my own small way.


Bakul pradhan

"Rendezvous with Antarang"-Dr.Surya Prabha Kumar

 Dr.Surya Prabha Kumar



Introduction


Hi, I am Surya Prabha KUMAR. I am a Doctor by Profession. I graduated my bachelor’s in medicine from Madurai Medical College, Tamilnadu, India, one of the prestigious Medical Institutions in India. I moved to Karlsruhe, Germany at the End of 2011 along with my Husband. I have learnt German Language, then took Exams including Medical Equivalency Test in German Medical Universities and obtained my Licence to Practice Medicine in 2013, since then I started my Practice/Masters in Internal Medicine. I am currently pursuing my super speciality in Department of Cardiology, Städtisches Klinikum, Karlsruhe.

Antarang Team has interviewed Dr. Surya Prabha and here is the summery 

What makes you smile the most?

- When my daughter shows new things that she learnt.

- When Patient express their gratitude after my treatment.

What music makes you cry?

- Any music which stirs my soul.

What little thing makes you the most grateful to be alive?

- Smile of my daughter

- A feeling of satisfaction from the Patient

- Being able to treat and help the suffering people

On hard days, what motivates you to get up and start your day?
   The determination towards my goal.

How do you find strength when you are going through hardships?
During this situation I would take some time for myself and sit calm to think & discuss with my husband and my father to combat any issues

What family member do you call when you have good news to share?

My Husband and my Father.

Who inspires you to live your best life?

Myself

When you have to confront someone do you choose to stand strong, or to not say anything at all?

I choose to stand bold, strong, straight forward and will speak to the point.

What person made you believe in love?

My Husband and Mom and my little Daughter

Do you believe in fate and that everything happens for a reason?

Yes, I always believe in fate, the things which happened and happening in life are due to some reasons

When you got your heartbroken for the first time, what got you through it?

I was shaken when my mother passed away. fortunately I overcame with strong support and love from my family.

What makes you most proud of yourself?

Firstly I feel very proud to be a Doctor as we are in frontline to take care of the people fighting against medical Illness.

Secondly proud being multitasking , as a woman to play all the Roles in the Family and Society to make Things near Perfect.

When in a crisis, do you act calmly, or do you automatically freak out?

I would get panic and be emotionally down, but definitely will come later to a calm phase to think rationally toa overcome this situation.

What keeps you up at night?

Watching movies with my husband.

If there was one charity you could donate to, which would you choose?

For helping children education and needy old people

What is the one quality you need in a significant other?

Being Honest and truthful

On your best days, who do you want standing next to you?

My Family

On your hardest days, who do you want standing next to you?

My family

What is the one word that perfectly explains who you are?

Hardworking

Where do you envision yourself in five years?

A Cardiologist and setting up an own clinic in next 5 to 10 years

What is your message to our Antarang women readers?

Always dream big and work hard to achieve it and help others.

वैताग सोडा. आनंदी व्हा

 वैताग सोडा. आनंदी व्हा

आज माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला जाम बोअर झाल्याचा. कारण काय तर आता ज्येष्ठ नागरिक असल्याने गेल्या ६, ७ महिन्यांपासून कुठे बाहेर जाता येत नाही. काही खरेदी करता येत नाही. इतरही कोणी घरी येत नाही. काय करावे समजतच नाही. श्रावण, गौरी, गणपती होते तोवर जरा बरे होते. आता पितृपंधरवडा लागला की वैताग येईल.  आणि अचानक मला म्हणाली, ‘तू काय करतेस ग दिवसेंदिवस घरात राहूनॽ आत्ताही बोलतांना अजिबात कंटाळलेली दिसत नाहीस. मस्त हसून बोलतेस. तुझी मुलं परदेशातून परत आली की कायॽ’

     तिला जे उत्तर दिले तेच सर्वांसाठी. आनंदी रहायला भोवतीची परिस्थिती सहाय्य जरुर करते. पण आनंद आपल्यातच असला पाहिजे. आपला आपणच निर्माण केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आनंद कसा निर्माण करायचाॽ तर सोप आहे. सगळ्यात पहिले आपण एकटे आहोत ही चुकीची जाणीव सोडली पाहिजे. तो परमात्मा, देव आपल्यातच वास करुन असतो. कायम सोबत असतो. म्हणजेच आपण एकटे नसतो कधी. आपली नित्यकर्मे आपल्याला करायलाच हवीत. मग तीच सहजतेने केली की त्रास वाटत नाही. त्रास वाटला की काम करायचा कंटाळा येतो. सध्या तर इतकी साधने उपलब्ध आहेत की आपल्या  आपडीचे छंद आपण सहज जोपासू शकतो. ज्यांना नामस्मरण प्रिय आहे त्यांना तर अजिबातच कंटाळा येत नाही. त्याचाच आनंद इतका असतो की या भौतिक जगाकडे त्यांचे लक्षही जात नाही.

     व्हाटसअप, युट्यूब, फेसबुकवरही खूप चांगल्या गोष्टी असतात. आपण आपल्याला हव्या त्या शोधल्या की मार्ग सापडतो. ज्येष्ठ नागरिकांना तर त्यांच्या अनेक आठवणी, अनुभव सोबतीला असतात. त्यांचे स्मरण करता येते. आपल्याला आलेले काही गमतीचे अनुभव असतात. ते आठवावेत. मनसोक्त हसावे. सध्या आम्ही, आमच्या वासुदेव वर्गाच्या बाई लॉकडाऊन असल्यामुळे संथा वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन श्लोक पाठवतात, त्याचे दृढीकरण घेतो. साधारणपणे पाठविलेले श्लोक एकदा दोनदा ऐकावेत आणि पुस्तकात पाहून म्हणावेत. सराव करून मग रेकॉर्ड करुन आम्हाला पाठवावेत अशी पद्धत. सर्वसाधारणपणे सगळेच ती अवलंबितात. मात्र एक दोनदा एकीने श्लोक ऐकले आणि सराव न करताच म्हणून मला पाठवून दिले. मी ऐकले आणि तिला कळवले की आज तू सराव न करताच श्लोक म्हटले आहेस. तर तिकडून ती विचारते, अय्या! तुम्हाला कसे कळलेॽ मी तर काही समोर नाहीये तुमच्याॽ तुम्हाला दिव्य दृष्टी आहे का संजयासारखीॽ आहे की नाही गंमत.

     उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीतून नवे पदार्थ करुन खावेत. आणि ते पचतील एवढा व्यायामही करावा. आपल्याच खिडकीतून, दरवाजातून आजूबाजूचे निरीक्षण करावे. आत्तापर्यंत दुर्लक्षित झालेले खूप काही दिसेल पहा. गीतेचा आणि दासबोधाचा अभ्यास शक्य होईल त्याने जरुरच करावा. कोणतेही ग्रंथ आपल्याला समृद्धच बनवतात यात शंका नाही. पण या दोन ग्रंथांचा अभ्यास केला तर आपण मानव म्हणून जन्माला आल्यानंतर काय करायला हवे ते आपल्याला समजेल अशा शब्दात पण परखडपणे उमजेलच. माझी खात्री आहे की मग काय करावे, कसे करावे हे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. जे जे करायला हवे त्यासाठीचे प्रकल्पच प्रकल्प दिसतील आणि जाणवेल की अरेच्चा हे तर नक्कीच करता येईल.

     आता मी व माझ्या काही मैत्रिणी, माझी सून व तिच्या मैत्रिणी, माझ्या सहाध्यायी करत असलेल्या उपक्रमांची झलक – गीतेचे २ अध्याय क्रमशः रोज वाचणे, साप्ताहिक गीतापाठ करणे, गीताव्रती, ज्ञानेश्वरी, दासबोध यावरचे स्वाध्याय लिहिणे, अनाथाश्रमातील बालकांसाठी दिवाळीपूर्वी स्वेटर तयार करणे, गोष्टींचे अभिवाचन,  लेखन, पत्राद्वारे काही अभ्यासक्रमांच्या परिक्षा घरूनच देणे.  सोप्या, साध्या पण नविन रेसिपींची देवाणघेवाण करणे, एकाद्या वेगळ्या पण छान असलेल्या विषयांच्या पोस्ट पास करणे, कोणाला सहकार्य आपल्याला देता येत नसेल व इतरांकडून मिळेल असे वाटल्यास त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोचवणे. आता मला सांगा हे सगळे करतांना वेळ किती आनंदात जातो ते जिची तीच सांगेल नक्की.

     बोअर झालेल्या, वैतागलेल्यांनो मनावरचे मळभ झटका आणि लागा उद्योगाला. आनंद जवळच आहे तुमच्या.

 Padma Dabke 

SHODASHA SANSKAR

 

SHODASHA SANSKAR

 

Hindus believe that every aspect of life is sacred. That is why each significant stage, from conception to cremation, is celebrated as a reminder that life is a gift from God which should be duly respected and lived according to His wishes.This is the first installment describing the significance of the 16 Samskaras.

samskara is used to mean: education, cultivation, training, refinement, perfection, grammatical purity, polishing, embellishment, decoration, a purificatory rite, a sacred rite, consecration, sanctification, effect of past actions (karmas), merit of karmas,etc. A general definition of samskara, encompassing nearly all of the above is "to improve upon something while removing its undesirable attributes."

Purpose of Samskaras

(1) Cultural. The variety of rites and rituals related to the samskaras help in the formation and development of personality.

(2) Spiritual. According to the seers, samskaras impart a higher sanctity to life. Impurities associated with the material body are eradicated by performing samskaras.

1. Garbhadhana

This sanskar is performed by both parents and consists of a prayer for begetting a child in order to continue the traditions of a Hindu and also the progress of the human race.

2. Punsavana

This sanskara is performed during the third or fourth month of pregnancy by reciting Vedic hymns to invoke divine qualities in the fetus which is developing as a child.

3. Simantonnayana

(Satisfying the cravings of the pregnant mother)

This sanskara is performed during the seventh month of pregnancy when prayers are offered to God for the healthy physical and mental growth of the child.

4. Jatakarma

(Child birth)

Mantras are recited for a healthy and long life of the child at his birth.

5.Namakaran

(Naming the child)

The name for the baby is selected such that its meaning can inspire the child to follow the path of righteousness.

6. Nishkramana

(Taking the child outdoors for the first time)

This sanskara is performed in the fourth month after birth when the child is moved outside the house.

7. Annaprasana

(Giving solid food)

In the sixth, seventh or eighth month child is given solid food.

8. Mundan

(First Hair cutting)

This is performed during the first or third year of age when the child’s hair is completely removed by shaving.

9. Karnavedha

(Ear piercing)

This sanskara is performed in the third or fifth year.

10. Upanayana

(Sacred thread ceremony)

This introduces the male child to a teacher in order to receive education and marking the entry of the child to Brahmacharya.

11. Vedarambha

(Study of Vedas)

This sanskara is performed at the time of Upanayana or within one year. The Guru teaches the Gayatri Mantra.

12. Samavartana

(Returning home after completion of education)

This sanskara is performed at the age of about 25 years.

13. Vivaha

(Marriage)
This sanskar not only helps to tie the two persons for a life long journey with the witness of the sacred fire and the elders and with the chanting sacred Vedic hymns but also helps them undertake pledges to be fulfilled during this journey. There is no concept and ritual of divorce in Hindu Sanskars.

14. Vanaprastha

(Preparation for renunciation)

This sanskar is performed at the age of 50 years (now-a-days, 60 years) to celebrate the departure from the householder stage to the Vanaprastha stage when the person begins to engage in social and spiritual activities to help the society and mankind at large. Thus one moves away from the family as a unit to the Society as a unit.

15. Sannyasa

(Renunciation)
This sanskara is performed after Vanaprastha for spiritual accomplishment.

16. Antyesthi

(Cremation)
This is the final sanskar performed after death by his or her descendants and followers.

These samskaras, with their spiritual import, holistically 'samskarize' (edify) all aspects of an individual's life. Since each samskara ritual makes the individual the focus of the occasion, he/she is psychologically boosted. This strengthens the individual's self-esteem and enriches interaction with those around. The samskaras bring together family members, close relatives and friends, hence increase the cohesiveness of the family unit. Therein the unit harmonizes and strengthens the social structure. The consequence of this is a healthy society with a strong cultural identity which easily refines, boosts and perpetuates its traditional beliefs, customs, morals and values.

 

                                                                                                                      Shilpa Pandit