कळीचे लोभस उमलणे
अन् मना चे आंतरीक मोहरणे,
ती उमलते आनंदाने
मग मनाला का ही बंधने?
कळीचे असते
उमलताना भाव विश्व,
अन् मन असते
स्वतः मध्ये बंदिस्त!
कळी खुलते-मोहरते
नकळत शहारते,
मन मणाचे ओझे;
जाणते ,तरी का पेलते?
कळीच्या खुलण्याचा
झाडा वरती सोहळा होतो,
मन मोहरण्याचा का
उद्विग्न भावनांना जाच होतो?
जपूनी तिचे भावविश्व
झाड भासते निराळे,
मना तू ही हो प्रसन्न
फुलू दे चैतन्याचे मळे!
झुगारूनी सर्व बंधने
कळी सम तू मोहर रे,
घे ऊंच ऊंच झोका
मना सावर रे,सावर रे !
सौ.सुगंधा पंकज रागळवार *
*वोल्सबुर्ग ,जर्मनी *
No comments:
Post a Comment