Thursday 28 February 2019

Navratna Korma Nach Mughlai – Art


Vorbereitungszeit:        30 Minuten
Garzeit:            25 Minuten
Pro Portion             350 kcal
für 4-5 Personen
Zutaten Je 100g    gekochte gemischte Gemüse wie Karotten, Erbsen, Kartoffeln, Bohnen, Blumenkohl
1 große           Zwiebel (fein geschnitten)
2 TL                Knoblauchpaste
2 TL                Ingwer und grüne Peperoni Paste
1 TL.               Kurkumapulver (Haldi)
2 ½TL             Korianderpulver
1 ½TL             rote Chilipulver
2TL                Garam Masala
1Tasse            Milch
200g               Sahne
300g               Tomatenpüree
200g               Paneer (selbstgemachter Hüttenkäse) ersatzweise Feta
4EßL.              Cashewkerne, Rosinen
4EßL               Öl
Salz nach Geschmack
Trockene Gewürze
1TL                Cumin Samen
2TL                Khuskhus (Samen)
1TL                Kardamom
Zubereitung:
Paneer in Würfel schneiden, frittieren und auf die Seite stellen. Das Öl in einem Topf erhitzen, die Zwiebeln zugeben und goldbraun andünsten. Ingwer-Peperoni und die Knoblauchpaste zugeben und 1-2 Min. anbraten. Dann, die Gewürze Cumin, Khuskhus und Kardamom 2. Minuten. anbraten. Nun fügen Sie das Tomatenpüree hinzu. Das Kurkumapulver, Korianderpulver, Chilliepulver und Garam masala beigeben und mit Salz abschmecken. 1 Tasse Wasser zugießen.
Nun fügen Sie das gekochte Gemüse hinzu und lassen es köcheln, bis die Soße etwas eindickt.
Dann geben Sie Milch und Sahne dazu und wieder einige Minuten weiter köcheln lassen. Nun geben Sie Paneer Cashewkerne und die Rosinen hinzu, gut vermengen und weitere 5 Minuten köcheln lassen.
Nach Wunsch mit frischen Korianderblättern garnieren
Heiß mit Reis oder Chappatis servieren.

By

Harsha Oza

Stuttgart, Germany

चित्रकाराच्या मनातील चित्र


मला चित्र आणि चित्रकला ह्यातल्या प्रोसेस बद्दल लिहिताना मजा अशी वाटते की  खरंतर खूप आतलं काहीतरी असावं हे प्रत्येकाचं. मी चित्र काढते ठेवढ्यापूरते ते डोक्यात नसून एक धागा असंख्य काळ मी डोक्यात घोळवत असते आणि एखाद्या अनुभवाचे अनेक पैलू चाचपडून बघत असते. माझ्या सायकॉलॉजी च्या शिक्षणाचा आणि organizational behavior चा  मला खूप उपयोग होतो कारण मला परिस्थिती अनालाईझ करायची सवय लागलेली आहे. त्याचा माझ्या वयक्तिक आयुष्यात ताण पडत असला तरी इथे ती सवय मी नीट चांनेलाइज करू शकत आहे, प्रयत्न तरी तो आहे. मी स्वतःचे अनुभव किव्हा दुसऱ्यांचे भावलेले अनुभव अभिव्यक्ती ह्यावर काम करते. गाणं संगीत हा एक मोठा भाग आहे माझ्या आयुष्याला. हा प्रवास आतला आहे.

Choose to look away म्हणून माझे एक 4 फूट चित्र आहे. ते मी रित्या नावाच्या गाण्यावरून आणि कितीदा नव्याने तुला आठवावे ह्या गाण्यावरुन प्रेरित होऊन काढले होते. त्यात मला खचाखच भरून पावलेली रिक्ताता दाखवायची होती. आणि सगळ्या व्यावहारिक गोष्टींमधून स्वतः ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न रेखटायाचा होता.  एक अठवडा मी दिवस रात्र ते काढत होते. माझ्या मनाचे सर्व पदर मी त्यात ओतले होते. पण काहीतरी उरले असे वाटायचे. खूप दिवस उभ्या ठेवलेल्या त्या canvas कडे मी बघत राहायचे. मग एक दिवस मला सुचलं काय कमी आहे. त्यात एका व्यक्ती ची गरज होती. मी तिला त्या चित्रात पाहू शकत होते. फिगर्स काढायची भीती वाटत होती पण त्या काळात भीतीला मात करायचा माझा पण होता. मी ती फिगर काढली आणि आसपास संसारिक उथळपणा पण मांडायचा प्रयत्न केला आहे. तिचे डोळे झाकलेले आहेत कारण तिला काही बघायची इच्छा नाही. She wants to stay with herself. अशा चित्रांमध्ये पेन्सिल चा वापर न करता direct काढते. ही माझी शैली आहे.

Manmarziyaan चित्रपट बघून indecisive पणा, पाळणारा स्वभाव, आणि इतर उथळपणा मुळे आयुष्याचा होणारा खेळ मला मांडायचा होता. मुळात दोन लोकांच्या प्रेमात आणि तटतुटी मध्ये किती लोक आयुष्यावर प्रभाव करतात. अनेकदा तो अनावश्यक असतो असे मला मांडायचे होते. अशात एक जण फॅमिली ट्री सोडून जाण्यास असतो तेव्हा होणारी स्त्रीची कुचंबणा. तिला स्वैर होता न येणं. तिला स्थिर ठाम राहवं लागणं तरीही वेदेनेने हळू हळू निर्विकार होणं. हा प्रवास kiwha अनुभव दाखवायचा प्रयत्न.दुस्वास करण्यापासून प्रेम निष्पन्न होऊ शकत नाही. मनात आलं की उठून निघून जाऊ शकत नाही. आयुष्यातले प्रश्न हे आयुष्यात राहून सोडवावे लागतात असा माझं मत आहे. प्रयत्न चुकतात. दिशा चुकते पण प्रयत्न करावे लागतात.अमृता प्रीतम च्या या कवितेनी आणि दर्या नावाच्या गाण्यांनी प्रेरित हे चित्र. माणूस विसरला आपल्याला म्हणून होणारं हतबल मन फेसलेस झालं आहे. समाज, परिस्थिती मध्ये चेहऱ्याचवर नक्की कुठली भावना प्रगट व्हावी कुठली झाकवी अशी परिस्थिती. हे 7 फूट चित्र आहे.

ही दोन चित्र माझ्या हृदयाचा भाग आहेत. 

सर्व आहेत. पण ही विशेष जवळची.

By

Winnie Mahajan

Pune, India

साहिल

खुद से खेलना बन गया था मुक़्क़दर मेरा, में तो एक कश्ती थी, ढूंढती समंदर मेरा

सोचा था बनके मोती छुप जाऊ अपने सीप में , लेहरो ने छीन लिया था साहिल मेरा

तुम हो मेरी जिंदगी का एक ऐसा आईना, जो टूट कर भी नहीं टूटता, बिखर कर भी नही बिखरता

क्या पता है तुझे कि मेरे जज्बातों का अलफ़ाज़ तू है मेरे होंठो पर बिखरी मुस्कराहट की आवाज़ तू है

मेरे चेहरे की मासूमियत में छिपी हर राज़ तू है

कभी तो वक़्त ठहरा होगा जो तुम मिले, क्या मुहब्बत की ओस गिरी होंगी जो तुम मिले

धीमी सी दिल की धकधक में कुछ तो था जो तुम मिले, तेरी पलकों के इशारे कुछ तो कह रहे थे जो तुम मिले

तेरी आँखों में एक अलग शोर था, पर होठों पे एक अजीब ख़ामोशी सी

दिल में मेरे सौ सवाल थे, और आँखों में ख्वाब थे -

तेरी नज़र उठाते ही, मेरे अल्फ़ाज़ को जजबात मिल गए और मुझे मेरे सारे जवाब मिल गए

ना में हीर, ना में सीता और नहीं में राधा हूँ - में तो बस अपने "पि" की "मीरा" हूँ

मेरे साये में मुझे तेरा अक्स नज़र आये, मेरी लकीरो में मुझे तेरा साथ नज़र आये

नहीं जानती में इसे क्या नाम दू, या तो तू मेरा साया है या तू मेरा आइना - जो भी नाम दू तुझे , साथ

दोनों ही नहीं छोड़ते यह जानती हूँ

तू आके लिपट जाए मुझसे, हाय महंगे महंगे ख्वाब मेरे

तस्सली सी है इस दिल को, आँखें मेरी देख सकती है ख्वाब ऐसे – क्यूंकि

तुम हो मेरी जिंदगी का एक ऐसा आईना, जो टूट कर भी नहीं टूटता,बिखर कर भी नही बिखरता

आजा थामले अब इन हाथों को, लकीरे जिसकी कमजोर है

चलदे उस राह पे इन कदमो के साथ, जिन्हे अँधेरे से अब लगता है डर

बन्न जा तू इन पलकों का वो ख्वाब, जो उठे तो आये तू नज़र,झुके तो तेरी बाँहों में बिखर जाये

कहती यह "पलक" अपने "पि" से - तू ही मेरा "सीप",  तू ही मेरा "साहिल" है !!

बहा ले जा इस मोती को , जिस और तेरी मंज़िल है !!!

By

Nidhi Mehta

Dombivli, India

Know thyself

The gem cannot be polished without friction, nor man perfected without trials. "

Today, when we are living in a global village we have to deal with people of different region, culture, language, and religion. To understand them first we have to understand your own self. It is said that "He who does not know himself does not know others. "

Therefore you need to discover yourself, the true person within you, your true identity and not what others perceive you to be. This is because your personality is made up of many facets that you can pick up and reflect from your experiences. Sometimes they are strong and cover the real you.

Thus by knowing yourself, you will know your Strengths and Weaknesses which further help you in strengthening your strengths and weakening your weaknesses. This is important in all stages of life and a pre-requisite in Personality development. This is because Self-knowledge is the beginning of Self-improvement.
  
Knowing yourself helps in controlling your emotions, reaching your goals, reaching better decisions, in improving relationships, in realizing and improving your full potential and ultimately in experiencing happiness and joy.

Knowing yourself is a life-long process. For that, you need to remove all the multiple personalities that you can put on for different people and at different times. You thus need to get down to the core of your essence and then need to get rid of your own false images and delusions.

You can do this through various ways like maintaining a personal diary, developing hobbies or new interests, meditation, exercise, etc.

If you want to develop a better personality and succeed in life the first step is to be able to know yourself.

By

Ashwini Deshpande,


Recipe - Risotto Rice (Italian cheesy Rice )



Ingredients:

1 Cup chopped mushrooms,
2-3 Garlic Cloves,
1/2 onion,
Freshly crushed black pepper,
2 cups of Boiled rice,
1/4 cup grated cheese, 
1/2 cup fresh cream,
2 tsp olive oil,
1 tbsp mixed herbs, 
Salt to taste

Procedure
1. Take well-chopped Mushrooms, garlic cloves, and onion.
2. Heat the pan and add olive oil. After some time add chopped onion and garlic. Let it cook for sometime.
 3. Add chopped mushrooms and pinch of salt and cover the pan with a lid and let it cook until mushrooms become soft.
4. Add cheese, fresh cream, crushed black pepper, and mixed herbs into the pan.
5. In the cooked content add boiled rice and mix it well.
6. Add basil leaves for great flavor on the dish. 

Additional tips
1. Risotto rice tastes good when served hot and fresh. 
2. Amount of cheese and fresh cream can be varied as the individual tastes.

By

Prachi Karekar

Stuttgart, Germany

Friday 22 February 2019

"बुक बॉक्स" एक उपक्रम

टेक्नॉलॉजी बदलत जातात पण माणसाच्या मूलभूत गरजा कायम रहातात. आता हे टेलिफोन बूथ बघा ना..मोबाईल फोनचा काही वर्षापासून वाढत चाललेल्या उपयोगाने टेलिफोन बूथ हा प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. तसेच पुस्तकांची जागा आता हळूहळू आयपॅड आणि किंडल घेत आहेत.
तरीही मानवाची संवाद साधण्याची आवड तशीच आहे व तसेच वाचनही मानवी अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहेच.  या दोन्ही गोष्टींची सांगड घालून कोणी जर लोप पावलेल्या टेक्नॉलॉजीचा साक्षरता उपक्रमासाठी उपयोग केला असेल तर हे अभिनवच नाही का?

'बर्लिन ' जर्मनीची राजधानी येथे असलेल्या इंस्टिट्यूट फॉर सस्टेनिबिलिटी  एण्ड एज्युकेशन एण्ड एम्पलोयमेट एण्ड कल्चर या संस्थेने टेलिफोन बूथ आणि पुस्तके अशी साधी कल्पना एकत्र आणून "बुक बॉक्स " हा उपक्रम सुरू केला.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या उपक्रमाला गरज होती खूप साऱ्या पुस्तकांची आणि टेलिफोन बुथची. त्यासाठी नागरिकांना वाचून झालेली अथवा वापरात नसलेली पुस्तके आणून देण्याचेआवाहन केले यामुळे पुस्तके फेकून देण्याऐवजी त्यांचा चांगला उपयोगही होणार होता, तसेच टेलिफोन बूथ कंपनीज चे निरुपयोगी टेलिफोन बूथ पुन्हा कामी येणार होते.

 उसवलेले कपडे पुन्हा न शिवून घेणे तसेच वस्तू दुरुस्त करणे यापेक्षा ही नवीन वस्तू विकत घेणे हे स्वस्त पडत असल्यामुळे जुन्या वस्तू फेकून देण्याची पद्धत मला युरोपात अवगत होती , त्या धर्तीवर  हा प्रोजेक्ट थोडे आश्चर्यच होते.

पुस्तके शेअर करण्याची कल्पना ही काही नवीन नाही अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाचनालये, कम्युनिटी इन्स्टिट्यूट, बुक क्लब तथा बुक कॅफे याठिकाणी पुस्तके  एक्सचेंज करण्याचे उपक्रम होत असतात. तरीही  या पद्धतीने सामान्य लोकांची मदत घेऊन तसेच पब्लिक प्रोपर्टी चा चांगला उपयोग करून टाकाऊतून टिकाऊ असे काहीतरी तयार होणार होते.

हौशी विद्यार्थ्यांच्या मदतीने टेलिफोन बूथला रंगीबिरंगी रंगाने रंगविण्यात आले.  त्यात शेल्फ बसविण्यात आले. जमा झालेली पुस्तके तसेच विविध बोर्ड गेम्स व लहान मुलांसाठी चे पुस्तक साहित्य हे विषयावर मांडण्यात आले. हे सर्व काही नागरिकांच्या मदतीने करण्यात आले. तसेच बसून वाचता यावे यासाठी बाहेर बेंचेसची व्यवस्थाही करण्यात आली.

बुक बॉक्स साठी असलेले नियम थोडक्यात बोर्डवर लिहून ठेवलेले असतात. नागरिक स्वच्छतेची तसेच पुस्तकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात. पुस्तक हवे असल्यास आपल्याजवळील एक पुस्तक तिथे ठेवले जाते. बुक बॉक्स हे 2४/७ उपलब्ध आहेत तसेच यासाठी लायब्ररी कार्ड, मेंबर्शिप ही भानगड देखील नसणार.

हा प्रोजेक्ट पूर्णतः जनतेच्या विश्वासावर चालतो येथे मॉनिटर करण्यासाठी कोणीही बसलेले नसते तसेच कुठल्याही रजिस्टरमध्ये पुस्तकांची एन्ट्रीही झालेली नसते.
पुस्तक घ्या आणि पुस्तक द्या तसेच पुस्तक वाचा या उपक्रमामध्ये पुस्तक देणारा आणि घेणारा या दोघांचाही फायदा आहे.
अशी ही अभिनव मोफत पुस्तके देवाणघेवाण उपक्रमाने वाचनाची सवय निर्माण होण्यास तर मदत झालीच पण लोकांच्या स्वेच्छेने सहभाग घेण्याने वेगळाच मानसिक आनंद व सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण झाल्याचे दिसते.

आता  जर्मनीतील इतरही शहरांनी हा उपक्रम राबविला आहे.
 असेच  एक बुकबॉक्स माझ्या घराजवळही आहे आणि यामुळेच हा अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा मला आनंद मिळाला.
लंडन , मेलबर्न शहरात तसेच इतर देशांमध्येही अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स अस्तित्वात आहेत.
 ही अशी कल्पना तुम्हालाही आवडली असेल व असे उपक्रम राबवण्याची शक्यता तुमच्याही शहरात असेल तर तुम्हीही असे करू शकता.

By,

Anagha Mahajan

Stuttgart, Germany

यहाँ मैं अजनबी हून

मुझे कोई पेहचानता नही
ना कोई पुच्छता है ये सवाल
कैसे हो भाई
क्यूँ हो इतने बेहाल

फुल मेहेकते हैं इधर भी
पर मेरे देस जैसी खुशबू नही
पंछी उडते हैं इधर भी
पर उनका आस्मान मेरे जैसा नही

सब कुछ होते हुए भी यहाँ
लगता है बिलकुल खाली
आस पास ना दोस्त, ना भाई
रास्ते एकदम खाली खाली

गलियां खाली, घर खाली
कमरे खाली, इन्सान खाली,
दिल परेशान और हैरान

गिनते हुए दिन
कब होगी घर वापसी
कब होगी घर वापसी

By 

Mrunalini Dabke

Karlsruhe, Germany

एक कविता

कुछ पंखतियाँ उन लोगों के नाम,
जो करते हैं लड़कियों , औरतों को बदनाम .
कुछ गुस्ताखियाँ आपके अपनों ने भी की होगी,
क्या उनको भी यही सजा मिली होगी ?
जो पहनती हैं मीडीस,जीन्स और शॉर्ट्स ,
मिलती हैं फ्रेंड्स को और पीती हैं शॉट्स.
लगता उनपर हमेशा ये लेबल,
ये तो हैं हमारे लिए ईज़िली अवेलेबल.
जो हंसी तो फसी ये है नया फंडा,
मिली नहीं तो कहते हैं करैक्टर है गंदा.
जिसे बेहेन बोले पहले,उसी को कहते हैं कहो मुझे जान,
क्या ये सब कहते वक्त ,ना लड़खड़ाई इनकी जुबां?
कुछ तो लोग कहेंगे,लोगों का काम है कहना,
पर क्या किसीने ये सोचा ?
कितने घर टूटे, भीगे कितने नैना ????
कभी तो इनका अंत होगा,कोई तो ऐसा संत होगा,
जो समझे ये नारियां हैं अच्छी,होती हैं इनकी बाते भी सच्ची.
है हर कोई अपने पापा की प्यारी,
एक दिन पड़ेंगी ऐसे मर्दों पे भारी.
करलो चाहे जितना भी इन्हे बदनाम,
सुनीता , सायना के आगे जुड़ेंगे और भी कई नाम.

By

Sarala Bhagat,

Dombivli, India

Thursday 21 February 2019

The mother

Roses at the altar 
Pretty and fragrant
Sure as tomorrow
Is life today 

Warm and comforting 
Tender and loving
Warm and bright
Is my mother's presence 

A cool touch of concern
Unconditional giving
A circle of faith 
A sun of hope and love 
Every day. 

By

Anuradha Kulkarni

Karlsruhe, Germany

Raising Children: A Cultural Conundrum

I was born in and raised as an Indian and the values ingrained in those early years have retained in my sub-conscience. It affects every decision I make and how I present myself to the rest of the world. I grew up in a singular cultural environment – a unicultural upbringing, very sure of what culture meant to me. I moved to England to study when I was rather young, just out of my teens. A lot of my experiences of living independently and learning about being a “grown-up” happened as I integrated into the British conscience, giving me a brand new outlook on what I considered “my culture”. I lived, worked and raised my family there for over a decade. After moving to Germany a few months ago, I have come across a whole new European way of living and I am still learning the ways of the land, definitely tending towards a multicultural lifestyle.

Being a mother to a preschooler, I often struggle to make cultural choices for my child. Although I identify myself as an Indian, I struggle to identify my child as one. Who, then, is this little person growing up to be? AND what exactly does it mean to be an Indian? Understanding the cultural essence or celebrating in the rich traditions of India, both or something entirely different?

In the diverse world of Today, I have multiple choices and several more questions about it too. My child can be Indian and participate in the culture and tradition, be British and value articulation and charity, and be German and value reliability and precision; all at the same time. Limiting to one nationality to define an entire personality often makes for narrow choices. Our children, especially those of immigrant parentage are in a position of choosing the traditions and values of any and all countries that they live in and experience –to raise a child as an Indian in Germany, would be doing great injustice to what European culture has to offer. And to raise a German child in an ideologically Indian family is to alienate them from the vast experiences and values that are our heritage.

OR are we raising children to have a confused upbringing by not choosing one or the other and giving them open access to everything? In the US and UK generations of ABCD/BBCDs (American or British Born Confused Desis) were criticized for this very reason. All they were trying to do is fit in within the diversity – in a multicultural growth experience. Is it really important to show our children that they belong to a distinct group and that these differences should somehow be embraced and celebrated?

How do you strike the right balance? Is multiculturalism really good for our children? Should we be focusing instead on the similarities within these varied cultures; creating a universal culture, one that does not point out differences, instead celebrates the best of all as one? All the cultures have inherent values that tend to be similar – compassion and kindness to your fellow beings, generosity and charity, consideration and integrity and so many more. As a young mum, I am still questioning my choices and if I should be the one making them. At the moment though, I find myself tending towards wishing a world of universally cultured little people. What do you think? 

By

Dr. Pooja Joshi

Heidelberg, Germany

अभंग

देहाचे घर होईल सुंदरl
नित्य प्रेमे भजता ईश्वरll (रघुवर)ll
कामक्रोध रिपुंचा कचरा
अहं ममतेचा चिवट पसारा
आशा तृष्णा वादळवारा
निघून जाई सत्वर
भजता प्रेमे हा ईश्वर(रघुवर)ll
सदनातील या दृश्य व्यक्ती 
अवघ्या मिळूनी करतील सत्कृती
अदृश्यांची विषयनिवृत्ती
वृत्ती होतील स्थिर 
प्रेमे भजता हा ईश्वर(रघुवर)ll
अंतर्बाह्य मन होईल निर्मळ
सद्ग्रंथवाचन करता सोज्वळ
सत्संगाचे दिव्य पाठबळ
वासनांची मग शमेल वळवळ
घराचे मग होईल मंदिर
नित्य प्रेमे भजता ईश्वरll
नित्य प्रेमे भजता रघुवरll
      
 ll श्री गुरूदेवदत्तll

By

Shital Joshi,

Dombivli, India  

Wednesday 20 February 2019

अरे संसार संसार

बाईच बाईचा शत्रू असते असं नसून समोरच्या बाईच्या बोलण्या,वागण्याकडे आपण कशा दृष्टीकोनातून बघतो यावर शत्रुत्व की मित्रत्व की शुभचिंतक हे ठरवलं पाहीजे.  असं पल्लवी,  माझी वयाने छोटी पण प्रगल्भ विचारांची मैत्रीण मला गप्पांच्या ओघात म्हणाली.

खरं सांगू, मी तिच्या वयाची असताना खरंच इतकी समजूतदार नव्हते.  बाईच बाईला छळते, शत्रू असते, घर मोडते इत्यादी मतं माझीही होती.  याला कारण तेव्हाची आजूबाजूची परिस्थिती, काॅलेज संपायच्या आधीच लग्न झालेलं अशी अनेक कारणं असू शकतील नव्हे होतीच.

सासरी आम्ही रहात असलेल्या इमारतीत अक्षरशः सर्व धर्माची बि-हाडं होती.  आगरी,  सिंधी, ख्रिश्चन, मराठा, सोनार, मुस्लीम, सीकेपी, ब्राह्मण.  बरं यात सासूबाईंच्या वयाच्या तिघीजणी होत्या.  माझ्यासारख्या नव्या सासूरवाशिणी चार जणी होत्या.  आणि चार पाच जणी दोन मुलं/ एक मुलं आणि राजा-राणी अशा टाईपच्या होत्या.

तिन्ही अहो आई (आगरी, मराठा आणि ब्राह्मण) यांच्या गप्पा ओघानेच सुना, घरकाम या विषयाकडे वळायच्या आणि कळत नकळत त्याचे पडसाद आमच्या घरातही उमटायचे.  त्या तुलना, टोमणे नको व्हायचे.  मी माझी नोकरी बरी आणि घरी आलं की घरातली कामं, वाचन टी.व्ही बघणं बरं या स्वभावाची होते तरीही हमखास कोणीतरी बिल्डींगमधलंच (बाईच बरंका) आईंबद्दल काहीतरी सांगेच.  कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी मनात ते ठसठसत राहीच. यात भर म्हणून की काय आईंनी मला स्पष्ट सांगून टाकलं होतं "की मी काही मुलीची जबाबदारी अजिबात घेणार नाही".  मला वाटे मावशींची मुलं बरी सांभाळता आली ह्यांना. बहिणीची, भावजयांची वाळवणं, पापड, फेण्या, हळदी, तिखटं बरं धावून धावून करता येतात. फक्त माझ्यासाठी काही करता येत नाही.

आईला ही अशी कुरकुर केली की आई मलाच समजावे. "सुरेख, असं नसतं गं!  लहान मुलाची जबाबदारी खूप असते. इतर कामं परवडतात.  पण मुलांचे हट्ट, खाणं पिणं करण्यात दमछाक होते. आडनिड्या वयाच्या मुलांना ना उचलून घेता येत ना ओरडता येत.  त्यातून काही वयानंतर मनाची तयारी असते. पण शरीर साथ देत नसतं".

आईचाही मला जाम राग येई.  वाटे माझी आई माझं दुःख समजून घेतच नाहीये.  वाद व्हायचे आमचे. आई मुलीला सांभाळायची त्याबद्दल टोकलं तर म्हणायची,"माझी अजून पंचेचाळीशी पण आली नाहीये.  झेपतंय तोवर सांभाळणार नातीला. होत नाहीसं झालं की तेही सांगणारच तुला.  आत्ता तुला माझ्या मदतीची गरज आहे.  पैसा पैसा जोडणं तुला करणं आवश्यक आहे.  म्हणून मी मुलीला सांभाळतेय".

आता माझी पन्नाशी उलटल्यावर माझ्याच आयुष्यातल्या घटनांकडे मी त्रयस्थपणे बघते तेव्हा जाणवतं की केवळ आईच्या दबावामुळे, समजावण्यामुळे, संस्कारांमुळे आणि माझ्या तडजोड करण्याच्या वृत्तीमुळे आमच्यात टिपिकल सासूसुन संघर्ष झाला नाही. जगाला बघायला मिळाला नाही. पण मी आईंवर प्रेम, मायाही नाही केली. ब-याच गोष्टी कशा करू नयेत, कसं वागू नये हेच शिकले असं कडवटपणे मी आत्तापर्यंत सांगायची. पण आता मात्र मी तेव्हाच्या त्यांच्या स्थितीचा विचार करू शकते आणि त्यांच्याबद्दलचा मनातला सल बोथट होतोय हे जाणवू शकते. 

आईने मला घटनेकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन दाखवला नसता तर कदाचित सासूच्या छळाच्या कहाण्या माझ्याकडेही असत्या.  

आता मी सुनेची सासू होण्याच्या वयात आले आहे. पण हल्लीची मुलं खूप प्रॅक्टीकल आहेत. फारसा त्रास करून घेणारी नाहीयेत. भावनिक त्रास, गुंतवणूक करणारीही नसावित. तरीही मी सासू म्हणून, आई म्हणून, बाई म्हणून घरात येणा-या मुलीला, तिच्या वागण्याला कोणतीही लेबल्स न लावता स्वीकारायची तयारी ठेवली तरी आहे.  माहित नाही भविष्याच्या पडद्यामागे काय लपलंय. पण एक मात्र खात्री आहे नवरा  तेव्हा मला म्हणायचा "तू लहान आहेस ना! लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं." आणि आता म्हणेल, "अगं तू मोठी आहेस ना? तू नाही सांभाळून घ्यायचं लहान मुलीला तर कोणी घ्यायचं?"

By

Anagha Joshi

Talegaon, India

सत्याच्या प्रकाशात चालायचं असतं ते, एकट्यानेच!

 ‘तुंगा’ च्या बाबतीत सर्व शिक्षकांचं एकच मत होतं, ‘तिच्या चेह-यावरची माशी हलत नाही.’ पण वर्गात पहिल्या पाचात येणा-यात ‘तुंगा’ होती. बाकी कश्शा – कश्शात ती भाग घेत नसे. ना क्रीडा, ना संगीत, ना वक्तृत्व, ना नाटक. काहीही नाही. नाही म्हणायला तिच्या एका चलाख मैत्रिणीने ‘मी तुंगाला घेऊन नाटक करून दाखवीन’ असं आव्हान स्वीकारून तुंगाला नाटकात घेतलं. नुसतं नाटक नाही, ‘विनोदी’ नाटक. स्त्रीराज्यात सापडलेल्या एका मॅनेजरची त्रेधातिरपीट वर्णन करणारं नाटक. तुंगा त्यात पुन्हा पुन्हा बाळंतपणाच्या रजेवर जाणारी कारकून होती. प्रॅक्टिसच्या वेळी तुंगाचे संवाद अचूक पाठ असत. दिग्दर्शक मैत्रिणीचा तिच्यावर दृढ विश्वास होता. ‘तुंगा’ने तो सार्थ ठरवला. मैत्रिणीने तिला संवाद अगदी मोजकेच ठेवले होते. पण तुंगाने ते इतक्या ठसक्यात म्हटले की तिला हिणवणारे शिक्षकसुद्धा पाहत राहिले. 

    तुंगाला चांगले मार्क्स मिळाले. मायक्रोबायोलॉजी सारखा विषय घेऊन ती बी.एस.सी. झाली. पुढे खूप काही करू शकणारी तुंगा अचानक दूरध्वनी केंद्रात कामावर रुजू झाली. तेव्हा अनेक जण हळहळले. ‘तुंगा’ने शिक्षण पुढे न वाढवण्याचा आणि नोकरी करण्याचा निर्णय घरच्या गरिबीमुळे घेतला होता. त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा, पश्चातापाचा सूर कधीच कुणी ऐकला नाही.

    तिने आनंदाने नोकरी स्वीकारली. पुढे लोकांना तिने आणखी एक धक्का दिला तो म्हणजे तिच्याच ऑफिसात काम करणा-या सहका-याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन.

    सुरेश तिचा नवरा – चारचौघांसारखा, चारचौघांच्या रीतभातीत बसेल ते ते करणारा होता. दोघंही एके ठिकाणी नोकरी करतात म्हणून सुरुवातीला ऑफिसातल्या सहका-यांच्या प्रेमळ चेष्टेचा विषय बनले. पुढे पुढे लोकांना सवय झाली.

    सुरेशच्या घरी कडक स्वभावाची आई आणि वडील होते. सुरुवातीला काही दिवस सासूचा जाच तुंगाने निमूट सहन केला. नंतर ती सासूला शब्दात पकडू लागली. तिच्या बोलण्यात लॉजिक नसल्याचं दाखवून देऊ लागली. टिप-या अधूनमधून चालत. पण कधी विकोपाला गेलं नाही. कारण तुंगा इतक्या हसतमुखाने मजेदारपणे सासूच्या चुका दाखवून द्यायची. संतापणं नाही, धुसफूस नाही. शांतपणे आपल्याला हवं ते करत रहायची.

    काही वर्षांनी नोकरीत प्रमोशन मिळावं म्हणून वरच्या ग्रेडच्या परीक्षा देण्याची कल्पना पुढे आली. तुंगाने ती त्वरित उचलून धरली. सुरेशला काही ती कल्पना आवडेना पण त्याचा मित्र ‘अमित’ आणि तुंगाने त्याला भरीस घातले.

    तिघंही परीक्षेला बसले. अभ्यासाला लागले. सुरेशला ऑफिसातनं आल्यावर वेळ असायचा पण तो थोडावेळ झोपायचा मग टीव्ही पहायचा, मग जेवून झोपायचा.

    तुंगाला आल्या आल्या घराच्या, मुलांच्या सेवेत उभं रहावं लागायचं. सगळं आवरून झोपायला तिला खूप उशीर व्हायचा. बेडरुममध्ये आल्यावर ती सुरेशकडे पहायची. तो झोपला असेल तर शांत चित्ताने अभ्यासाकडे वळायची. जागा असेल तर पुस्तक खाली ठेवून गुपचूप त्याच्या शेजारी झोपायला जावं लागायचं.

    चहा – स्वयंपाक करताना, कपड्यांच्या घड्या करताना, डाळ-तांदूळ निवडताना, फर्निचरवरची धूळ साफ करताना, आंघोळ करून बाहेर आलेल्या छोट्याचं डोकं पुसताना, थोरल्या सोनूची वेणी घालताना तिच्या डोक्यात फक्त अभ्यासाचेच विचार असायचे. वाचलेल्या संकल्पना आठवायच्या, नवे प्रश्न पडायचे. उत्तर देणारं कुणीच नव्हतं. किंबहुना ठरलेल्या मजकुराबाहेर स्वतंत्र चिंतन असावे अशी अपेक्षाही नव्हती.

    अभ्यासासाठी घरातलं एखादं काम बाजूला ठेवलेलं चालत नव्हतं. सगळं दोरीत जिथल्या तिथे करावं लागायचं. पण तुंगाची तक्रार नव्हती. कशाबद्दलच. वेळ मिळत नाही. घरातले लोक मदत करत नाहीत, मुलं सारखं गुंतवून ठेवतात, या कशाबद्दलच नाही. सुरेशने अभ्यास करावा असं मात्र तिला वाटायचं. ती म्हणायची सुद्धा त्याला तसं. पण सुरेश लक्ष द्यायचा नाही. बघता बघता परीक्षा जवळ आली. याच काळात मुलांच्या परीक्षा होत्या. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं ही जबाबदारी होतीच. पहिल्या पेपरच्या दिवशी तिने, सुरेशने पहाटे उठून अभ्यास केला. पेपर समोर आल्यावर तिला एकदम हसू आलं. काय हे! बीएस.सी. नंतर जवळ जवळ १२ वर्षांनी ही वेळ. सुरुवातीला वाक्यरचना कशी करावी हेच सुधरेना. पेपर समोर ठेवून ती मूढपणे त्याच्याकडे बघत राहिली. ब-याच काळानंतरच एक सामान्य वाक्य तिच्या मनात तयार झालं. हे लिहिलं आणि झालं! लिहीतच राहिली. सुपरवायझर हातातून पेपर घ्यायला आले तेव्हा तिने लिहिणं थांबवलं.

    मान, पाठ, खांदे सगळं ठणकत असताना डाव्या हाताने उजवा खांदा दाबत ती बाहेर आली. सुरेशला पाहून आनंदाने धावत त्याच्याकडे गेली अन्‌ विचारलं, ‘‘कसा गेला?’’

    कपाळाला आठ्या घालून सुरेश म्हणाला, ‘‘कसा जाणार? अवघड!’’

    ती म्हणाली, ‘‘मला सोपा गेला.’’ सुरेशने चमकून तिच्याकडे पाहिलं, ‘‘तू सगळे प्रश्न लिहिलेस?’’

    ‘‘हो. एकूण एक.’’

    तेवढ्यात अमित आला, ‘‘सोपा होता यार’ म्हणत.

    तिघंही एका कट्ट्यावर बसले. तिथेच पेपर सोडवायला सुरुवात. ‘तुंगा’ची उत्तरं ऐकून अमित थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सुरेशने अस्वस्थ होऊन विचारलं, ‘‘काय रे अमित, काय म्हणतोस? किती मार्कस्‌ पडतील हिला?’’

    ‘‘ऐंशीच्या पुढे सहज’’

    हे उत्तर ऐकताच सुरेशचा चेहरा चपराक बसावी तसा झाला.

    ‘‘खरं म्हणतोस?’’

    ‘‘हो मग, बघच तू.’’

    सुरेश पुढे काहीच बोलला नाही. दोघेही आपापल्या गाड्यांपाशी गेले. तुंगा सुरेशचा चेहरा निरखून पाहत होती. त्याला काय बोचतंय याचा अंदाज तिला आला होता. त्यामुळे तिनेही स्वतःचा आनंद आवरता घेतला.

    परीक्षेसाठी दोघांनीही रजा घेतली होती. त्यामुळे घरीच आले. आईने उत्सुकतेने विचारलं, ‘‘कसा गेला?’’ एकाचवेळी ‘‘चांगला’’ आणि ‘‘वाईट’’ अशी उत्तरं आली. आईचाही चेहरा पडला. ती सुरेशला म्हणाली, ‘‘हिला सोपा न्‌ तुला अवघड गेला होय? आता हिला जास्त मार्क न्‌ तू नापास झालास तर?’’

    आईचं हे डायरेक्ट बोलणं सुरेशला मानवलं नाही. तो खेकसून म्हणाला, ‘‘कायतरी बोलू नकोस गं!’’ आईने भांडी लावण्याच्या निमित्ताने आदळआपट सुरू केली. तोंडाने काहीतरी रागारागात पुटपुटणं चालूच होतं. सुरेश वर निघून गेला. थोड्यावेळाने तुंगा बेडरूममध्ये आली.

    ‘‘काय झालं? बरं वाटत नाही का? आज लवकर उठलोय पहाटे. झोप झाली नाही. थोडं झोपूयात.’’ सुरेशचा चेहरा अतिशय चिंतामग्न दिसत होता. तुंगा त्याच्याशेजारी झोपली. त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.

    ‘‘कसला विचार करता एवढा? काही टेन्शन आहे का?’’

    ‘‘तुंगा...’’ सुरेश इतक्या घोग-या आवाजात बोलला, की त्याला स्वतःलाच दचकल्यासारखं झालं. तुंगा तर उठूनच बसली तो आवाज ऐकल्यावर.

    ‘‘तुंगा...’’ सुरेश तिच्याकडे न पाहता समोरच्या भिंतीकडे पाहत बोलायला लागला. ‘‘तुंगा, मी जे बोलतोय ते नीट ऐक. असं समजू नकोस, की तुझी प्रगती पाहून मला वाईट वाटतंय. पण आपण ज्या समाजात रहातो तो एवढा पुढारलेला नाही. इथं पुरुषापेक्षा एखादी बाई श्रेष्ठ ठरते ही कल्पना लोकांच्या पचनी पडत नाही. अशा मागे पडलेल्या पुरुषाकडे लोक फार विचित्र नजरेने पहातात, जणू तो नपुंसकच असावा.’’

    तुंगाला हळूहळू अंदाज यायला लागला होता सुरेशला काय बोचतंय याचा. पण त्याच्या पुढच्या वाक्याने तिच्यावर बॉम्बच पडला.

    ‘‘माझी तुला कळकळीची विनंती आहे, तू उद्याच्या परीक्षेला बसू नकोस.’’

    ‘‘काय?’’

    ‘‘हो तुंगा, तू एवढ्या मार्कांनी पास झालीस आणि मी नापास झालो तर... तू विचार कर. आपल्या मुलांना काय वाटेल? आईला एवढे मार्क आणि बाबा नापास? तू विचार कर माझ्या आई-बाबांना काय वाटेल?’’

    तुंगा थिजल्यासारखी ऐकत होती. आपोआपच तिची मान नकारार्थी हलायला लागली. ते पाहून एक्साईट झालेला सुरेश जोरजोरात बोलायला लागला, ‘‘तू पास झालीस तर तुला प्रमोशन मिळेल आणि ट्रेनिंगसाठी वर्षभर पाठवतील. आपल्याला कसं जमणार ते? एक वर्षभर तू बाहेर रहाणं? मुलांचं कोण करणार? आईबाबांचं कोण करणार? ते काही खरं नाही. मला याच मुद्यासाठी तू परीक्षेला बसायला नको होतीस. मी काही इतका क्षूद्र नाही की तुझ्या यशाने नाराज होईन. पण आपण संसार मांडलाय तर आपणच तो सांभाळायला हवा, नाही का? तो विखुरला तर काय उपयोग? माझं एवढंच म्हणणंय की आत्ता तू बसू नकोस. वाटलं तर... वाटलं तर पाच-सहा वर्षांनी दे परीक्षा. काय मोठासा फरक पडतो. मुलं पण मोठी होतील तोवर.’’

    तुंगा अवाक्‌ होऊन त्याच्या रणनीतीला मनोमन दाद देत होती. तिचं नकार देणं आता थांबलं होतं. सुरेशने अजिजीने तिच्या गळ्यात हात टाकून म्हटलं, ‘‘ऐकशील ना एवढं माझं?’’ तुंगा काहीच बोलली नाही. तिने उशीवर मान टेकवली तेव्हा खळकन्‌ एक अश्रूंनी धार तिच्या गालावर ओघळली. सुरेश ते पाहून तडकून म्हणाला, ‘‘हे बघ, मी काय अन्याय बिन्याय करतोय तुझ्यावर, असं समजायचं कारण नाही. मी हे सगळ्यांच्या भल्याचंच सांगतोय. याउप्पर तुझी मर्जी.’’ तो उठून खाली निघून गेला. त्याच्या चेह-यावरचा ताण आता कमी झाला होता. 

    चार भिंतींच्या चौकोनी पेटीत पलंगावर पडलेलं तुंगाचं शरीर आणि मन निर्णयक्षम राहिलं नव्हतं. डोळ्यातल्या धारा थांबत नव्हत्या. बीएस.सी. ला असताना तिच्यावर प्राध्यापकांच्या आशा केंद्रित होत्या. ती एमएस.सी. करणारच हे प्रत्येकाला ठाऊक होतं. बीएस.सी.चा रिझल्ट घेऊन ती घरी आली. धो धो मार्क्स होते. बाबा थकलेल्या, मिणमिणत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाले, ‘‘तुंगाक्का, आता नोकरी शोधायला लागा. माझ्या एकट्याच्या पगारावर किती काळ रेटायचं हे सारं. मकरंदचं पण शिक्षण व्हायचंय. त्याला इंजिनियर करायचंय.’’

    मकरंद इंजिनियर होणार नव्हता. सिग्रेटी फुंकत गावभर पोरींच्या मागे फिरण्यात त्याचे दिवस चालले होते. पण आईबाबांच्या त्याच्यावर केंद्रित झालेल्या आशा शाबूत होत्या. ..... अशी कुठली वेळ असेल जेव्हा आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला घेता येईल? कदाचित आपलं लग्न झाल्यावर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळेल’ असं वाटून तुंगाने लगेच नोकरी मिळवली, लग्नही केलं. आणि आता शिक्षणात कर्तृत्व दाखवण्याचं तिचं स्वप्न पुन्हा एकदा संपलं...

    ती खाली आली. घरात सगळेजण तणावरहित अवस्थेत वावरत होते. तिने चहाचं भांडं घेतलं. गॅसवर आधण ठेवलं. दुस-या शेगडीवर दुधाचं पातेलं ठेवलं. ओट्याला टेकून ती आपल्याच घराकडे स्वतःतून बाहेर पडल्यासारखी पहात राहिली.

    रात्री ती बेडरूममध्ये आली तेव्हा तिच्या मनात काहीही खळबळ शिल्लक नव्हती. चेहरा नेहमीसारखाच शांत होता. प्रति रणनीती तिच्या डोक्यात तयार होती. 

    सुरेश तिच्याकडे पाहून हसला. त्याच्या दृष्टीने आता कोणतंच टेन्शन राहिलं नव्हतं. तुंगा त्याच्याजवळ बसली आणि अतिशय निर्धाराने बोलली. ‘‘मी परीक्षेला बसणार आहे. आपल्या सर्व कुटुंबाला वर नेणारी ही संधी आहे. ती केवळ ‘इगो’ पायी गमावणं मूर्खपणाचं आहे. वर्षभर मला बाहेर जावं लागेल. तेवढा काळ आई-भाऊ मुलांना सांभाळतील. त्यांच्या मदतीला आपण एखादी बाई ठेवू कामाला. तुम्ही स्वतः घरात थोडं लक्ष घाला. मुलंही आता खूप लहान नाहीत. स्वतःचं करू शकतात. माझं प्रमोशन झालं तर दर आठ दहा दिवसांनी मी येईनच. पण आपला परिस्थिती किती सुधारेल याचा विचार करा. मुलांच्या शिक्षणासाठी या अवघड काळात किती पैसे लागतात विचार करा. माझ्या मनात तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाढेल. दोघांपैकी ज्याला जे जमेल ते त्याने करावं. सबंध घराच्या प्रगतीसाठी मी कष्ट करीन. तुम्ही त्याग करा. काय हरकत आहे?

    सुरेश काही बोलला नाही. पण ‘तुंगा’ चा प्रॅक्टिकल अप्रोच टाकून देण्यासारखा नक्कीच नव्हता. काय हरकत आहे?

    दुस-या दिवशी ती काही न बोलता तयार झाली. सुरेशबरोबर पेपरला गेली. पेपर लिहिताना पहिला आनंद, महत्त्वाकांक्षेची एक्साईटमेंट काहीही राहिलं नव्हतं. वारंवार डोळे भरुन येत होते. निर्जीवपणे ती लिहीत राहिली.

    अखेरीस रिझल्ट लागला. व्हायचे तेच झाले. ती डिस्टिंक्शनचे गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि सुरेश नापास झाला !

    रिझल्ट हातात पडल्यावर सुरेशच्या चेह-यावर संताप स्पष्ट दिसला. ‘‘सांगितलं होतं तुला मी. किती नाचक्की होईल आता माझी’’ आपल्या नापास होण्याचा संबंध आपल्या अकार्यक्षमतेशी नसून तुंगाच्या गुणवत्तेशी आहे असंच त्याला वाटत राहिलं.

    ‘तुंगा’ला आनंद झालाच होता. आपल्या उत्तम गुणांचा योग्य तो अभिमान तिला वाटत होता. माझ्यात अजूनही ‘ते’ आहे जे मी विसरून गेले होते, असं तिला वाटत होतं.

    दारात सासूसासरे वाट पहात होते. त्यांनी दारातच सुरेशला हटकलं. तो चिडून म्हणाला, ‘‘आत तर चला ना?’’

    आत गेल्यावर रिझल्ट फेकून देत म्हणाला, ‘‘नापास झालो! कळलं का, नापास झालो!’’

    ‘‘अगंबाई!’’ सासूबाई मटकन्‌ सोफ्यावर बसल्या. अन्‌ सुरू झाली रडारड. सगळे रडायला लागले.

    तुंगाला वाटत होतं, आपल्या मार्कांमुळे सुरेशच्या अपयशाचं दुःख लोक विसरतील पण त्यांनी कुणीही तिला विचारलं सुद्धा नाही. कुणीतरी ‘गेल्यासारखी’ रडारड चालू राहिली. तुंगा थक्क होऊन त्या तमाशाकडे पाहत राहिली.

    माहेरच्या अणि सासरच्या घरात आपले असे काय होते? आपल्या सुखदुःखाचे भागीदार कोण होते? स्वयंपाकघराच्या पडद्यापाशी उभं राहून ती रडणारी त्रिमूर्ती पाहताना तिला लख्ख जाणवलं, हा प्रवास एकट्याचाच असतो.

    काही काळ काही भ्रम असतात आपल्याबरोबर. ते भ्रमच असतात, सावल्या असतात.

    जेव्हा ज्ञानाची जाणीव फुटते तेव्हा आपल्याला सोडून जातात ते. जावंच त्यांनी. 

By

Sujata Mahajan

Chicago, USA