मला चित्र आणि चित्रकला ह्यातल्या प्रोसेस बद्दल लिहिताना मजा अशी
वाटते की खरंतर खूप आतलं काहीतरी असावं हे प्रत्येकाचं. मी चित्र काढते
ठेवढ्यापूरते ते डोक्यात नसून एक धागा असंख्य काळ मी डोक्यात घोळवत असते
आणि एखाद्या अनुभवाचे अनेक पैलू चाचपडून बघत असते. माझ्या सायकॉलॉजी च्या
शिक्षणाचा आणि organizational behavior चा मला खूप उपयोग होतो कारण मला
परिस्थिती अनालाईझ करायची सवय लागलेली आहे. त्याचा माझ्या वयक्तिक आयुष्यात
ताण पडत असला तरी इथे ती सवय मी नीट चांनेलाइज करू शकत आहे, प्रयत्न तरी
तो आहे. मी स्वतःचे अनुभव किव्हा दुसऱ्यांचे भावलेले अनुभव अभिव्यक्ती
ह्यावर काम करते. गाणं संगीत हा एक मोठा भाग आहे माझ्या आयुष्याला. हा
प्रवास आतला आहे.
सर्व आहेत. पण ही विशेष जवळची.
By
Winnie Mahajan
Pune, India
Choose to look away म्हणून माझे एक 4 फूट चित्र आहे.
ते मी रित्या नावाच्या गाण्यावरून आणि कितीदा नव्याने तुला आठवावे ह्या
गाण्यावरुन प्रेरित होऊन काढले होते. त्यात मला खचाखच भरून पावलेली
रिक्ताता दाखवायची होती. आणि सगळ्या व्यावहारिक गोष्टींमधून स्वतः ला
अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न रेखटायाचा होता. एक अठवडा मी दिवस रात्र ते काढत
होते. माझ्या मनाचे सर्व पदर मी त्यात ओतले होते. पण काहीतरी उरले असे
वाटायचे. खूप दिवस उभ्या ठेवलेल्या त्या canvas कडे मी बघत राहायचे. मग एक
दिवस मला सुचलं काय कमी आहे. त्यात एका व्यक्ती ची गरज होती. मी तिला त्या
चित्रात पाहू शकत होते. फिगर्स काढायची भीती वाटत होती पण त्या काळात
भीतीला मात करायचा माझा पण होता. मी ती फिगर काढली आणि आसपास संसारिक
उथळपणा पण मांडायचा प्रयत्न केला आहे. तिचे डोळे झाकलेले आहेत कारण तिला
काही बघायची इच्छा नाही. She wants to stay with herself. अशा चित्रांमध्ये
पेन्सिल चा वापर न करता direct काढते. ही माझी शैली आहे.
Manmarziyaan
चित्रपट बघून indecisive पणा, पाळणारा स्वभाव, आणि इतर उथळपणा मुळे
आयुष्याचा होणारा खेळ मला मांडायचा होता. मुळात दोन लोकांच्या प्रेमात आणि
तटतुटी मध्ये किती लोक आयुष्यावर प्रभाव करतात. अनेकदा तो अनावश्यक असतो
असे मला मांडायचे होते. अशात एक जण फॅमिली ट्री सोडून जाण्यास असतो तेव्हा
होणारी स्त्रीची कुचंबणा. तिला स्वैर होता न येणं. तिला स्थिर ठाम राहवं
लागणं तरीही वेदेनेने हळू हळू निर्विकार होणं. हा प्रवास kiwha अनुभव
दाखवायचा प्रयत्न.दुस्वास करण्यापासून प्रेम निष्पन्न होऊ शकत नाही. मनात
आलं की उठून निघून जाऊ शकत नाही. आयुष्यातले प्रश्न हे आयुष्यात राहून
सोडवावे लागतात असा माझं मत आहे. प्रयत्न चुकतात. दिशा चुकते पण प्रयत्न
करावे लागतात.अमृता प्रीतम च्या या कवितेनी आणि दर्या नावाच्या गाण्यांनी
प्रेरित हे चित्र. माणूस विसरला आपल्याला म्हणून होणारं हतबल मन फेसलेस
झालं आहे. समाज, परिस्थिती मध्ये चेहऱ्याचवर नक्की कुठली भावना प्रगट
व्हावी कुठली झाकवी अशी परिस्थिती. हे 7 फूट चित्र आहे.
ही दोन चित्र माझ्या हृदयाचा भाग आहेत.
सर्व आहेत. पण ही विशेष जवळची.
By
Winnie Mahajan
Pune, India
खूप छान!
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteवा.. छानच
ReplyDeleteGreat
ReplyDelete