देहाचे घर होईल सुंदरl
नित्य प्रेमे भजता ईश्वरll (रघुवर)ll
कामक्रोध रिपुंचा कचरा
अहं ममतेचा चिवट पसारा
आशा तृष्णा वादळवारा
निघून जाई सत्वर
भजता प्रेमे हा ईश्वर(रघुवर)ll
सदनातील या दृश्य व्यक्ती
अवघ्या मिळूनी करतील सत्कृती
अदृश्यांची विषयनिवृत्ती
वृत्ती होतील स्थिर
प्रेमे भजता हा ईश्वर(रघुवर)ll
अंतर्बाह्य मन होईल निर्मळ
सद्ग्रंथवाचन करता सोज्वळ
सत्संगाचे दिव्य पाठबळ
वासनांची मग शमेल वळवळ
घराचे मग होईल मंदिर
नित्य प्रेमे भजता ईश्वरll
नित्य प्रेमे भजता रघुवरll
ll श्री गुरूदेवदत्तll
By
Shital Joshi,
Dombivli, India
No comments:
Post a Comment