अहो बाबा ते अरे
बाबा, प्रवास विलक्षण आहे, असतो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
आपल्या
सगळ्यांचाच तो वाटाड्या असतो,
कधी धाकात, तर
कधी मिशितल्या मिशीत हसतो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
दिवस रात्र काम
करताना, मुलांच्याच विचारात मग्न असतो,
स्वतःच्या पायात
चप्पल नसली तरीही मुलांसाठी काय घेता येईल,
ह्याचा भुंगा
घोंगावत असतो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
मुलांसाठीची
स्वप्न आणि डोळ्यांत साठवलेली त्यांची कौतुकं,
असा हा मिश्र
भाव असतो,
बायकोच्या
साथीने सांसाराचा गाडा पुढे पुढे ढकलत असतो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
म्हणता म्हणता
पिल्लं घरटी सोडून जातात,
कधीतरी “बाबा”
अशी प्रेमाची, हक्काची हाक पुन्हा येईल,
म्हणून गॅलरीत
सतत घुटमळत रहातो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
आयुष्याच्या
सायंकाळी, समुद्राच्या रुपेरी वाळूत,
जमा, वजाबाक्या
मांडत बसतो,
क्षितिजावर
मावळणारा सूर्य मग, बरंच काही सांगून जातो,
अहो असो किंवा
अरे, बाबा हा बाबाच असतो!
By
K. Vrishali
Reading, UK.
No comments:
Post a Comment