Thursday, 29 August 2019

कृष्णपद

स्पर्शिता चिमुकले कृष्णपद, 
दुभंगला उफाळता यमुना नद, 
हर्षावेगे वसुदेव, सत्वरी पार झाले गोकुळी, 
पुत्ररक्षणा, गाठिले नंद-द्वार, बिकट त्या संकटकाळी, 
दैवी योगायोगाची अद्वितीय ती खेळी, 
नंदाघरी होती निपजली एक राजस बाळी, 
अपराधी मने, वसुदेवांनी उचलली ती नंद-बाळी, 
अन हृदयाचा तुकडा केला, प्रसव-निद्रिस्त यशोदेच्या हवाली!
मोह आवरत, वसुदेव परतले आले त्याच पाऊली, 
मृदुलस्पर्शी, अनुपमेय ते बाळ अलगद जाऊन बिलगले यशोदेला, 
सरली ग्लानी, मोहरली काया होता अपत्यस्पर्श पहिला, 
डोळे भरुनी, प्रथमच, यशोदेने पाहिले निज बाळाला!
अत्यानंदे, ममत्वाने तिचा पाझरू लागला पान्हा, 
जन्म जन्मांतरी तिचाच असल्यागत तिचे स्तन्य लुचू लागला कान्हा!

By

Akanksha Phadke

Mumbai, India

No comments:

Post a Comment