Tuesday, 1 January 2019

मराठी कविता


शब्द, शब्द, शब्द, मनात दाटून येती,
अन मग लेखणीतून झर झर झरती,
सुखावून मला त्या वर्षावात, चिंब भिजवती,
शब्द खुणावती, शब्द मोहवती,
माझ्याभोवती फेरही धरती,
तालावर त्यांच्या, मला नाचवती,
शब्दातीत सुंदर, त्या दुनियेत नेती,
परमानंदाची देती अनुभूती!

----

मन खट्याळ,
मन जंजाळ,
कधी मधाळ,
तर कधी बंबाळ,
मन निरागस,
तर कधी विवश,
कधी तरी अपराधी,
कधी मुक्त, स्वच्छन्दी,
वेग त्याचा अनावर,

सावरू पाहता, होई फरार!!

By

Aakansha Phadke

Mumbai, India


No comments:

Post a Comment