Friday, 31 May 2019

Broccoli bites

Broccoli bites 


Ingradients:
500gms Broccoli,
1 cup parmesan cheese,
1 cup oats,
2 eggs,
crushed black pepper,
2 tbps bread crumbs,
1 tbps garlic-jinger paste,
salt to taste

Procedure
1. Steam fresh broccolis for 10 mins, so you get boiled Broccolis.

2. Add bread crumbs, eggs, oats, cheese, crushed black pepper and salt in to mixture.
3. Make small balls of this mixture and keep on tray, which is already greesed with olive oil.

4. Bake these balls at 180 deg temperature for 25-30 mins. The top of the balls become brownish, that means they are baked well.

5. Serve with ketchup or balsamico cream.

Additional tips
1. Add salt carefully becuase egg, broccoli and bread crumbs are salty ingradients.

Prachi Karekar ---Stuttgart, Germany

उंदरायण


बरेच दिवस पाणी नव्हतं म्हणून धुण्याचे कपडे साठवून ठेवले होते. लोखंडी कपाटाशेजारच्या मोकळ्या जागेत खोचून ठेवले होते. आज पाणी आलं म्हणून ‘शरावती’ ते सगळे भिजवण्यासाठी काढायला लागली आणि लपकन्‌ एक लांब काळीशेपटी हलली, एक जाड काळं धूड चमकून अदृश्य झालं आणि तिच्या हृदयाचा
थरकाप झाला. उंदीर! नक्कीच उंदीर! आधी मन कबूल होईना. चौथ्या मजल्यावरच्या आर.सी.सी. बांधकामाच्या नव्याको-या फ्लॅटमध्ये उंदीर येणं कसं शक्यय? हॅ! उंदीर नसणार, पाल असेल पाल. किती नाकबूल केलं तरी डोळ्यांनी पाहिलेली प्रतिमा उंदराचीच होती हे मनात डाचत राहिलंच.मग एकदम असुरक्षित वाटायला लागलं. घरात उंदीर असू शकतो ही कल्पनाही नसल्यामुळे स्वत:चं बेदरकार वागणं आठवलं. उदा. कपाटाजवळ पलंग.पलंगावर तिचं बाळ झोपतं. ते झोपलं की कपाट उघडता, लावता येणार नाही म्हणून ते झोपेत
असतानाच कपाटाची दोन्ही दारं ती सताड उघडून ठेवायची कारण त्याच्या झोपेच्या काळातच तिला सारखं काही न काही कपाटातून लागायचं. अशी दारं दोन दोन तास उघडी रहायची. मग दारातून कपाटात शिरून त्याने आतल्या मालावर कधी हल्ला केला नसेलच का? आत सगळे बाहेरचे कपडे, पुस्तकं, वाचायला आणलेले थिसिस,
महत्त्वाची कागदपत्रं कितीतरी होतं . याने काय काय खलास केलं असेल? कपाटापाशी मच्छरदाणीची गुंडाळी खोचलेली होती. महाराज त्यात बसलेले होते. काय करू मी?वरच्या फ्लॅटमधला तरूण पोरगा ‘विक्रम’ तिला आठवला. धिप्पाड पर्सनॅलिटीचा. वाटलं, तो एक मिनिटात करेल आपलं काम, पण ‘विक्रम’ फारच घाबरट निघाला. सरळ ‘नाही’ म्हणाला. ते म्हणताना त्याची मान लगालगा हलली, जणू ती त्याला धरूनच नेणार होती. ओठ ‘नाही’ शब्दाबरोबर थरथरत राहिले. ‘हात तुझी रे विक्रम’ असं मनात म्हणत ती खाली आली.
गॅलरीत उभी राहून ती सोसायटीतल्या सगळ्या घरांकडे पाहत राहिली. एका घराबद्दलही असा विश्वास वाटेना की तिथे एखादा माईचा लाल असा असेल, जो न भिता उंदीर मारायला पुढे होईल. सगळी आपल्यासारखीच भित्री वस्ती. खरं म्हणजे तिला त्या उंदराला मुळीच मारायचं नव्हतं, फक्त त्याला घरातनं बाहेर काढायचं होतं.
पण तेही होईना तिच्याच्याने.तिने असं खूप बौद्धिक लढवून पाहिलं, आपल्याला उंदीर हाकलायला पुरुष
कशाला पाहिजे? फक्त पुरुषांचाच धिटाईशी संबंध असतो असं कुठंय? मध्यंतरी आपल्याहून लहान वयाच्या आपल्या जावेने हा महापराक्रम करून दाखवलाच होता की! ओट्यावर पिशवीत बसलेला उंदीर तिने पाहिला तेव्हा गपकन्‌ पिशवी उचलली. तिचं तोंड बांधलं आणि चक्क चालत चालत गेटपर्यंत जाऊन सोडून आली. तिने हा पराक्रम सांगितला तेव्हा तिच्या धिटाईचं तोंड भरून कौतुक केलं पण ते नुस्ते शब्द होते. उंदीर मारायला किंवा हाकलायला किती प्रमाणात धिटाई अपेक्षित आहे हे कुठं माहीत होतं तेव्हा. नुस्तंच शाब्दिक कौतुक.तर मुद्दा हा की, बायकाही उंदीर हाकलू शकतात. हे भलतंच झालं. आता मुद्दा हा पुढे आला की, आपण का हाकलू शकत नाही उंदीर? परिस्थिती तिच्यासमोर स्पष्ट होती. उंदीर गुंडाळीत होता. गुंडाळी उचलून फक्त गॅलरीतून खाली झटकायची होती. आपण का झटकू शकत नाही? हा या परिस्थितीतला प्रश्न होता. कुठे पळू, कुठे पळू या प्रश्नापासून असं तिला झालं. तिने स्वतःला खूप समजावलं जर उंदीर गुंडाळीत व्यवस्थित बसलेला असेल तर अनपेक्षितरीत्या फटकन्‌ गुंडाळी उचलायची न्‌ तीन सेकंदात गॅलरीतनं खाली झटकायची. आहे काय न्‌ नाही
काय? मग? का जमत नाहीये? समजा, तो तिथल्या तिथेच गुंडाळीतनं बाहेर पडून आपल्या अंगावर आला.
आपल्या हाताला, पायाला कुठे त्याचा स्पर्श झाला तर? काय होईल? स्पर्शाला इतकं का भ्यायचं? तो काय हातावर, पायावर बसून राहणार आहे? एका क्षणात ती घटना घडणार. आपण घटनेच्या वेगाला घाबरतो की त्याच्या काल्पनिक स्पर्शाला? की त्याच्या समग्र दर्शनालाच! कारण मगाशी आपल्याला जे दर्शन झालं ते फक्त उंदीर ही वस्तू कळण्यापुरतंच होतं. या भीतीची मुळं शोधण्याची तिची धडपड तिची तिलाच असह्य होत होती.
कशाला या फंदात पडतेस असं कुणीतरी जोरजोरात परिस्थितीपासून दूर ढकलत सांगत होतं. उंदीर जवळून कसा दिसत असेल? त्याच्या डोळ्यात काही भाव असतील का? त्याचा स्पर्श कसा असेल? त्याने आपल्या अंगावर कुठेही उडी घेतली तर तेवढ्या त्वचेला कोणत्या संवेदना होतील? खरखरीत? मऊ? लिबलिबीत? हे सगळं तिने
कल्पनेने अनुभवून पाहिलं. एवढ्यानेच छातीत धाडधाड वाजायला लागलं. काय पुळचट सुशिक्षित आपण. आयुष्यभर फालतू गोष्टी शिकत राहतो, उपयोगाच्या शिकत नाही. प्रश्नाची दुसरी बाजू ही होती, की नाही ना आपण उंदीर हाकलू शकत? मग विसरून जा. आपण उंदीर नाही, पाल पाहिली असं समजायचं पण तेही जमण्यासारखं नव्हतं. उंदराला पाल समजायचं? पाहिलाच नाही असं समजायचं? पाल काय
उंदराइतका उत्‌मात करते का? शेवटी ती भांडीवाल्या आजीबाईची वाट पहात राहिली. त्या आल्या. घाईघाईने
तिने त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी,‘त्यात काय एवढं घाबरायचं!’ म्हणत मच्छरदाणीची गुंडाळी उचलली. गॅलरीत नेऊन झटकली पण उंदीर त्यातून बाहेर पडला नाही. आजीबाईंना उंदीर सापडण्याची निकड नव्हती. त्यामुळे त्या ‘उंदीर नाय्‌ न काय नाय्‌’ म्हणत उठल्या देखील, तिला मात्र उंदीर सापडण्याची निकड होती
त्यामुळे तिने त्यांना दाबून पुन्हा खाली बसवलं. पलंगावर उभं राहून अवजड कपाट सरकावलं. पलंगावरून कपाटामागे वाकून पहाताना ती दिव्य आकृती पुन्हा दिसली तिला. तिने आजीबाईंना सांगितलं, ‘आहे, आहे. आज्जी, कपाटाच्या मागेच आहे.’ आणि रणभूमीवरून पळून बाहेरच्या खोलीत जाऊन थेट पलंगावर उभी राहिली. आजीबाईंनी पाहिलं, सुटका दिसत नाही. त्यांनी काठीने खुडखुड करायला सुरुवात केली. पाचच मिन्टात आजीबाईंचा चीत्कार ऐकू आला, ‘पळाला हो पळाला.’ म्हणजे शंभर टक्के उंदीरच! हे क्लेशकारक सत्य तिने पचवलं. दुसरं आता आणखीन धावपळ करायला लावणारं क्लेशकारक सत्य म्हणजे तो घरातच दुसरीकडे
कुठेतरी लपून बसलाय. ही दोन्ही सत्यं स्वीकारून ती स्वयंपाकघरात गेली. पहिल्यांदा कमालीची चतुराई
दाखवून बेडरूमचं दार लावून टाकलं. बाथरूम, संडासची दारं लावून टाकली. मुख्य दरवाजा सताड उघडा ठेवला. हेतू हा की सद्‌गृहस्थाने सभ्यपणे घराबाहेर व्हावे. स्वयंपाकघर! डबेच डबे. लपायला अनेक सापट्या, फ्रीजजवळ दुधाच्या पिशव्यांचे गठ्ठे, गॅस सिलेंडरजवळ तवा, खलबत्ता, पोळपाट-लाटणं वगैरे. सगळे डबे सरकवत आजीबाई शोधत राहिल्या. ती खुर्चीवर सुरक्षित उभं राहून काठीने फ्रीजजवळ खुडखुड
करत त्यांना मदत करायला लागली. इतक्यात फ्रीजच्या मागच्या तारांच्या जाळ्यात शेपटी थरथरताना दिसली.
महाराज चकणी नजर करून तिच्याकडेच पहात होते. तेवढ्यातल्या तेवढ्यात वाटलं, या प्राण्यांना मृत्यू हातभर अंतरावर समोर दिसतो आणि आपण मृत्यू आपल्याला कधीही येऊ शकतो हे सत्य फक्त शब्दस्तरावरच मान्य करतो. आता आपण असे खुर्चीवर उभे असताना आपल्याला मृत्यू येऊ शकत नाही का? येऊ शकतो पण
आपल्याला तो अजिबातच दिसत नाही. दिसला असता तर...शेवटी तो आजीबाईंच्या हाती लागला नाहीच. आजीबाई शोधताना पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, ‘त्यो काय करतोय? चावत नाय्‌ न काय नाय्‌. त्याला कशापायी
घाबरताय एवडं? त्यालाबी आपल्या जिवाची भीती असते ना!’
आजीबाईंच्या अंगवळणी पडलेलं वास्तव ती मात्र स्वीकारायला तयार नव्हती. अखेर शेवटचा डबा दाणकन्‌ सरकवून त्यांनी शोध संपल्याचं जाहीर केलं, ‘कुटं बी न्हाई. त्या काय राहतोय व्हय येका जागी, पळून ग्येला आसंल.’ ती घराच्या कानाकोप-यात पाहू लागली. उंदीर नुकसान करू शकेल असं कुठे कुठे, काय काय होतं याची यादी करू लागली. सगळंच नजरेसमोर यायला लागलं. माळ्यावर एवढी रचून ठेवलेली पुस्तकं, कपाटावर न लागणा-या पांघरुणांचा ढीग, माळ्यावर न लागणा-या ब-याचशा प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या,
साठवलेल्या खूप पिशव्या, विविध मासिकं - वर्तमानपत्रांची चवड, सर्वत्र पसरलेलं, सगळीकडे भरून असलेलं, आपल्या संसाराचा मोठ्ठा भाग व्यापून असलेलं, न लागणारं सामान. कशासाठी आपण साठवलंय एवढं? या सगळ्या प्रपंचाची कारणीभूत स्त्री आपणच? अरेरे, किती मूर्ख आपण ! कागदाचे एका बाजूने लिहिलेले, चुरगाळलेले हजारो कपटे ठेवलेले पर्यावरण प्रेमापोटी प्रत्येक गोष्टीचा पुरतेपणी उपयोग व्हावा
म्हणून. असाच वाढवत, वाढवत नेला होता संसार. सुहृदांची, मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची शेकडो पत्रं जपलेली, निरनिराळ्या पार्सल्समध्ये. पिशव्यात वीस-बावीस दैनंदिन्या, ज्यात टीचभर आयुष्यात कोण आपल्याशी कसं वागलं, कोण काय बोललं? कोणी प्रेम उधळलं? हजारो घटनांचे, व्यक्तींचे अनावश्यक तपशील.
‘तू खूप ढोंगी आहेस’ असं एकजण तिला सायकल हातात धरून तिच्या घराच्या दारापुढे उभा राहून ओट्यावर उभ्या तिच्याकडे पाहत म्हणाला होता. तिच्या गलथानपणामुळे पावसात पांघरूणं भिजली होती तेव्हा वडील तिला मारायला धावले होते. घरातल्या भांडणांना भिऊन ती दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्याने अनवाणी पळत जाऊन कुठल्याशा देवळात येऊन थडकली होती. असे किती किती असतील संदर्भ? प्रत्येक क्षणाला घडतच असतं की काही ना काहीतरी. लिहून काय ठेवायचं ते? आता तो जो कोणी तिला ढोंगी म्हणालेला सायकलस्वार दुस-या टोकाला निघून गेला देशाच्या, पुन्हा कुठला आलाय्‌ भेटायला, तिला मारायला धावलेले वडील मरून सुद्धा
गेले. ती अनवाणी पळत गेली त्या रस्त्याने आठवण ठेवली असेल की थरथरत उभी होती त्या थंडगार देवळाने? ही कशाला येड्यासारखी जमवत बसली हा कचरा आयुष्यभर पेट्यातून, पिशव्यातून? आणि ही पुस्तकं.. यात कितीशी असतील जगायला नीटपणे शिकवणारी? काहीतरी मुद्याचं सांगणारी? वीस-पंचवीस फार तर बाकी तर सारी फाजील जागा अडवणारी. काढलं पाहिजे, काढलं पाहिजे हे सगळं. अजून नीटसा तिरस्कार उत्पन्न होत
नाहीये. जगून संपलेल्या आयुष्याचा मोह नीटपणे बाजूला सारता येत नाहीये. किती थोडं लागत असतं माणसाला जगायला. बाकी फाजील भरती फाजील कारणांसाठीच होते ना? घरभर पसारा, आणि ती! ढीगभर निराशा आणि पुस्तकं, कपड्यांच्या चिंतेचं ओझं वागवत आपल्या निरुपयोगी, अव्यावहारिक वांझोट्या जगण्याबद्दल स्वतःवर
चडफडणारी तरीही - बेंबीच्या देठापासून काहीही बदलायला तयार नसणारी, सुरक्षिततेच्या पांघरूणाखाली स्वतःला आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना दाबून ठेवणारी! अदृश्य उंदराच्या सहवासात, स्वतःत कोंडलेली, दिसलेली पण न दिसलेली!

सुजाता महाजन

Monday, 27 May 2019

The Islands of Joy and Serenity – Andaman and Nicobar


Once the travel bug has bitten you, you will never be completely home, a part of your heart will reside in each place you have been to, and be divided into umpteen pieces that you will never feel like gathering. The longing will remain. It is the heavy price you will pay for love, to let that place be etched in your memory. I did an ethereal journey to Andaman recently and it reciprocated the same feelings. I did not feel like leaving. I wanted to stay and indulge. I wanted to cry and run free on every beach I could lay my eyes upon. My family was my company, my hubby my indulgence and my sister my funny streak. This trip was different, it was more of a bonding affair and it worked well.
Andaman and Nicobar Islands have seen the worst of times in the best of locations. Pristine white sand beaches adorned with aquamarine blue waters that have stood testimony to the atrocities of prisoners and the heinous crimes during World War. Exotic Corals and avid marine life that bejewel the Bay of Bengal and make it one of the most sought after beach destinations in Asia. Vast untouched stretches of white and perfectly clean sand, that have sea shells hidden within them. My favourite was the Nemo Reef. Who does not love Nemo and Dory!!!… You see them playing hide and seek with you in reality. The highlight being the story of Kala Pani, that went down in history and where India’s only active volcano stands proudly, saying Beware! Andaman and Nicobar is an archipelago of islands with a population of around 25 lakhs for the Union Territory. Only the Andaman island is inhabited with people, whereas the Nicobar island is not open to civilians because of uncivilized tribes who are known to be man-eaters. Andaman is a must-visit if you love water sports like Scuba and want to see live corals with an array of colors atleast once in your life.
Here goes the itinerary – Plan your trip soon and let us know how it went!
Port Blair
We took a flight from Bangalore to Chennai and then to Port Blair, with a two hour halt in Chennai. Air India and Indigo are the best options to choose from, as you will get many connecting flights. Port Blair is home to Veer Savarkar International Airport which is the defense airport managed pretty well by the Indian govt. authorities. Cellular Jail, Naval Bases, the Indian Naval Museum and the Anthropological Museum are some of the places to be visited in Port Blair. The Light and Sound Show at the Cellular Jail which speaks of a spectacular story of Kala Pani and the formation of the jail, the history and origin of Andaman is composed and prepared with tremendous efforts. In the voices of Naseeruddin Shah in English and Om Puri in Hindi, there is certainly an emotional value attached to this jail. This jail is now declared a national monument by the Government of India as a tribute to the freedom fighters. You will get a chill down your spine once you hear about the atrocities, the food conditions, the dilapidated state of affairs in the prison and ruthless actions of the jail masters. Veer Savarkar was one of the strongest and the longest surviving prisoner in this Cellular Jail. Try out the local cuisine at Mandalay Restaurant if you do not mind splurging, Annapurna and Gagan Restaurant for a pocket-friendly option. Mind you only Airtel and BSNL networks work flawlessly in Andaman even on roaming, preferably get sim cards from these before you head on your journey. A beautiful beach famous for its vibrant corals lies around 20km from Port Blair called Wandoor. Visit this beach for a relaxed evening by the bay and let thoughts gush out and let peace sink in. I would never miss out on the coconut water by these magnificent beaches. In Port Blair we resided at Haywizz.
Havelock Island – Radhanagar Beach, Elephant Beach and Kala Patthar Peach and of course it is time for Scuba!
A comfortable and exciting cruise awaits you from Makruzz Cruises in luxury ships with Deluze, Premium and Royal class options. There is not much difference between the Premium and Royal class, so go for the Royal one, to enjoy a more privy ride (though the seats are very few in number). Sail ahoy to Havelock Island from Port Blair, takes around 2 hours to reach your pristine destination. You can explore Radhanagar Beach, Elephant Beach, Kaala Pathar Beach (Black Rock). It was this destination that was going to fulfill one more bucket list. Scuba Diving.  I waited for fifteen months before I could learn breathing techniques, get trained and then go underwater to see Nemo and Dory at the Nemo Reef. We underwent training with Scuba Schools International and it costed us 4000/- rupees for 45 minutes including the transport. Below the water it was surreal. Time stopped and you had to concentrate just on your breathing, survival and everlasting beauty that was unperturbed by the chaos in the world. Such vibrant and fulfilling colors. I felt like going deeper and never come back, swooned by the waves, where fishes guided me to beauty and corals invited me for a chat. It was one hell of a brightened up experience. We made our privy and comfy stay at the Wild Orchid amidst neatly carved shacks and aromatic sea food.
Neil Island –
You can visit this stunning island only if you are lucky, weather plays an important role as all the islands in Andaman have to be reached safely by ship, where a stay of one day is included to combat the day light saving timings. Sunrise is at 5am and sunset is at 5.30pm in Andaman, therefore the locals are prone and built in this manner to keep working and be active only during these hours. The evenings are only for relaxing, entertainment and food. Mainstream activities are never planned in Andaman after 4pm. I would suggest you to go for Beach No.1 for stunning vistas and sunset illuminations. This beach is also more popular in terms of coral and marine diversity. You will find many lonely spots for photography, relaxation and bonfire too.
The bewitching journey to the “Islands of Good Fortune” ended on a loving note. It was the best family journey with my parents, sister and hubby.  We had our romantic time together and even besotted to a quality family time spent that resulted in everlasting bonding.
All the best for your adventure. This trip costed us around 40k per person with travel, accommodation, food and Scuba!
Go for it!
Until next time.
Rucha Sudhir Khot
https://ruchaflora.com/2017/10/27/the-islands-of-joy-and-serenity-andaman-and-nicobar/

Baby thinker ( A baby's daily routine from its own viewpoint)

Waah, waah!(cries)
One, two....
Mummy has noticed that I'm wet through,
Three, four....
Phew! She is changing my diaper,
Five, six....
I love squeaky sound of *ghodiyo sticks,
Seven, eight....
Ghodiyo is cuddly like mummy's nest!
Nine, ten....
(yawns) Here, I feel sleepy again.
 
----Akanksha
 
 
* Ghodiyo is hammock type cloth cradle on a wooden frame, supported by either wooden sticks or by metal handles. It is mostly found in Gujarati households.

एका छोट्या बाळाच्या दृष्टीकोनातून त्याची जग-दुनिया

एक, दोन....
पाहूया, या लाडोबाचे लाड करतंय किती-किती नी कोण-कोण?!
तीन, चार....
शी, शू, भूक, काहीही सांगताना रडून रडून मी झालोय बेजार!
पाच, सहा....
आई-बाबा, मला रडका म्हणण्यापेक्षा मधून मधून मी कसा खुदकन हसतो ते पहा!
सात, आठ....
सकाळपासून, बाळकडू, गुट्या, चाटण, ड्रॉप्स, सिरप्स, या सर्वांमुळे तोंडाची पार लागलीय वाट!
नऊ, दहा....
औषधांचा अन दुधाचाही आलाय कंटाळा, झटपट मोठा होऊन मीही पिणारेय चांगला कप-कप चहा!!
आकांक्षा

इंगित सुखी आयुष्याचे



आई असते सागर प्रेमाचा,
अथांग झरा आतूट मायेचा.
पण तिथे नको अविचारी आंधळी माया,
कौरवांच्या गांधारीचे जाते मग आयुष्य वाया.

पिता असे ताकद आयुष्य पेलण्याची,
दिशादर्शक, तपस्वी गुरू, सत्यता जगण्याची.
नको तिथे अहं; स्वतःच्या इच्छेचा,
अन्यथा होतो तिथे जन्म प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपूचा.

पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा डंका कीर्तीचा,
तोच स्त्रोत असतो पालक इच्छापूर्तीचा.
नको स्पर्श तिथे व्यभिचार वा दुर्वर्तनाचा,
उगा मग होतो तिथे धृतराष्ट्र दुर्योधनाचा.

कन्या असते चैतन्य, सौंदर्य सार्‍या घराचे,
दोन्ही घरातील दीप उजळविते ती स्वजनांचे.

न मिळो थारा तिथे कपटी मनाला,
पोटी जन्मते होलिका, कष्ट कश्यप ऋषीला.

बंधु प्रेमळ सखा असतो वडिलांचे दुसरे रूप,
बहिणीच्या हक्काचा दरवळतो सुखद, मंद धूप.
तिथे मात्रा नको स्वार्थी वा लोभीपणाची,
प्रसवते मग तिथे वृत्ती देवकीच्या कंसाची.

बहीण असते वात्सल्यमुर्ती, सावली आईची,
पाठराखण करते, पांघरते शाल ती मायेची.
नको व्हावी ती आंधळी, स्वार्थी, मनाची काळी,
जणू शूर्पणखाच ती, करते रावणाची, राखरांगोळी.

सासू असते परक्या घरी आई दुसरी,
समजवणारी, सांभाळणारी, मूर्ती प्रेमळ हसरी.
नको तिथे वावर राग-मत्सराचा,
जसा त्रास झाला सीतेला कैकेयीचा.

सून असते ऊर्जा सार्‍या सासरची,
मुलगीच दुसरी नव्या नेणत्या स्वशुरांची.

नको तिथे निवड अविचारी, घमंडी सूनेची,
होते मग कथा तिथे कोमोलिकेची.

असावे आयुष्य सारे आनंदी- स्वच्छंदी,
मैत्र असता आयुष्यभराचे, तिथे आत्मा अवघा आत्मानंदी.
हवी कशाला मग तगमग दोन जीवांची,
नको तिथे आता मैत्री त्या कर्ण - दुर्योधनाची.

आपल्यातच दडलेत राम अन् रावण,
म्हणूनी मनाची असावी निरोगी ठेवण.
प्रेम, आपुलकी अन्‌ जिव्हाळा,
सतत वाहता ठेवावा मनाचा उमाळा.
सर्वांग-सुंदर आयुष्याच्या असावा विचार,
अंतरी सतत तो ठेवील तेवत सदाचार.

सौ. केतकी कुलकर्णी
स्टुटगार्ट (जर्मनी)

Tuesday, 21 May 2019

कविता

कब सीखोगे तुम ,,
खाली पन्नों पर लिखे मेरे अल्फ़ाज़ पढ़ना,,,,
मेरी आवाज़ का नकाब हटाकर अपने कानों को मेरी खामोशी तक ले जाना,,,
और सुनना मेरी दर्द की आवाज को ,,,
कब सीखोगे तुम,,,
मेरी भटकी आंखों में अपना पता लगाना,,
पांचों उंगलियों में बंधी मेरी बंद मुट्ठी के ढीले पन को समझना ,,
मेरी दिल की रफ्तार को महसूस करना ,,,
कब सीखोगे तुम???????
..............
अनगढ ज़िन्दगी की भावनाओं की प्रस्तर शीला पर मैं |
न जाने कितने अमूर्त अभीलाशाओं  को मूर्त रूप देती मैं |
यही मूर्त आकार चेहरों में ढल जाते है ,नकाब ओढ़ते है |
टकराते है ,प्रहार करते है ,
कभी कभी राहों से भटक जाते है,
जब राह पाना मुश्कील हो जाता है,
तब ........
तब यही मूर्त आकर आभासीत,
सपनोसे आकर खड़े हो जाते है |
तब ......
तब लगता है ......
की हम अपनी-अपनी सलीब  उठाए जीवीत है |
                                                                       
हमारे साथ कि समाप्ति मुझे दुखी तो करती है,पर मेरे दिल को खाली नहीं कर पाती,,क्यों कि उसे भरने के लिए, मैं अपना प्रेम  उंडेल देती हूं ज़र्रे ज़र्रे में ,,,,,
ताकि मेरे जिस्म में वो बून्द बून्द करके ,,,पिघलता रहे,,
...........
प्रज्ञा,,,,,,,

Monday, 20 May 2019

इच्छा मरण

डेव्हिड गुडाॅल या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने वयाच्या 104व्या वर्षी सित्झर्लंडमधे जाऊन, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून स्वेच्छामरण स्वीकारले.  हा निर्णय खरोखरच धाडसाचाच आहे.  पण ही बातमी सर्वांनाच विचार करायला मात्र भाग पाडेल हे नक्की.

मुंबईत, गिरगावात गेली कित्येक वर्षे लव्हाटे पती पत्नी स्वेच्छामरण हवे यासाठी सरकार दरबारी पत्रव्यवहार करत आहेत हेही आपणा सर्वांना आठवत असेलच.  

मृत्यू हेच चिरंतन सत्य असलं तरी हे शरीर कितीही रोगजर्जर झालेले असले तरी ना माणसाला सोडवत, ना डाॅक्टर आपले रूग्णाला वाचवण्याचे प्रयत्न सोडत.  यात रूग्णाच्या यातना, आर्थिक खड्डा, इतर नातेवाईकांना येणारा कंटाळा सगळं सगळं लक्षात घेऊनही एखाद्याची जीवनयात्रा संपविण्याचा विचार मनात आला तरी प्रत्यक्षात येत नाही.

मला आवडेल का स्वेच्छामरण? नक्कीच आवडेल.  स्वतःच्या मनाची भरपूर तयारी करायला लागेल.  नात्यांमधून विरक्त व्हावं लागेल.  विरक्ती येण्यासाठी ' इथे तुझ्यावाचून अडत नाहीये' ही भावना मात्र कामाची नाही.  पण हे खरंच आहे की नाही की कोणाचंही कोणावाचून कधीही अडत नसतं.  आपल्याला तसं उगीच वाटत असतं.  हे मनानं स्वीकारलं की गुंते सुटतात सगळे.  

येणेची शरीरे शरीरा येणे सरे ही अध्यात्मिक अवस्था येण्यासाठी मनाच्याही वृत्ती तशाच हव्या नाही का?  पण शरीरही एक यंत्र आहे.  त्यातही बिघाड होतात आपल्या वापरण्याने,  नीट न वापरण्याने. त्याची दुरूस्ती कुठवर आणि कोणासाठी करायची हे समजलं आणि पटलं की स्वेच्छामरण स्वीकारणे अवघड जाणार नाही.

पूजनीय विमलाताई ठकार यांच्या आधार पण आश्रय नव्हे या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे प्रयाणोत्सव, अर्थात  मृत्यूचाही आनंदी सोहळा झाला पाहिजे.  एखादा जीव जन्माला येतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो तसा आनंद मृत्यूमुळेही व्हावा.  हे शरीर सोडल्यामुळेच आत्म्याला नवीन शरीर मिळवता येणार आहे हे तत्त्व समजायला हवे. 

मलाही डेव्हिड गुडाॅल यांच्यासारखे  स्वेच्छामरण घेता आले तर मीही जुनी मराठी आणि हिन्दी  गाणी ऐकत अगदी हस-या चेहे-याने या जगाचा निरोप घेईन.  शस्रक्रियेपूर्वी भूलतज्ज्ञ आपल्याला भूल देतात. तेव्हा आपल्या मनात जराही किंतु नसतो तोच भरवसा स्वेच्छामरण स्वीकारताना नक्की ठेवीन मी.  सलाईनमधलं औषध नसेतून हळूवारपणे झिरपत जाईल आणि यत्किंचितही वेदना, घुसमट न होता हृदय आणि मेंदू चिरविश्रांती घेतील.  समईतली तेवती वात तेल संपल्यावर जशी निरोप घेते तसाच हाही निरोप असेल नाही!   प्रायोपवेशन, संथारा या मृत्यूसमीप जाण्याच्या संथ पद्धतीपेक्षा ही इंजेक्शनची पद्धत नक्कीच सुखावह आणि झटकन होणारी.  

या जगाचा निरोप आनंदाने घेईन मी कदाचित याहून चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी.  कदाचित अधिक उत्तम कार्य हातून घडण्यासाठी.  कदाचित यातलं काहीच न घडता जीवनमुक्त होण्यासाठी.

By

Anagha Joshi

Talegaon, India

ऋषी स्मरण - भाग ३

रामायण सांगण्याच्या निमित्ताने मावशींचा प्रवास सुरु असे. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणची माहिती, वैशिष्ट्ये जशी त्या समजून घेत तसेच तिथले कार्य वाढावे, अधिकाधिक महिलांनी जोडले जावे याचाही विचार असे. या विचारासंबंधी मावशींचा आणखीही एक उपक्रम मला आठवतोय. समितीच्या अविवाहित सेविकांची  लग्ने ठरली की त्या कोणत्या गावी जाणार आहेत त्या गावच्या सेविकांना त्यांची माहिती आधीच कळवण्याची पद्धत मावशींनी दूरदृष्टीने  सुरु केलेली होती. एकतर नवख्या गावात आलेल्या त्या मुलीला भेटायला आपल्या विचारांच्या व्यक्ती आल्यामुळे आनंद होत असे. दिलासा मिळत असे. समितीशी त्या ठिकाणीही तिचा संपर्क पुन्हा सुरु होत असे. शाखा विस्तार, कार्य विस्तार यासाठी वरवर जरी फारशा महत्त्वाच्या नाहीत असे वाटत असलेल्या अनेक कल्पनांचा उपयोग होतो हेच जणू मावशींनी सिद्ध करुन दाखवलेले.

याच अनुषंगाने आणखीही एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की, संघाचे जसे पूर्णवेळ प्रचारक निघतात त्याप्रमाणे समितीच्याही काही तरुण मुलींना आपणही अविवाहित राहून समितीच्या प्रचारिका म्हणून काम करावे असे वाटत असे. आज या विषयी आपल्याला विशेष असे वेगळे फार काही जाणवणार नाही कदाचित. पण स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरच्याही काही वर्षांत असा विचार मुलींच्या बाबतीत सहजपणे स्वीकारणे अशक्यच होते. त्यामुळे मावशी त्या मुलींना समजावून सांगत की यामुळे जे पालक आपल्या मुली समितीत आता ज्या विश्वासाने पाठवत आहेत ते मुलींबाबत शंकित होतील आणि मुलींना समितीच्या शाखेत पाठवणे कदाचित बंद करतील. त्यापेक्षा तुम्ही विवाह करुनही हे काम करू शकता. जी कन्या चांगली असते, तीच चांगली पत्नी, गृहिणी होते. आणि जी चांगली गृहिणी असते, तीच उत्तम माताही होते. प्रपंच नीटनेटका करतांना तुम्हाला समितीच्या संस्कारांचा नक्की उपयोग होईल. चांगला संसार करणाऱ्या तुम्हाला बघूनही समितीचा विचार उत्तम आहे असा विश्वास वाढेल. मावशींचे बोलणे इतके आश्वासक, मृदू असे की त्याचा नुसता प्रभावच पडत नसे. तर स्वीकृतही होत असे. आणि खरोखरीच लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेल्या मुलीच प्रचारिका सिद्ध होत. मा. बकुळताई देवकुळे,  मा, वत्सलाबाई चोळकर, मा. श्रीमती  सिंधुताई फाटक अशी अनेक नावे या मांदियाळीत आहेत.

संघाप्रमाणेच समितीचीही सेविकांसाठी निवासी शिबिरे घ्यावीत हा विचार झाला तेव्हा संघाचे जे शिबिर होत असे ते एका वर्षी मावशींनी पूर्णवेळ उपस्थित राहून पाहिले व मगच समितीसाठीही शिबिरांची योजना करण्यात आली. जे करायचे ते केवळ नक्कल म्हणून नाही. तर त्या मागचा उद्देश, तो सफल होण्यासाठी आवश्यक ते उपक्रम व सुविधा या सर्वांचा त्या विचार करीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर मुलींना एकत्र राहून स्वावलंबी, सकारात्मक विचार देणारे, शारिरीक क्षमता वाढवणारे, देशप्रेम जागृत ठेवणारे, ध्येय निश्चित करणारे, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीचे भान देणारे उपक्रम या शिबिरात राबविले जाऊ लागले. विविध खेळ, स्पर्धा, वाचन, लेखन, मुलाखती, मनोरंजनाचे कार्यक्रम अशी आखणी केली जाई. शिबिरात दैनंदिन सुविधेसाठीची सर्व कामे सेविकाच सहकार्याने करीत असत. वेगवेगळ्या विभागात अशी शिबिरे होत. मावशींची काही दिवसांची उपस्थिती हा सेविकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असे. त्यांचे वर्तनच मुलींना अधिक संस्कारित करीत असे.  मावशींचीही सर्व सेविकांप्रमाणेच दैनंदिनी असे. प्रत्येक सेविकेची त्या दखल घेत. तिच्या अंगचे गुण जाणून घेत. मार्गदर्शन करीत. तेही अगदी सहजगत्या, कोणताही अभिनिवेश न आणता. 

रामायण कथनाच्या कार्यक्रमांतून जे उत्पन्न मिळाले ते मावशींनी वर्ध्याच्या अष्टभुजा देवीच्या मंदीरासाठी अर्पण केले. जिजामाता, अहिल्या बाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई या आपल्या आदर्श असल्या तरी आपल्या समाजमनाचा विचार केला तर तो श्रद्धाळू आहे. अशावेळी एकाद्या देवीचे रुप जर आपण त्यांच्यासमोर ठेवले तर ते अधिक प्रभावी असेल. या विचाराचा पाठपुरावा करतांना अष्टभुजा देवीची प्रतिमा साकार झाली ती आपल्या ध्येयाचा मानदंड समोर राहील अशा स्वरुपात. स्त्री शक्तीतले जे जे योग्य व वर्धिष्णु रहावे ते ते सर्व या प्रतिमेत साकार झालेले दिसते. सायुध, सिंहाधिष्ठित, प्रसन्न, सोज्वळ रुप आहे या प्रतिमेचे. स्वकर्तव्याचे भान सातत्याने रहावे यासाठी असलेली  जपमाळ, जागृतीचे प्रतीक म्हणून घंटा, फलासक्तीशिवाय कर्माचा संदेश देणारी भगवद्गीता, पावित्र्य व त्याग यांचे प्रतीक असलेल्या अग्नीचे विधायक कामासाठी उपयुक्त ठरणारे यज्ञकुंड, सौंदर्य, निर्लेपता शिकविणारे कमळ, शौर्य व स्वसंरक्षणासाठी तलवार, शक्तिसामर्थ्यावर आधारित मानदंड म्हणून त्रिशूळावर फडकणारा भगवा ध्वज हे सात हाती असून आठवा वरदहस्त अशी ही मूर्ती जयंतराव देवकुळे आणि प्रसिद्ध चित्रकार दलाल यांच्या सहकार्याने साकार झाली.

मावशींची व स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली तेव्हा सावरकरांनी त्यांच्या या कामाला भीज पावसाची उपमा दिली होती. ज्यामुळे पीक उत्तम येते. आज मावशींच्या पश्चातही त्याच विचाराने चालू असलेले हे कार्य त्याची साक्ष देणारेच आहे.
मावशींच्या प्रेरणेनेच विलासपूर येथे कुष्ठरुग्णांच्या निरोगी मुलींसाठी, ठाण्याला मूकबधिर मुलींसाठी, भंडारा∕गडचिरोली येथे नक्षलग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी तेजस्विनी छात्रावास सुरु आहेत. नागपूर येथे अहिल्यादेवी मंदिरात आसाम, नागालँड, मणिपूर येथून जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या मुलींना सोडवून आणल्यानंतर त्यांचा सांभाळ केला जात आहे. त्यांना शालेय शिक्षणाखेरीज स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षणही दिले जात आहे.  आज जवळपास ४०,५० मुलींचे एक कुटुंब झाले आहे ते. मोठ्या मुलीच लहान मुलींची देखभाल करतात. सर्व कामे त्या मिळून मिसळून स्वतःची स्वतःच करतात. तिथेच मोठ्या झालेल्या अबोला आज नर्सिंगचे उत्तम शिक्षण घेतल्यावर नागालँडमध्ये आरोग्यविषयक क्षेत्रात उत्तम काम करतेय. तर पंकजा काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी हिंदू कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला ठार केलेल्यांच्या मुलींचा  सांभाळ करतेय. या  छात्रालयांखेरीजही आज जवळजवळ २२ छात्रालये समितीद्वारे संचालित केली जाताहेत.

अष्टभुजा देवीचे मंदीर व वरील अनेक ठिकाणच्या संस्था या आज समितीच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आहेत ही समितीसाठी नक्कीच स्वाभिमानाची बाब आहे. या सर्वच ठिकाणी बालकमंदिरे∕शिशुवर्ग, उद्योग मंदिरे, वाचनालय, वसतिगृह या सारखे समाजातील घटकांना घडवण्याचे , संस्कार देणारे, कर्तृत्वाला वाव देणारे स्तुत्य उपक्रम नित्यनेमाने मावशींच्या पश्चातही त्याच ध्येयाने चालवले जात आहेत आणि चालवले जातील याची खात्री आहे.

वंदनीय मावशींच्या सर्वच कार्याचा आढावा घेणे ही सोपी गोष्ट नाही याची मला जाणीव आहे. पण हे करीत असतांना समाजात स्वतःविषयी व सेविकांबद्दल मावशींनी जो विश्वास निर्माण केला त्यासाठी जे विविध उपक्रम राबविले त्यानुषंगाने समितीच्या वर्गात नित्यनेमाने म्हटले जाणारे गीत मला आठवतेय.

काटेकुटेच पसरले तव ध्येयपंथी, नाही सुखांशु म्हणूनि नच मानी खंती ॥
विस्तारिला भवती विस्तृत भव्य सिंधु, नौका तुझी गमतसे जणू त्यात बिंदु ॥
लाभेल देवपण ते दगडासि साचे, देही प्रहार बसतील जरी घणांचे ॥
वाटोनिया कधी तुज पथ हा चुकीचा, चित्तास संशय पडेल जरी दिशेचा ॥
ध्येयाचिया अनुसरी ध्रुव तारिकेस, आशा अदम्य धरुनि चल सावकाश ॥

यातील प्रत्येक ओळ वं. मावशींच्या जीवनातील घटनाक्रम डोळ्यांसमोर आणत जाते. आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो आणि कार्तिकी द्वादशीला त्याची समाप्ती होते. या काळात विविध व्रते अगदी कसोशीने पाळली जातात, नवी व्रते स्वीकारली जातात. मावशींचा जन्म आषाढातील दशमीचा आणि मृत्यू कार्तिकी एकादशीचा. त्यांनीही आपले जीवन देशासाठी, समाजासाठी व्रतस्थ राहूनच समर्पित केले ते फक्त ४ महिने नव्हे तर ४ तपे इतके होते.  

आजच्या घडत असलेल्या अनेक घटनांना, प्रवृत्तींना सक्षमपणे तोंड द्यायचे असेल तर राष्ट्र सेविका समितीच्या शाखांवर मुलींची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसायला हवी. त्यांच्यासारखे व्रतस्थ जीवन जगण्याची प्रेरणा मिळायला हवी. मावशींसाठी तीच खरी गुरुदक्षिणा असेल.

By

Padma Dabke

Pune, India

Wednesday, 1 May 2019

Endeavors of Re-Learning


“I’m feeling very nervous, but I guess there’s no more escaping from it anymore!” I told my colleague as we were headed to a seminar. “I think I’m not a good driver. My driving record back in India is neither long nor spotless” I continued. “You can do it, dear. Start afresh. It’s different here from that in India.”, she said as she sped at 180 km/hour in her Automatic SUV on a German ‘Autobahn’.

After 3 long years in Germany I finally registered for the driving license, once again. Yes, once again! First time when I applied, I did not pursue. Finally I gathered the courage to follow it through.

The driving school explained to me the whole process. There are 3 major steps: 1. Application 2. Theory Exam & 3. Practical exam. I needed a First-aid course, an eye test, translation of Indian driving license into German, etc. before I could even apply for Driving license. After gathering the required documents, I finally applied for the German driving license.

The next step was to prepare for the theory exam. The school gave me an online learning programme to prepare. Oh dear lord, there was so much to learn. There were around 1400 questions out of which 30 would be asked in the theory exam. The learning app did a good job to prepare me. It covered not only the questions but also the theory & logic behind it. The app allowed me to practice questions by topic, by type of question (video, picture, text, etc.), by difficulty level. It marked the questions & areas that I found tough & helped me practice them. The theory behind those questions was explained in the form of text, pictures, real-life examples, visuals, videos, etc. Then there was a practice section and also exam simulation section. Plus there were helpful links. They came in handy especially when I needed more explanation to understand a concept or its real-life significance. The theory exam works on the negative points system. For every wrong answer, you get between 1 to 5 negative points. To pass the exam, one must ensure not more than 10 negative points. I got Zero negative - No Mistakes!!! I was elated.

With such a good exam results, I was all-the-more excited to start practicing driving. Luckily my trainer had an empty time-slot the very next day. “I’d start afresh”, I told myself as I walked to our meeting place!! I was determined to overcome my fears. My trainer, Mandie, was a charming lady. I decided to lower the stakes by admitting to poor driving skills, experience, and record. She said rather non-judgmentally, “Don’t worry, You’ll be a good one.” Later she told me that the people who recognize their weaknesses are the ones who can quickly overcome them!!

As I sat in the driver’s seat for the first time in ages, that too in a foreign land in a car with completely contrariwise placed controls, I had butterflies in my stomach. She explained to me the main controls in legs - clutch, gear change, and in hands - signaling the turning, switching wipers, etc. As I was set out to drive on a road, I was faced with a lot of tasks. Here came the red signal and I just leave the clutch!! I had to start the engine again as the signal turns green and had to make a sharp 90° turn to the right. While I was executing it and trying my best to adhere to the lane, “gear up”, said Mandie. Immediately, I change the gear... But, wait; did I forget to press the clutch?? With me looking at my gear stick rather than the road ahead, Mandie saves the turn! I feel so foolish now, looking back at it! But Mandie didn’t make me feel that way at that time. Moreover, I was so very engrossed in maneuvering my vehicle, I hardly had time to ‘feel’ things! Initially, driving seemed very intimidating!!

I respect Mandie for being a wonderful person and trainer that she was. She taught me more than just driving. Mandie had the know-how of the roads and routes in and around Aalen. She also had a very good understanding of how the human brain works. She judged the skills that I already had and built gently up on it. She made sure I didn’t feel stupid or stuck. She must have learned quite a bit of psychology either to prepare for or as a result of teaching. She understood my feelings, thoughts, and expectations without having to speak them, sometimes! Other times, by the time I gathered German words to express, she had already got the point!! She always kept the mood light with her humor. She would snap at bystanders ‘standing incorrectly’, people crossing the roads without zebra crossing or over the signals. Drivers across the world seem to curse pedestrians for their inattentiveness and carelessness! I find it amazing how she made fun of me without hurting my feelings! In fact, this very jovial nature of hers made the driving seem more fun. Moreover, I could understand her wits in German; isn’t that cool! She had enormous patience to explain things over and over again until I could implement them to show my understanding. She was always energized, yet calm and composed.

My confidence started building up with more and regular practice. Moreover, she would put me in different kinds of situations every day. We drove in the pedestrian zone with walking pace and also on the highway with 100kms/hr. We drove on narrow, calm, hilly roads as well as on multi-lane, high traffic city roads. I had to recognize and observe different traffic rules, road signs, traffic lights, pedestrians, cyclists, other vehicles, their pace, etc. There were also deeper things to learn about like, shoulder-blick, right-of-way, observations by left-turn, deciding moment of yellow-traffic light, etc.

The practical exam was the final hurdle. Initial 10 minutes were quite stressful. I had a hard time understanding his instructions, especially the German names for the car-controls (e.g. Nebelscheinwerfer is a fog light!). I turned to Mandie in a desperate search for English words for the controls. The examiner kind of scolded me for talking to Mandie. My mind started racing - will he throw me out of the exam? He told me to ask him directly, not Mandie. All she was allowed to say was: “deep breaths”. She must have said it a hundred times during the course of the exam. Then the examiner asked me to start driving and stay in the lane. It was straight-going lane. So I changed the lane ahead as it became left-turning lane. He snapped at me telling me not to change lanes without asking him. Oh God! That gave me heebie-jeebies. I thought to myself, “I can’t afford to make another mistake; no way!” I pulled myself together and focussed on driving well rather than on passing the test. The tasks I had to perform were: city-driving, reacting to traffic lights (e.g. amber light), driving on a highway, parking parallel to the street, turning around, emergency braking, roundabouts, passing the bus/bus-stop, behaviour towards pedestrians and cyclists, turning left without traffic lights and giving way etc. I sustained the whole 40 minutes and was back at the starting point. The examiner started explaining his evaluation of my driving test. He mentioned that I was good at indicating and was observant while driving. He said I executed assigned tasks with sufficient efficiency. He pointed out some mistakes out and suggested improvements, saying that those were minor ones. Finally, he said, “Overall, you pass the test.” That was music to my ears!!
It was a tough and extensive exam. But, all’s well that ends well.

As I had started my endeavor, I had thought that the process is unnecessarily lengthy. In retrospect, I can understand the importance of a thorough process. At every stage, there is an effort to make you a responsible driver. The learning material was made interesting and exams were made tougher to make sure that the people take things seriously. Moreover, it also seems fair now that an Indian license holder has to go through the process as good as a beginner.

Throughout the process Mandie kept motivating me to do better and learn from my mistakes rather than feeling bad about them. This has helped me to date. When I sit in the driver’s seat, I can calm myself down and focus on driving. Recently I even started humming and singing while driving in traffic hours. To achieve the goal one has to believe in oneself, Madie helped me build my confidence. As I started driving independently I started feeling empowered, in a way. After around a couple of months of independent driving, my 2.5 years old son said, “Baba drives better than you do.” Oh, Men will be men!!

By 

Amruta Joshi Kane

Aalen, Germany