Monday, 27 May 2019

एका छोट्या बाळाच्या दृष्टीकोनातून त्याची जग-दुनिया

एक, दोन....
पाहूया, या लाडोबाचे लाड करतंय किती-किती नी कोण-कोण?!
तीन, चार....
शी, शू, भूक, काहीही सांगताना रडून रडून मी झालोय बेजार!
पाच, सहा....
आई-बाबा, मला रडका म्हणण्यापेक्षा मधून मधून मी कसा खुदकन हसतो ते पहा!
सात, आठ....
सकाळपासून, बाळकडू, गुट्या, चाटण, ड्रॉप्स, सिरप्स, या सर्वांमुळे तोंडाची पार लागलीय वाट!
नऊ, दहा....
औषधांचा अन दुधाचाही आलाय कंटाळा, झटपट मोठा होऊन मीही पिणारेय चांगला कप-कप चहा!!
आकांक्षा

No comments:

Post a Comment