~ शेवंती ~ पीत-पितांबरी शेवंती सोन फुलांनी नटली होती, रवीकिरणांच्या स्वागताला मनोमन ही सजली होती . उधळण करूनी सोन फुलांची वाटेवर दरवळली होती, पाहूनि त्या सोनेरी छटा नकळत गाली हसली होती. स्पर्श होता किरणांचा ती वाऱ्यावरती स्वार जाहली, हळूवार अशा स्वप्नांमधुनी हलकेच ती डोकावली होती. अदभुत सोहळा मिलनाचा नभ धरतीशी एकरूपले, गोड गोजीरी सोनेरी फुले मन आनंदघनी रे झुले! सौ.सुगंधा पंकज रागळवार. वोल्सबुर्ग - जर्मनी .
|
No comments:
Post a Comment