मराठी भाषा दिनाच्या अनेक शुभेच्छा!
मातृभाषा म्हणजे जणू आईचं ममत्व,
आपल्या अस्तित्व, संस्कृती आणि अस्मितेचं ती करते शब्दरूपी प्रातिनिधीत्व,
सान्निध्यात तिच्या, म्हणूनच वाटतं आश्वस्त,
परी, स्वभाषेचा सार्थ स्वाभिमान राखताना, परभाषेच्याही सन्मानाचे पाळावे तत्व!
मराठी असे आपली मायबोली,
किती एक सारस्वतांनी आपल्या लेखणीतून जिची पालखी वाहिली गौरवशाली!,
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, साजरा केला जातो, मराठी भाषा दिन!
माता आणि पुत्र, दोघांनी परस्परांना गौरवान्वित करावे, यापरिस काय तो सुदिन?!
आकांक्षा
No comments:
Post a Comment