काही मैत्रिणींच्या नावांभोवती गुंफलेली एक लघुकथा
'पौर्णिमे'च्या प्रकाशात त्याने हातातील 'मंजुषा' उघडली. आत त्याने तिला लिहिलेली काही प्रेमपत्रे आणि तिच्या सुमधुर आवाजातील काही ध्वनिफीती होत्या. ते सर्व पाहून त्याच्या 'भावना' अनावर झाल्या. तिच्या आकस्मिक जाण्याने त्याच्या दुःखाला 'सीमा' उरली नाही! तिच्यासोबत मधुर 'मीलना'ची स्वप्ने पाहणाऱ्या त्याला आता आपल्या इच्छा 'आकांक्षां'चा
चक्काचूर झालेला बघवत नव्हता. एका क्षणी आत्महत्या करायचा विचारही त्याच्या मनात डोकावून गेला, पण दुसऱ्याच क्षणी तिच्या 'संगीता'साठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा निर्णय त्याने घेतला. तिला समर्पित केलेल्या त्याच्या गीतसमूहाचे नाव होते, माझी 'अमिता'! 'शैला' मुकुंद यांनी गीतसमूहाला समर्पक निवेदन करून नावाजले!
By
Akanksha Phadke
Mumbai, India
No comments:
Post a Comment