मन माझे
कधी होई फुलपाखरू,
तर कधी एखाद्या खोल दरी सारखे
घेत असेल नक्की कशाचा ठाव
कधी उंच उडू पाहते
कधी खोल बुडू वाटते
कधी एकांतात रमते
कधी घोळक्यात स्वतःला शोधते
आलो एकटेच ह्या जगात
जायचे ही एकटेच ,
कधी निशब्द, तठस्थ,
कधी भावना होती स्वार
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
तूच आहेस तुझ्या आयुष्यातल्या
आनंदाचा आणि दुख्खाचा
एकमेव असा एकटाच शिल्लेदार
हे जेव्हा तुला कळेल, समजेल
हे जेव्हा तुला जाणवेल आणि उमजेल
तेव्हाच खरा
आनंदाचा मार्ग सापडेल
By
Mrunalini Dabke
Karlsruhe, Germany
मस्त!!
ReplyDelete