ज्योती कलश छलके' म्हणत प्रसन्न वदनाने उठवणारी भाभी म्हणजे साक्षात 'शुभांगी'!
'डोन्ट माईंड, अजय' म्हणणारी, अवखळ, अल्लड, तारुण्याने मुसमुसणारी प्रेमिका म्हणजे 'सोनाली'!
सीता और गीता मध्ये दुष्ट चाचा-चाची आणि त्यांच्या लंपट भाच्याला नाकी नऊ आणणारी 'गीता' फुल टू धमाल!
'दीपावली मनाए सुहानी' असं म्हणतआनंदाने नाचणारी बालिका म्हणजे 'दीपाली'!
शबाना किंवा स्मिता पाटील म्हणजे अभिनयाची प्रतिभा आणि 'मेधा'!
ज्याच्याशी बालविवाह झाला त्याने तरुणपणी नाईलाजास्तव दुसऱ्या स्त्रीशी लग्न केल्याने मनातून दुखावलेली तरीही त्याच्यावर व त्याच्या आईवेगळ्या पोरावर जीवापाड प्रेम करणारी खूशबू मधील कुसुम म्हणजे 'अनघा'!
किनारा मधील 'मेरी आवाज ही पहचान है' असं म्हणणारी आरती म्हणजे साक्षात 'संगीता'!
By
Akanksha Phadke
Mumbai, India
No comments:
Post a Comment