Friday 27 December 2019

माझ्यातला कलाकार

माझ्यातला कलाकार

"पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं  हे सांगून जाईल " अगदी समर्पक बोल आहेत आपल्या पु ल देशपांडे यांचे .
माणसाचे स्वरूप भिन्न आणि वैविध्यपूर्ण असते दुसऱ्यासाठी जगण्या व्यतिरिक्त  मानवी मन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कौशल्या कडे किंवा कले कडे झुकत असते जे त्याला आनंदित आणि व्यस्त ठेवते.
 ती कौशल्ये वाचन लेखन प्रवास चित्रकला इत्यादी असू शकतात.
 एक छंद म्हणजे एक विरंगुळा , जो आपल्याला संपूर्णपणे व्यस्त ठेवतो ,केंद्रित करतोआणि आनंदी ठेवतो.
माझ्या जर्मनीतील अठरा वर्षांच्या वास्तव्यात आवडीच्या गोष्टी करायला खूप निवांत वेळ मिळाला , काही गोष्टी प्रयोग म्हणून करून पाहिल्या काही आवडल्या तर काही "दिस इज नॉट माय कप ऑफ टी" असे म्हणून कळल्या . त्यात जी आवड "छंद " म्हणून झाली ती म्हणजे चित्रकला.
गेल्या पाच वर्षांपासून मी ॲक्रीलिक कलर आणि वॉटर कलर पेंटिंग   शिकतआहे. विंटर मध्ये वेळ चांगला जातो आणि मन आनंदी राहते म्हणून चित्रकलेच्या आनंदात बुडून गेले.
 अनेक वेबसाइट्स आणि यूट्यूब व्हिडिओज वरून नवनवीन टेक्निक शिकत गेले , हळूहळू प्राथमिक दर्जाची असलेली चित्रकला आता मॅच्युअर पेंटिंगचे स्वरूप घेत आहेत. 
भारतीय लोककला हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.भारतीय  चित्रकलेची परंपरा देशाप्रमाणेच जुनी आणि वैविध्यपूर्ण आहे. लोककला आणि आदिवासी कला हा एक समृद्ध वारसा आहे .जो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जातो आणि तो आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे .
 माझ्या चित्रकलेचा  हा विषय महत्त्वाचा भाग आहे. माझी पेंटिंग्ज ही भारतीय लोककला व मॉडर्न आर्ट यांचे फ्युजन आहेत. आकर्षक रंगसंगती ,अबस्त्रॅक्ट बॅकग्राऊंड व भारतीय लोककला यांचे फ्युजन हे माझ्या चित्रकलेचे  वैशिष्ठआहे .युरोपियन लोकांना भारतीय लोककलेशी जोडण्याचा हा एक प्रयत्न मी माझ्या पेंटिंग मधून करत आहे.

या छंदामुळे अनेक चित्रकार मैत्रिणीशी ओळखी झाल्या. त्यांच्याबरोबर चित्रकलेच्या प्रदर्शनात सहभागी होता आले.  त्यापैकी एक " राट हाऊस स्टुटगार्ट इंडियन पेंटिंग एक्झिबिशन"' " हे होते.
मुंबई व स्टुटगार्ट ह्या पार्टनर सिटीज आहेत. या पार्टनरशिप ला पन्नास  वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम स्टुटगार्ट सिटीने आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमा अंतर्गत माझे सोलो इंडियन आर्ट एक्जीबिशन झाले.
तसेच वाईबलींगंन येथील इंटरकल्चरल फेस्टिवल अंतर्गत सिटी लायब्ररीमध्ये माझे "इंडियन फोल्कआर्ट (आदिवासी कला) " हे सोलो एक्झिबिशन झाले. काही कॅफे व कल्चरल ग्रुप तर्फे अनेक प्रदर्शने केली. भारतीय व अभारतीय मित्र-मैत्रिणीनी सहभागी होऊन उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.
वाइबलींगंन येथील लोकल न्यूज पेपर ने प्रत्यक्ष मुलाखत घेऊन माझ्या छंदाविषयी आर्टिकल लिहिले. एका छोट्याशा छंदाने भरभरून कौतुक व आनंद व समाधान मिळाले आहे.
या छंदाचा भाग म्हणून "समर वेकेशन पेंटिंग्स वर्कशॉप फॉर किड्स" आयोजित केले होते. लहान मुलांच्या बरोबर पेंटिंग्स करताना  त्यांची क्रिएटिव्हिटी बघून मन थक्क झाले . पेंट ब्रश च्या प्रत्येक स्ट्रोक ट्मधून त्यांचे मोटर्स स्किल वाढत होते. पॅन्ट ब्रशने झालेली चूक ही चूक नसून नवीन आर्टवर्क ची निर्मिती होती. रोज तयार केलेले आर्टवर्क बघून त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसत होता. सृजनशीलता मानवी जीवनाचा मुख्य भाग आहे लहान मुलांमध्ये सृजनशीलता खूप उत्कट असते. लहानपणापासूनच जपलेले छंद माणसाचे जीवन समृद्ध करतात.
अशा ह्या माझ्यातील नवीन कलाकाराने माझी पर्सनॅलिटी तर बदललीच आहे पण ह्या रंगांच्या मैत्रिने माझे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून गेले आहे.
 माझ्या पेंटिंगची वेबसाइटची लिंक मी खाली देत आहे जरूर व्हिजिट करा .


अनघा महाजन 







No comments:

Post a Comment