Friday, 27 December 2019

उंबरठा



उंबरठा
हिरा होई निष्प्रभ कोंदणाशिवाय...
अग्नी होई बेफाम अग्नीकुंडाशिवाय..
नदीची उपयुक्तता धरणाने
तशी...
स्त्रीची तेजस्विता उंबरठ्याने...
हा उंबरठा संस्कारांचाविचारांचाप्रेमाचाप्रामाणिकपणाचा..
अन्यायाशी झगडण्याचा..
ठोशाला ठोसा लगावण्याचा..
कौशल्याचात्यागाचासंयमाचाआनंदाचा..
तलवारीला धार हवी
तशी तिला म्यानही हवी..
सत्तेला शक्तीबरोबर सर्वांच्या सुखाची जाण हवी..
चंद्रसूर्यादि ग्रहगोलांनाही
मर्यादेत फिरावे लागते..
अर्थ आणि कामालाही
धर्माची चौकट घालावीच लागते..
तरच सारे सुखद होते
अन्यथा होईल विनाश...
स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊन होईल सारा -हास
सद्सद्विवेकबुद्धीचा उंबरठा याचे करूया रक्षण...
वंदन करूया आदराने
करूया त्याचे पूजन..
सौ. शीतल शशिकांत जोशी. 

No comments:

Post a Comment