Sunday, 1 November 2020

चिंता क्लेश

चिंता क्लेश विसरून सगळे,

ध्यान लावूनी योगी बसले।।

कितीक साहले ग्रीष्म उन्हाळे,
कुंतल काळे सफेद झाले।
शुगर वाढली, गुढघे दुखले,
डाएट करून ही पोट हो सुटले।।१।।
 तरीही चिंता क्लेश.........

तेल संपले, तूप संपले,
कांद्याचे तर भाव कडाडले।
महागाईने खिसे फाटले,
'अच्छे दिन' हे स्वप्न ची उरले।।२।।
तरीही चिंता क्लेश .......

कधी रोगांचे संकट आले,
नदी नाल्यां ना पूर ही आले।
जातीयवादी तणाव झाले,
सत्तेसाठी युद्ध पेटले।।३।।
तरीही चिंता क्लेश ........

©रसिका काकतकर

No comments:

Post a Comment