मिलन
अवखळ त्या नदीला
लाभे किनाऱ्यांची साथ,
जरी असती भिन्न दोघे
तरी देती सोबतीचे हात....
ओढ लागता मिलनाची
निःस्तब्ध त्या सागराशी,
अंतरी त्या भावनेनी
धावे दाही दिशातूनी...
गुज मनीचे सांगते
वाटेत भेटणाऱ्या,
घेऊनी कवेत डोहा
भेदते डोंगरदऱ्या....
पाहे अथांग सागरा,
विसरून देहभान
विलंब ना तो क्षणाचा,
करी उत्कटतेने समर्पण !!
सौ.सुगंधा पंकज रागळवार.
वोल्सबुर्ग - जर्मनी .
No comments:
Post a Comment