काळ जातो भराभरl
उसंत ना क्षणभरl
जाई सकाळ दुपारl
मग पुन्हा संध्याकाळll
दिस जाती मास जातीl जाती वर्षांमागे वर्षl तपामागूनही तपेl
आयुष्याचा परामर्शll
गेले रम्य बालपणl
तरूणाईचा श्रावणl
तो ही गेला बरसूनll
धावे पुढे पुढे क्षणll
प्रौढत्वाचा आला काळl
दावी वाकुल्या खट्याळl
काही मनात काहूरl
काही दाटे हूरहूरll
आयुष्याची संध्याकाळ
उभी ठाकली समोरl
नको होऊ चिंतातूरl
आहे वेळ भरपूरll
उरलेला क्षण क्षणl
वाया जाऊ न देईनl
पुरा सार्थकी लावीनl
दिले मला मी वचनll
Shital Joshi
No comments:
Post a Comment