Tuesday, 1 December 2020

कोरोनाबाबा

 

२०२० साल ऊजाडता ऊजाडता आला कोरोनाबाबा,
म्हणता म्हणता त्याने काही दिवसातच घेतला जगाचा ताबा|
अविरत फिरणारे जग जागीच झाले ठप्प,
दिनरात फिरणारा माणुस झाला भेटी विना गप्प|

कोरोना फिरवतोय जगभर गोफण गुंडा |
 मास्क, सॕनिटायझर, सोशल डिस्टन्स हा नवा फंडा|
 साध्या साध्या आजाराला करा कोरोना टेस्ट,
 नव्या फंड्याचे नवे नियम आहेत भलतेच बेस्ट|
करा ॲडमिट करा क्वारंटाइन व्हा आयसोलेटेड,
सामान्य माणसाचे तन मन धन सारे काही वेस्ट |
कामावरुन घरी परतताच आधि घ्या शाॕवर,
कंटाळला जीव या सा-याला झालाय भलताच कहर !
 
कशी अन् कुठून आली ही जागतिक लाट,
सर्व जगच जणू होते की काय भुईसपाट !
सुरळीत होईल का ही सर्व अस्थिरता |
सगळे जण झालेत मात्र भेटीस आतूर आता |
अंत नका पाहू हो मानवाच्या सहनशिलतेचा |
देवा दाखव रे आता चमत्कार तुझ्या शक्तिचा |
 
Neha Pethe 

No comments:

Post a Comment