Tuesday, 1 December 2020

Kavita

 

तू आणि मी,
भिन्न रूपी  दोघीजणी।
एकाच घरात राहून ही
एकमेकींना अनोळखी।।

मी अवखळ झऱ्यासारखी,
बिनधास्त कड्यावरून कोसळणारी।
तू शांत नदी सारखी,
संथगतीने वाहणारी।।

माझा अवखळ मुक्त भाव,
तुला कधीच रुचला नाही।
तुझा संथगती संयम,
मला कधीच कळला नाही।।

कळत नकळत मी तरीही,
तुझ्याच पाण्यात मिसळणार आहे।
आज अनोळखी भासले तरीही,
तुझेच 'पुरवणी पान' आहे।।
©रसिका काकतकर

No comments:

Post a Comment