चंद्राचं चांदणं आणि माझं तुझ्यात लपणं.
चंद्राची शितलता आणि तुझी सरलता,
चंद्र तर मैलो न मैल दूर आहे,
तू दूर असूनही सावलीसारखा बिलगुन आहे.
चंद्राच्या विविध कला आणि तुझ्या क्षणात बदलणाऱ्या नवनवीन छटा,
कधी जीव जाळणाऱ्या तर कधी जीव ओवाळून टाकावा जशा.
चंद्र तुझं प्रतिबिंब.
कधी ढगाआड तर कधी पानांआड, लपाछुपीचा खेळ सारा, कळत नकळत फुलला प्रेमाचा पिसारा.
K. Vrishali
No comments:
Post a Comment