Friday, 5 April 2019

दिवस तुझे हे फुलायचे' चे विडंबन यंगिस्तानसाठी

दिवस तुझे हे, shine मारायचे,
Peers ना impress करायचे,
Latest मोबाईल, latest लॅपटॉप,
भुरळ घाली, FB, whats app,
सतत, status, dp update करायचे,
Likes, comments, troll करायचे,
दिवस तुझे हे...
Headphones नी सदैव engaged कान,
Malls, multiplexes मध्ये हरपते भान,
Trends conscious रहायचे,
'मामू' ना target करायचे,
दिवस तुझे हे....
यारी, दोस्ती अपना इमान,
Communal study हे कार्य महान,
दोस्तांवर जान छिडकायचे,
दुश्मनला खुन्नसने नडायचे,
दिवस तुझे हे...
क्रिकेट, कबड्डी आणि फुटबॉल,
लीग गेम्सनी केली कमाल,
Local talent, झाले मालामाल,
Logo वाले T-shirts, अंगी मिरवायचे,
Favourite टीमला cheer करायचे,
दिवस तुझे हे...
आई घाली साद, खावया जेवण,
इथे ढेकरेवाटे आरवतं पोटातील चिकन!
तिच्या राग-संतापाला कारण बनायचे,
तिला सॉरी म्हणत, मिठी मारून पुन्हा खुलवायचे,
दिवस तुझे हे...
"हर एक friend जरुरी होता है", म्हणते कुठलीशी ऍड,
आम्हां dudes साठी, सबसे जरुरी होते है dad,
त्यांच्या कृपेने, netpack तुडुंब भरायचे,
अन virtual world मध्ये डुंबायचे,
दिवस तुझे हे...
मात्र परीक्षा जवळ येता, चुपचाप,
दुर्लक्षित होते, FB, whats app,
खाण्या-पिण्यावरून मन उडवायचे,
रात्री जागवून, syllabus भेजात copy-paste करायचे!
दिवस तुझे हे...

By

Akanksha Phadke

Mumbai, India

No comments:

Post a Comment