Saturday, 1 February 2020

मिशीवाला नवरा

मिशीवाला नवरा 

इंजिनिअरिंग झाल्यावर आम्ही चौघीही मैत्रिणी एकाच कॉलेजमध्ये lecturer होतो... क्लास चे Lecture संपले की आमच्या सगळ्यांच्या गप्पा, गमती, चिडवणे सुरू असायचे...
त्यांत आम्हाला बघायला स्थळं सुरू झाली होती... मग काय पाहुणे येऊन गेले की दुसऱ्या दिवशी आमच्या discussion चा विषय 'तो मुलगा'...🤵
कितीतरी स्वप्न असतात ना मुलींचे लग्नाबाबत...असा नवरा पाहिजे तो... असा दिसला पाहिजे, गोरा पाहिजे, सावळा पाहिजे, उंच पाहिजे, सलमान सारखा पाहिजे, शाहरुख सारखा पाहिजे, श्रीमंत पाहिजे, साधा-भोळा पाहिजे, बोलका पाहिजे, आणखीही बरंच काही😜😜...
प्रत्येकी च्या मनात एक वेगळं चित्र...
एक वेगळं स्वप्न...
 नवरा किंवा प्रियकर छान गोड दिसणारा आणि मुख्य म्हणजे ते दाढी मिशांचं जंजाळ नसलेलाच हवा, अशीच प्रतिक्रिया मिळते generaly लग्नासाठी मुलं पाहतांना...😝
तसंच माझंही होतं...मिशाळ असल्याचं कारण देऊन चक्क आम्ही स्थळ नाकारत होतो... 😏 त्यामुळे सध्या लग्नाच्या बाजारात क्लीन शेव्हड् तरुणांची चलती आहे असं च वाटायचं आम्हाला...मिशा हे लग्न जुळण्यासाठी येणारी बाधा होती...
पण आमची एक friend ऋतू ...
दिसायला गोड, साधारण गोरी, नाकीडोळी रेखीव, लांब रेश्मासारखे केस, सडपातळ बांधा...
 ऋतुचं मात्र सगळं उलटंच होतं...
ऋतूला बघायला येणाऱ्या मुलांना मिशीमुळे च नकार मिळणार होता ...😂🤣😂मिशा हे च लग्न जुळण्यासाठी येणारी बाधा होती तिच्यासाठी पण...
मात्र त्यामागचा हेतू दुसरा बरं का!!🤗
आम्हाला मिशी असलेला नवरा नको वाटायचा...😬 आणि ऋतू ला मिशी असलेला च नवरा हवा होता...🙄
आमच्यापैकी कोणालाही एखादं स्थळ बघून गेलं की दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे कॉलेज मध्ये त्याचा अख्या biodata च फडशा पाडायचो आम्ही... 
"नाव-गाव-वस्तू-प्राणी" हा game खेळल्यासारखे त्याच्या मागे लागायचो... जॉब, कंपनी, कधी जॉईन झाला, दिसायला कसा आहे हे सगळं शोधून काढायचो... facebook वर त्याला बघायचो...
आमची टीम जासुशी करण्यात गुंतून जायची...🕵
कोणी गोरं असायचं तर डोळे घारे, कधी खूप उंच तर कधी ठेंगणा, कधी नाक पोपटासारखं वाटायचं तर कधी तो सावळा वाटायचा,आणि एखादा चुकून आवडला तर जॉब कंपनी नाही पसंत पडायची...🙆 कधी घर तर कधी लोकं नाही आवडायचे...
कोणी विचित्रच प्रश्न विचारायचे तर कोणी काही विचारायचं च नाही... मग अजून जास्त संशय !!!🤦
पण ऋतूला मुलगा बघून गेला की ऋतु पाहिले आपला फोटो त्याच्या फोटोजवळ लावून बघायची, "तो आपल्याला शोभतो का??"🤷
ऋतु आणि तिच्या घरच्यांना अपेक्षाही खूप होत्या... मुलगा इंजिनीअर, पुण्यात जॉब, घर, शेती सगळंच हवं होतं... 🙊 main म्हणजे तिला clean-shaved वाला मुलगा नको होता... 🙉
ऋतु नेहमी म्हणायची, "मला मिशीवाला नवरा पाहिजे..."😬तिनी ही ईच्छा दर्शविली तेव्हा आम्ही खूप मजा घेतली तिची... खूप चिडवलं...😜😝 
आम्ही म्हणायचो, "नसली तर काय?? तुला आवडत असेल तर तो नंतर ठेवेल की दाढी मिशी... ये तो घर की खेती है, मेरी जान!!! जब कहोगी उगेगी, जब कहोगी clean हो जायेगी!!!"😝
ऋतु म्हणाली की, "दाढी नको ग्.."😪😥"माणसाइतकी नसली तरी थोडीफार दाढी तर बोकडांनाही असते यार..."
"पण मिशी... पाहिजे यार... मिशी तर हवीच!!! "
ती खूपच serious होती या अटीवर...😒 
मग आम्ही पण थोडं serious झालो...🤐
आणि मुख्य म्हणजे ऋतूला जेव्हा मुलगा बघायला यायचा तो नीट clean shave करून यायचा... बहुतेक त्यांना वाटत असेल की आपण की जेणेकरून नीटनेटकं दिसायला हवं म्हणून असेल, पण व्हायचं उलटंच...😛
मग जो मुलगा ऋतुला बघायला यायचा त्याच्या फोटोवर आम्ही मिशी काढून बघायचो की तो मिशी असली तर कसा दिसेल...🙊🙉
आणि त्यात पण type असतात बरं का!!कोणाला साधी, कोणाला मोठी, कोणाला पाटलासारखी मिशी काढायचो आणि जोक्स करायचो... खूप मज्जा यायची...😜😂😆
कोणाला चार्ली-चापलीन तर कोणाला पीळदार... 
"फ्रेंच कट, स्टबल, चीन स्ट्रीप, गोटी असे अनेक प्रकार आहे दाढी मिशीचे" हे ही आम्ही तेव्हा शोधून काढले...😎🕵
ऋतु च्या म्हणण्यानुसार मिशीवाला नवरा रुबाबदार, रांगडा, घरंदाज, सभ्य, handsome, dashing वाटतो...🙃😲
तिचा हट्टच होता की, "मिशीवाला च नवरा पाहिजे..."😢एक-दोन मुलांनी पसंती दाखवल्यावर, हिने सरळ नकार दिला...🙁 कारण की, एकाला मिशी नव्हती आणि एकाला होती पण ती शोभत नाही म्हणून...🙃
आम्ही समजवायचो तिला अग ये तो घर की खेती है यार, आज नाही तो कल आयेगी ही आयेगी...🤓😜 पण ऋतु मानायलाच तयार नव्हती...😧
तिला किंग लुक असणारा, मिशी शोभून दिसणारा, भारदस्त नवरा हवा होता...
"अरे यार मुंछ नहीं, तो कुछ नहीं..."असं म्हणायची ऋतू...🙆🤦
आमची ऋतू बिचारी... मिशीमुळे तिचं लग्न जुळायला फारच वेळ लागत होता...🙄
पण म्हणतात ना "अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है..."🤗
एक दिवस एक स्थळ आलं...
 तो मुलगा ऋतूला घाईघाईत बघायला आला होता... त्याला लगेच पुण्याला निघायचं होतं...
 ऋतूला मुलगा आवडला कारण त्याला मिशी होती आणि main म्हणजे त्याला ती मिशी suit होत होती...☺️एकदम भारदस्त, रुबाबदार, किंग लुक असणारा मुलगा भेटला... 
आणि ऋतू... 💘
"दिल की धडकने तेज हो गई बाबू... 
दिल मे guitar बजने लगी...
कुछ कुछ होणे लगा..."💕
दोघंही बोलले एकांतात... दोघांनीही पसंती दर्शवली...😍
दुसऱ्या दिवशी ती कॉलेज ला आली तेव्हा एकदम खुश होती गाडी...☺
लग्न ठरलं... 
शेवटी देवाने ऐकलं... 🙏🏼ऋतूला मिशीवाला नवरा भेटला...💝
 त्याच्याकडून त्या दिवशी चुकीने राहिलेली मिशी आता आयुष्यभर त्याच्या चेहऱ्यावर वळवळत राहील...😃🤣
(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात.... तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल... कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका...😂)
---दिप्ती अजमीरे.

No comments:

Post a Comment