भाषा म्हणजे मायबोली,
शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थाची गहन खोली,
भाषेची बहीण, अस्मिता,
अन तीच दर्शवते, तुम्ही भाषेवर किती प्रेम करता!
लिपी, गद्य, पद्य, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार ही भाषेची मूलभूत अंगं,
अन भाषा प्रत्येक सजते, लेवून स्वतःचा खास, राग-रंग-ढंग!
भाषा म्हणजे माणसामाणसांना जोडणारी नाळ,
पण कधी माणूसच ठरतो, तिचा कर्दनकाळ!
आज गौरव दिन आहे, आपल्या माय मराठीचा,
इतकी दैदीप्यमान परंपरा लाभूनही, इतर भाषांपुढे तिने का घासाव्यात टाचा?!
तिचा गौरव वृद्धिंगत करावा हाच दृढनिश्चय असावा प्रत्येक मनीचा,
केवळ शासकीय 'जुलमाचा रामराम', फार नाही कामाचा!!
आकांक्षा
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment