मोसन तुटू देऊ नको! मोसन तुटू देऊ नको. मोसन मत तोडना! हे वाक्य असंख्य वेळा ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर आणि त्यांचे क्लीनर यांच्या तोंडून ऐकलंय. वाहन चढणीवर किंवा उतारावर असताना हे मोसन सांभाळावं लागत असावं नाही!
वाहन सुरू राहण्यासाठी मोसन - मोशन- गती ही सांभाळावीच लागते. वाहनच का? मनुष्यालाही आयुष्याचा गाडा हाकताना ह्या 'मोसन तुटू देऊ नको!' ची नितांत गरज आहेच की. हेच बघा ना पहाटे उठण्याची सवय एखाद दिवस जरी खंडीत झाली की त्या अख्ख्या दिवसाचं मोसनच तुटतं.
साधी, रोजची देवपुजा करण्याची वेळ चुकली, स्तोत्र म्हणण्यातला क्रम चुकला तरी सगळं गडगडतं. असं झालं की मनाला रूखरूख लागते ती वेगळीच.
नातेवाईकांच्या मित्र-मैत्रीणींच्या आपण संपर्कात राहिलो तरच संपर्क कायम राहतो, नाती टिकून रहातात. कामं, मग ती घरातली असोत की बाजारहाट, बॅन्कींगची किंवा अन्य; ती करायची सवय ठेवली तरच कामं व्यवस्थित करू शकतो.
थोडक्यात काय मोसन चुकू द्यायची नाही.
By
Anagha Joshi
No comments:
Post a Comment