Tuesday, 31 March 2020

काजू कतली

काजू कतली



 




साहित्य

 काजू पावडर १ कप 
साखर १/२ ते ३/४ कप 
पाणी १/४ कप 
वेलची पावडर १/४ चमचा 
वर्खाचा कागद 
निर्लेप पॅन 

कृती


प्रथम मिक्सरवर मोकळी काजू पावडर करून घ्यावी. 
निर्लेप पॅनमधे प्रमाणात दिल्या प्रमाणे साखर व पाणी घालून मंद गॅस वर पाक करायला ठेवावा. पाक चिकट झाला की गॅस १ वर (अगदी मंद ) ठेवून त्यात काजू पावडर  घालावी.  

आता गॅसची आच मध्यम करावी. त्यानंतर हे मिश्रण पॅन पासून सुटायला लागेपर्यंत ढवळत रहावे.



नंतर गॅस बंद करून हे मिश्रण दुसऱ्या ताटात काढून घ्यावे. आता हे मिश्रण तूप लावून आणि वेलची पावडर घालून हाताने चांगले मळून एकजीव करून घ्यावे.
.  


तूप लावलेल्या ट्रे मधे हा मिश्रणाचा गोळा थापून लाटून घ्यावा. आता वर्खाचा कागद (availableअसेल तर) लावून सुरीने वड्या कापाव्यात.

टीप
मिश्रण जर मऊ न राहता पटकन घट्ट होऊ लागले तर १-२ चमचे दूध मिसळावे. 

- सौ. प्राजक्ता भागवत (Braunschweig)

No comments:

Post a Comment