तात्याराव, स्वातंत्र्यसमरात आणि तत्पश्चातही तुम्ही होतात कर्तव्यनिष्ठ, निरपेक्ष भीष्म!
परकीय तर परकीयच, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वकीयांनीही तुमच्या भाळी लिहिला, आरोप, उपेक्षा, हाल-अपेष्टांचा तप्त-दग्ध ग्रीष्म!
तरीही ध्रुवताऱ्याप्रमाणे तुम्ही आपल्या तत्व आणि देश आणि विज्ञाननिष्ठेवर राहिलात अढळ, अविचल,
सच्च्या कर्मयोग्याप्रमाणे या कुठल्याही षडयंत्रांचा तुम्हांला वाटला नाही सल!
स्वार्थी दधिचीप्रमाणे, गांधी नेहरूंच्या भारताने शेवटी, आपणांस आत्मार्पणास केले उद्युक्त,
नचिकेताच्या निर्भयतेने, तुम्ही मर्त्यतेतून झालात आत्म-मुक्त!
रूढार्थाने, जरी मृत्यूचा झाला जय,
तरी ' मरावे परी किर्तीरूपे उरावे' या उक्तीप्रमाणे तुम्ही झालात, चिरंजीव, मृत्युंजय!!!
By
Akanksha Phadke
No comments:
Post a Comment