कोरोना व्हायरसने ने घेतले कित्येक बळी
मास्क लावून , सॅनिटायझर वापरुन घ्या काळजी.
नको भीती, नको अफवा; करु नका गर्दी
उद्या चौदा तास घरात बसण्याची आलेय वर्दी.
करफ्युमागचा जाणून घ्या तर्क
भारतीयांच्या जीवासाठीच आहेत ते सतर्क.
बंदला सहकार्य करुन घालवूया कोरोनाची आपत्ती
धंदा, पैशाचा नको विचार ; कमावता येईल नंतर संपत्ती.
नको प्रवास, नको हाॅटेलिंग नको अशी मजा
बिनधास्त राहून नका करुन घेऊ स्वतःलाच सजा.
कोरोना मुक्त होण्यासाठी करु या प्रतिज्ञा
बाहेर पडायच नाही, गर्दी करायची नाही हीच पाळूया आज्ञा.
By
Achala Dharap
No comments:
Post a Comment