अबोली
गोड अबोल अबोली निःस्तब्ध आज जराशी,
हलकेच स्पर्शिता अंगणी बरसली.
नयनातूनी निरागसता ,
रूदने ह्रदयातूनी,
मनीचे बोल ही
स्पंदने बोलली.
तरल भाव- भावनांचे,
तोरण मनी गुंफूनी,
स्पर्शिता वारा तिजला
मन भावविवश बरसली.
सरी पावसाच्या
करी हितगुज तिच्याशी ,
मनमुक्त बरसुनी
घे श्वास स्वच्छंदी!
गोड अबोल अबोली जरी निःस्तब्ध जराशी,
हलकेच स्पर्शिता स्वच्छंदी बरसली.
सौ. सुगंधा पंकज रागळवार
जर्मनी
No comments:
Post a Comment