Saturday, 1 August 2020

Marathi Kavita

देवा असे कसेl दिले हे शरीरl सकाळ दुपारl खाय खायll

किती याचे पहाl जिभेचे चोचलेl पुरवता भलेl दमछाकll

गळकी पिशवी l पुन्हा पुन्हा भरीl यातायात करीl नाना परीll

पोटासाठी दाहीl दिशा फिरवतोl बहू कष्टवतोl देह साराll

अन्नमय प्राणl सत्यची हे असेl संदेहही नसेl यात काहीll 

परी मनुजा रेl  विचार हा करीl आलिया शरिरीl ध्येय दुजेll

मन बुद्धी चित्तl दिधले देवानेl परि अहंतेनेl घात केलाll

शरिरी येऊनl घ्यावे तू जाणूनl परमेश कोणl ओळखावाll

याचसाठी बा रेl करी अट्टहासl तुझा तुला खास l गवसेलll


Shital Joshi

No comments:

Post a Comment