"अंजनी महादेव ''
बडोद्यात गरमी सुर झाली की मनालीतील हिरवेगार डोंगर, ऊंच ऊंच चीड, देवदार ची वृक्ष खुणाऊ लागतात . आम्ही रहात होतो ते ठिकाण old Manali त एका ऊंच टेकडीवर होतं.
समोरचा देखावा खुप सुंदर होता . हिरवा मखमली डोंगर, अनेक ठिकाण हुन छोटे धबधबे अविरत सुरु होते . घराभोवती शेतात strawberry , भाज्या लावल्या होत्या. सफरचंदाचीबाग आणी चेरी नी लगडलेली झाडं!
मनालीत आल्यावर सोलंग, नग्गर, कुल्लु सगळीकडे public transport नी फिरायचे ठरलेले. Global warming टाळण्यासाठी...
अंजनी महादेव ला जायला सोलंग नाला ची बस सकाळी ८ वाजता होती . १.५ कि.मी. च्चा trail walk नी मालरोड च्चा बस डेपोत पोचलो. बस जम्मू पठानकोट वरुन गच्च भरुन आली होती. जेम तेम चढायला मीळालं. बस सुटे पर्यंत
तुडुंब गर्दी झाली . दोन स्टॅाप नंतर टेकायला जागा मीळाली. साधारण ११कि.मी. चा प्रवास होता . Government बस मध्ये महिलानां concession आहे. थोड्या वेळाने एक गांवकरी महिलांचा ग्रुप चढला. एका बाईनी पाठीवर गोरं-गुबरं ५-६ महिन्याच बाळ घोंगडीत बांधुन घेतलं होत. इतक्या गर्दीत आपल्यालाच अडचण होते तर ही बाई बाळाला घेऊन कशी प्रवास करणार? पण रोजची सवय आणि नीरुपाय माणसाला कणखर बनवतो खरचं. बाळालाही गर्दीची सवय असणार ! त्याने पण एकदाही हुं कि चुं केलं नाही. Back pack ची संकल्पना ह्यावरुनच आली असेल नाही का?
सोलंग नाल्याला उतरल्यावर एका टपरीवर अंजनी महादेव चा रस्ता विचारला. तीथेच आलं घातलेली वाफाळलेली कॅाफी गट्टम केली आणी trek सुरु होतो तिथे आलो. Modified bikes व घोड्यांचा सुळसुळाट होता. आम्ही पायीच जाणार होतो . दगड-धोंड्यांचा ३ कि.मी. चा trek होता.
बघावं तिकडे हिरवेगार डोंगर त्यावर बर्फाच्चा राशी उन्हात चमकत होत्या. देखाव्यांचे फोटो घेत, घोड्यांना चुकवत आम्ही जाऊ लागलो. मध्येच गाय-याक जवळ आले कि भीती वाटायची. पण मुके प्राणी अपापल्या वाटेनी नीमुट नीघुन जातात. अपल्यालाच का भीती वाटते कळत नाही!
हळु हळु मंदिराचा घुमट दीसु लागला. डोंगरात वाटतं जवळ पण वळसे घेत तिथपर्यंत पोचण्यात बराच वेळ गेला. सरतेशेवटी एक बर्फाचा डोंगर आला. त्यावरुनच मंदिर कडे जायचं होत. आजुबाजुला मैदानात गवताची कुरणं होती. फक्त ह्या डोंगरावरच बर्फ! नीसर्गाची किमया काय वर्णावी.
होता डोंगर छोटासाच पण चढ होता आणी बर्फातुन चालायचं होतं. पींडी दिसायला लागली. वातावरण खुप थंड होतं. वरुन जोरात धबधबा कोसळत होता. त्याचे गार गार तुषार अंगावर घेत पींडी भोवती प्रदक्षीणा घालत होतो. धबधब्यामुळे पाऊल बुडेल एवढे थंडगार पाणी होते. बर्फ वीतळलेले पाणी ते !
प्रदक्षीणा पूर्ण केली आणि एक चमत्कारच पहिला मीळाला. धबधबा थोडा दुर पडत होता तो एकदम महादेवाच्चा पींडी वर पडायला लागला. जलाभिषेक दोनच मींनटं झाला . काही कळायच्चा आत परत मुळ जागी धबधबा सुरु झाला.
हे दृश्य डोळ्यात साठवत परत खाली उतरायचे होते. गर्दी खुप होती. बर्फाच्चा डोंगरावरुन हळु हळु खाली येताना एक पोकळी दीसली . नीट वाकुन बघीतल्यावर लक्षात आले त्या मंदीराच्चा पायरया होत्या. त्याचावरच हा बर्फाचा डोंगर तयार झाला होता
हिमालयात काहीतरी जादु आहे. एकदा तीथे गेले कि त्याची आोढ लागते व परत परत जावेसे वाटते.
सौ. चित्रा देवधर...
No comments:
Post a Comment