आठवणींचा रस्ता, तुझ्या घरावरून जातो,
मनाचा चोरकप्पा, तो, अलगद उघडून जातो,
आंबट-गोड प्रसंग ते, मी नव्याने अनुभवते,
स्वतःशीच, कधी हसत, कधी कुढत, कधी ओलावले डोळे पुसत, पुन्हा भानावर येते!
आकांक्षा
----
तुझ्या आठवांचं, माझ्या मनाशी, समीकरणच आहे व्यस्त!
जितकी मी स्वतःला दाखवू पाहते निर्लेप, तितक्या पटीत घालमेल वाढून, मी होते पार त्रस्त!
जितका मी तुला करू पाहते, माझ्या आयुष्यातून वजा,
तितक्या अधिक असोशीने आठवत, उडवतोस माझा फज्जा!
एका पाठोपाठ एका कामात स्वतःला गुंतवून, बघते मी तुला भागून,
तरी सरतेशेवटी, भाग न गेलेल्या बाकीसारखा तू उरतोसच, मला पुरून!
आकांक्षा
No comments:
Post a Comment