Saturday, 7 September 2019

जीभेचे गुलाम


वयाच्या ३३ व्या वर्षी मला ह्याची जाणीव झाली आणि माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली

आमच्या घरी पहिल्यापासूनच व्यायामाची आवड! आई-बाबा दोघेही गिर्यारोहक....

मी १२ १५ वर्ष शाळा कॉलेजमध्ये असतांना जलतरणात नॅशनल्स मध्ये पार्टिसिपेट करुन मेडल्स मिळवली. आणि योग विषयात एम्. एस.सी. करुन जॉब सांभाळून योग पण शिकवत होते. पण जेव्हा, माझी मुल आणि वर्षांची होती तेव्हापासून आम्हाला लक्षात येऊ लागले की काहीतरी बदल केला पाहिजे. वारंवार चालणारी मुलांची आजारपणे, माझे आणि नवऱ्याचे वाढलेले कोलेस्ट्रॉल, घरी आल्यावर दुसरे काहीच करायला उरणारी ताकद ह्या सगळ्यामुळे मग आम्ही आमचा आहार बदलला

आणि आता वर्षानंतर, जेव्हा सगळे आजार दूर झाले, कुठल्याही औषधाशिवाय आणि नुसते तेच नाही तर बघितलेली स्वप्न सत्यात उतरविणे शक्य सुद्धा झाले. वर्षापूर्वी  L3-L4 disc bulgeचे निदान झाल्याने मला बेडरेस्ट होती, तेव्हापासून ते आत्ता आमच्या आयुष्यात खूपच चांगले बदल झाले आहेत. आम्ही दोघ आता दरवर्षी एक हाफ मॅरेथॉन पळतो. स्वतःच्या ऑरगॅनिक भाज्या पिकवतो आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कामही करु शकतो.
मी माझा आय. टी. मधला जॉब १० वर्षे काम करुन सोडला आणि आता पूर्णवेळ मी क्लीन इटिंग बद्दल अवेअरनेस निर्माण करणे आणि लोकांना हा आहारातील बदल करायला मदत करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे

ह्या सिरीज मधे मी क्लीन इटिंगशी आधारित वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करणार आहे. तर ह्या महिन्याची थीमप्रमाणे आजचा विषय आपण सगळे जीभेचे गुलाम!

जितक्या लवकर हे आपल्या लक्षात येईल आणि जितक्या लवकर आपण त्यावर कृती करु तितक्या लवकर आपण आरोग्यसंपन्न आयुष्य जगू शकू

कसे काय बर आपण सगळे जीभेचे गुलाम बनतोॽ लहान मुलांना अगदी जन्म झाल्यापासून, रडल्यावर, पडल्यावर साखर चाटवण्याची पद्धत आहे. साखरेचे व्यसन हे अगदी तेव्हापासून सुरु होते. आणि मग आला रविवार करा गोड, आला वाढदिवस कापा भरपूर साखर, अनैसर्गिक रंग आणि स्वाद घालून केलेला केक! आणि वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून चॉकलेटस्. आणि सध्या तर ऑफिसमध्ये सुद्धा प्रत्येक जेवणानंतर गोड पदार्थ दिल्याशिवाय लोक जेवत नाहीत म्हणे
Norcan नावाचे औषध जे अफू, गांजा अशा व्यसनातून बाहेर येण्यासाठी वापरतात, तेच औषध दिले तर साखरेच्या व्यसनामधून तुमची सुटका होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे काॽ अमली पदार्थाचे सेवन केल्यावर आपल्या मेंदूवर जो परिणाम होतो तोच परिणाम साखरेचे सेवन केल्यावर होतो! आणि अशी अनेक अन्नपदार्थांची व्यसन पण स्वतःला आणि आपल्या मुलांना लावत होतो! चहा, कॉफी, ऑइली जंक फूड ही काही उदाहरणे. आणि ह्याचे दुष्परिणाम फार भयंकर आहेत

एकदा जीभेला ह्या मिट्ट गोड चवीची चटक लागली की मग खजूर, आंबा, कलिंगड अशातून मिळणारी नैसर्गिक साखरेची चव सुद्धा आपल्याला गोड लागत नाही. कशी काय मग मुल आणि आपण सुद्धा आनंदाने फळ खाणारॽ तीच गोष्ट तळलेल्या पदार्थांची! दिवाळीशिवाय दिसणारे चिवडा-लाडू आता खालच्या दुकानात विकत मिळतात. फूड मॉलच्या आयझेलवर रु. च्या पॅकेटस् मध्ये चिप्स, तळलेले दाणे, चिवडे, बिस्किटस् असे बरोबर मोक्याच्या जागी ठेवलेले असते. रुपयात काय सत्त्व मिळणार आहे आपल्यालाॽ

तुम्हाला माहीत आहे का की ह्या विकतचे पदार्थ विकणाऱ्या ब्रॅडेड कंपन्या तयार झालेले पदार्थाचे व्यसन कसे लागेल, किती प्रमाणात तेल, साखर आणि मीठ घालायला हवे जेणेकरुन आपण एक पोटॅटो चिप किंवा एक बिस्किट खाल्यावर थांबू शकणार नाही ह्यावर भरमसाठ खर्च करीत असतातॽ ह्या पदार्थांचे व्यसन लागले की मग कशी बर आपली मुले फुटाणे, चणे, भाजलेले दाणे, भाजलेला मखाणा, खारीक, खजूर, बेदाणे असा खाऊ खातीलॽ

पण सुदैवाने ही गोष्ट लक्षात येऊन त्यावर कृती करण्यासाठी खूप लोक सध्या तयार होत आहेत आणि ते सर्वजण आपापल्या परीने ह्या अन्नाचे बाजारीकरण केलेल्या सिस्टिमशी हर तऱ्हेने लढताहेतमला अशा लोकांपासून खूप उर्जा मिळते आणि अजून मी प्रेरणा घेऊन क्लीन इटिंग ही एक चळवळ कशी होईल आणि त्याला समाजमान्यता कशी मिळेल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरु ठेवू शकते

मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्याच नाही तर क्लीन इटिंग करणाऱ्या बऱ्याच घरांमधून रिफाइंड शुगर, रिफाइंड ऑइल, कुठलेही विकतचे खाण्याचे पदार्थ गेल्या बऱ्याच वर्षांपासून अजिबात आणले जात नाहीत. आणि त्याचे परिणाम नक्कीच दिसून येत आहेत. डायबेटिसच्या गोळ्या बंद होणे, बी. पी. नॉर्मलला येणे, कोलेस्ट्रॉल कमी होणे, सतत आजारी पडणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात आपले जे ध्येय आहे त्यासाठी पूर्ण ताकदीने आजारी पडता काम करता येणे हे आहेत. 😊

आहात का तुम्ही क्लीन इटिंग पद्धतीचा अवलंब करायला तयारॽ मला ह्यावरचे विचार जरुर कळवा. माझा व्हॉटस्अप नंबर९६३२६७६३४१.

मी सोशल मिडियाच्या माध्यमातून ह्याचा प्रसार करतच आहे. क्लीन रेसिपीज, व्हिडिओज आणि प्रश्नोत्तरे ह्यासाठी माझा यूट्यूब चॅनेल



आणि इन्स्टाग्राम अकाउंटc.e.withsaee   - तुम्ही लाइक आणि सबस्क्राइब करु शकता.

By

Saee Bapat

Bangalore, India



1 comment:

  1. प्रस्तावना छान आहे, पुढील लेखमाला वाचण्याची उत्सुकता आहे, मला स्वत:ला आहार, आरोग्य आणि योग या विषयांत खूप रस आहे. मी तुमचा नं. सेव्ह केला आहे, चर्चा करायला आवडेल. मी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये मराठी शिकवते.

    ReplyDelete