Monday, 30 September 2019

कॅक्टस

कॅक्टस म्हटले की कोरडा, रुक्ष , बेढब, अपशकुनी असे काय काय एेकायला मिळते.  प्रत्यक्ष पाहिले की समजते “it’s perfect example of - survival of the fittest”

कॅक्टस खुप सुंदर असु शकतात, अथवा, असतातच.  जुनी विचारसरणी बाजुला ठेवून पाहिले की दिसते कॅक्टस किती सुंदर, नयनरम्य असतात.  दगडाच्या फटीतुन, लहान लहान कानाकोपऱ्यातुन, बिना पाण्याशिवाय वर्षानुवर्षे छान जगतात.   अगदी दुष्काळातही तग धरतात अन् योग्य वेळ आली की बहरतात सुद्धा.  वेगवेगळे रंग, पाकळीचे आकार, वेगवेगळ्या छटा; सगळेच खुप कल्पनेच्या पलीकडले अन् प्रेमात पाडणारे. 

कॅक्टस ची फॅमिली खुप विस्तृत आहे.  जागा, देश, क्लायमेट प्रमाणे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात.  अशा या मोठ्ठया फॅमिलीच्या प्रेमात कोणी नाही पडले तर नवलच!!


काही चित्रे खाली देत आहे.



By

Pallavi Karve Godbole

Pune, India

No comments:

Post a Comment