गणू बाळ म्हणे, "उंदरोबा,
हे जरी खरं की, मी आईचा लाडोबा!
पण तरीही दरवर्षी ती विसरत नाही मला बजावायला!
म्हणते कशी, "गणू, नेहमीप्रमाणे माझ्या आधी जातोयस माझ्या माहेराला,
सगळे लाड पुरवून घे, पण जरा जप हो, आपल्या पोटाला!"
आणि म्हणून त्या माउलीने स्वतः खपून एवढा मोठा मोदक आहे बनवला,
या दहा दिवसांच्या प्रवासात, काही म्हणून काहीही, मला-तुला, नको बाधायला!
By
Akanksha Phadke
Jogeshwari, India
Akanksha Phadke
Jogeshwari, India
No comments:
Post a Comment