Friday, 1 November 2019

नवरात्र

नवरात्र म्हणजे उत्साह, जल्लोष आणि शक्तीची आराधना !
चैतन्य , आनंद , सकारात्मकता ह्यांचे प्रतीक-  नवरात्र !

प्रत्येकाचे आराध्य वेगवेगळे , पण देवी ही सगळ्यांसाठीच वंदनीय - पूजनीय . प्रत्येकाची पूजेची पद्धत वेगळी पण प्रत्येकाच्या मनातील भाव मात्र सारखा . आपल्या कडून ह्या नवरात्री मध्ये देवी मातेचे कुठल्याही स्वरूपात पूजन -अर्चन व्हावे असे प्रत्येकाला वाटते .

मी पण त्यातलीच एक . 

आमच्या घरी कुलदैवत श्री. लक्ष्मी - व्यंकटेश ह्यांचे नवरात्र असते . 
तुळजाभवानीमाता  पाहुणी म्हणून तिचा  वेगळा थाट आणि रेणुका माता माझ्या सासू बाईंचे माहेर चे कुलदैवत .  मग काय लग्न झाल्या पासून नवरात्री मध्ये नुसता उत्साह संचारलेला असतो . पूजा - आरत्या - श्लोक, पाठ पठण, भजन , पद, जोगवा , व्यंकटेश स्तोत्र असे किती तरी प्रकार .  सगळ्यांना सगळेच तोंड पाठ. 
खूप छान वातावरण असते घरी ह्या दिवसात . सध्या आम्ही दोघेच हे करतो - जेवढे जमेल आणि जसे शक्य होईल तसे . 

ह्या वर्षी मी खूप दिवसाचा माझा मानस पूर्ण केला .
पंकज , आरती - पद म्हणताना जसे जमेल तसे देवी चे रूप साकारायचे . माझ्या कडून  ह्या वर्षी अश्या स्वरूपात देवीची आराधना करणे झाले . खूप समाधान वाटतंय .  
खडू ने फळ्यावर रेखाटलेली  देवीची रूपं मनःशांती देवून गेले 🙏
माझा एक छोटासा प्रयत्न !!


सौ. सुगंधा पंकज रागळवार

Wolfsburg-Germany 

No comments:

Post a Comment