सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशा व हव्या तेव्हाच होतील असे नाही हे मनाला कळत असते पण अंतर्मनातली घालमेल त्या समजूतदार मनावर कधीच रेघोट्या मारुन पार झालेली असते.आपली तगमग गुपचूप सुरूच असते. अशाच एका क्षणी ती माझ्या समोर आली.सावळी बुटकी नाजुकशी पण विलक्षण confident.तिने माझ्या घरी काम करायला सुरवात केली आणि बघता बघता माझ्या घराचे रंगरूप पालटून टाकले.सोफा इथे छान बसेल टेबल तिथे ठेवूया fridge इकडून सोपा पडेल microwave इथून हाताशी राहील असे सुचवत संपूर्ण घराची रचना बदलली कानाकोपरा चमकून उठला..मी प्रचंड खूष.तिच्या अस्तित्वाची मला सवय लागली.घर तिच्यावर सोपवून मी निर्धास्त. अंतर्मनातली धास्ती कुरवाळायला मला अधिक वेळ मिळत होता depression ची level वाढतेय हे कळूनही वळत नव्हते.
एकदा बोलता बोलता सहज तिला विचारले किती घरी अशी कामे केलीत तू तर म्हणाली कुठेच नाही तुमचेच घर पहिले.काही financial problem झाल्याने तिने हा काम करण्याचा निर्णय घेतला आणि निष्ठेने काम करू लागली. म्हणाली वास्तुची सेवा करतेय मी मग ती तुमची असली का माझी "तथास्तु " म्हणणारच ना ! ते आशीर्वाद मलाही लागणार. आज माझ्या आयुष्यात हे काम लिहिले आहे ..दिवस पालटण्यासाठी वाट तर पाहायलाच हवी..तुमचे सुंदर मोठ्ठे घर स्वच्छ ठेवताना माझे मनही स्वच्छ होते..काहीबाही विचार फेकून देता येणे म्हणजेच तर जगणे असते ना !!
अरे खरच की, मी किती क्षुल्लक विचारांनी मन मळवले होते.हे बदललेच पाहिजे. त्या क्षणी माझ्या मनात सप्तरंगी इंद्रधनुष्य मोहरले..
आता ठरवलेय हे इंद्रधनुष्य पकडून ठेवायचे,त्यातले रंग आपल्यासह इतरांच्याही जगण्यात भरायचे आणि अंतर्मनाच्या पटलावर आपणच रेखलेली सुंदर रांगोळी जपून ठेवत आनंदाने जगायचे !!
बाकीच्या नश्वर गोष्टी काय ,कधी ना कधी होतच राहतील !!!!!!!!
By
Smita Undirwadkar
Dombivli, India
छान लेख. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की घराचे मंदिर बनते
ReplyDelete