Monday, 30 September 2019

अनुभव

शनिवारी काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. सकाळी 9 वाजता ठाण्याहून निघालो. कसारा घाटातून जेंव्हा प्रवास सुरू झाला तेंव्हा अहाहा असं वातावरण होतं. अप्रतिम सुंदर दिसत होता घाट...हिरवाईच्या वेगवेगळ्या छटा...धबधबे....मस्त वातावरण होतं. घाट संपल्यावर  मानस हाॕटेलच्या अगोदर साधारण रस्यावर धुकं पसरायला लागलं. मी विवेकला म्हटलं पण की अरे काय सही मुहुर्तावर आपण हा प्रवास सुरू केलाय....नंतर धुकं खूप दाट व्हायला लागलं. मग तर मला अजूनच भारी वाटायला लागलं. आपण वेगळ्याच जगातून प्रवास करतोय अशी काहीशी भावना....Heavenly feeling....धुक्याच्या दाट दुलईतून वास्तव जगात प्रवेश केल्याबरोबर traffic jam, खराब रस्ते असं सगळं regular routine सुरू झालं. नाशिकला पोचलो.  मला घरी सोडून थोड्यावेळाने विवेक त्याच्या कामासाठी निघून गेला. मी, आई आणि  माझी लहान बहीण आम्ही  मनसोक्त गप्पा मारल्या. मी एकदम refresh झाले. संध्याकाळी  5.30 च्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. नाशिकहून निघताना नेहेमीच मला चुटपुट लागते. तशीच थोडी लागली होती. घोटी ओलांडून पुढे आलो. धुक्याची हलकी चादर पसरायला लागली होती. का कुणास ठाऊक मनाला थोडी हुरहुर लागली होती. पुढे जाउ लागलो तसं धुकं अजूनच गडद, घट्ट होउ लागलं. पुढंचं काहीच दिसत नव्हत. Literally धुक्याला चिरत गाडी पुढे जात होती. सगळं वातावरणच विचित्र, स्तब्ध झालं होतं. जणू काही आम्ही गाडीसकट एका वेगळ्याच मितीत प्रवेश करत होतो. वेगळाच time zone...त्या क्षणी अनेक गोष्टी आठवल्या.... गायब झालेल्या माणसांच्या, गाड्यांच्या....ज्यांचा काही पुढे trace च लागत नाही. आता सगळं संपलं ही मनाची stage आली. लोकांशी निर्रथक घातलेले वाद, कोणावर काहीतरी कारणाने  असलेला राग सगळं आठवायला लागलं. आणि जाणवलं किती साध्या गोष्टींमधे आपण राग, लोभ बाळगतो....

सकाळी रमणीय वाटणारं दृष्य आता फार भयानक वाटायला लागलं. सकाळी जे heavenly वाटत होतं ते आता दुसऱ्या अर्थाने heavenly वाटू लागलं. धुकं किंचित ओसरू लागलं. घाट सुरू झालेला होता. सकाळी भारी वाटलेले धबधबे पुसटसे दिसत होते आणि भितीदायक वाटत होते. गाडीत आम्ही गप्पच होतोहोता, होता धुकं कमी होऊ लागलं. दूरवर लतीफवाडीचे दिवे दिसायला लागले आणि मी सुटकेचा श्वास टाकला....


ह्याला काय म्हणायचं? माझ्याच मनाने घेतलेले हे दोन अनुभव....एक सकाळी, एक संध्याकाळी ....आपलं एखाद्या गोष्टीचं perception वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असतं का? आपल्या हातून कळत, नकळत झालेल्या चुकांची जाणीव तेंव्हाच का व्हावी? त्या आता यापुढे टाळूया असं मी ठरवलं....का हे स्मशानवैराग्य असेल? कुणास ठाऊक....

By 

Manjusha Datar

Thane, India

No comments:

Post a Comment