एक होता कार्व्हर
लहानपणी वाचलेल्या काही पुस्तकांनी पैकी एक पुस्तक म्हणजे "एक होता कार्व्हर" . मला आजही हे पुस्तक अनेक वेळा वाचायला आवडते, माझ्या मुलाला मी ते स्वतः वाचून दाखवते.
लेखिका वीणा गवाणकर यांनी त्यांच्या मुलांना "बेड टाईम स्टोरी" वाचून दाखवण्यासाठी शोध घेत असताना सापडलेल्या एका पुस्तकाचा अनुवाद म्हणजे एक होता कार्व्हर या पुस्तकाची निर्मिती.
शार्लेट ग्राहम आणि लिप्स कोंब यांच्या इंग्रजीतल्या "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर" या शास्त्रज्ञाच्या चरित्राचा अनुवाद म्हणजे हे पुस्तक आहे.
अधिकाधिक उपभोगाच्या हव्यासामुळे एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या आत्मघाती मार्गावर हाताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरन दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन विकास उपयोग पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुखसमृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचायला हवे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी वीणा गवाणकर यांनी आफ्रिकन_अमेरिकन वैज्ञानिक आणि शेती शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र म्हणजेच हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट विक्रेते म्हणून कायम आहे.
एका मनुष्याच्या धडपडीची कहाणी आणि संकटे व अडचणी मध्येही यशस्वी होण्याचा दृढ संकल्प हे या पुस्तकाचे सार आहे. कार्व्हरच्या ज्ञानाची इच्छा आणि तहान खरोखरच किती मोठी होती हे सुंदरपणे चित्रित केले आहे.
वनस्पतिशास्त्र आणि कृषी क्षेत्रातील कारवारचे योगदान अफाट आहे.पूर्वग्रहदूषित समाजात वाढत असणारा कार्व्हर,वर्णभेदाच्या घटनेची जाणीव करून देताना ही शिक्षण मिळवण्याचे त्यांचे धैर्य व दृढ विश्वास लेखिकेने थोडक्यात सांगितला आहे.
लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये वीणा गवाणकर यांनी कारवारच्या जीवनातील आणि संघर्षाच्या त्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या अनेक कौशल्यांना स्पर्श केला आहे. जगभरात "पीनट मॅन" म्हणून ओळखले जाणारे कार्व्हर हे "पीनट बटर" चा अमेरिकेत होणार प्रसार व याच्या विकासा मागील एक माणूस असल्याचेही समजले जाते. प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्या विषयी आणि आयुष्यात जे काही आहे त्यापासून काहीतरी बनवण्याचा त्यांचा संदेश अगदी साध्या पण स्पष्टपणे रेखाटण्यात आला आहे. हे कार्व्हरचे चरित्र शेकडो भारतीयांना व लहान मुलांना प्रेरणा देणारे आहे.
अनघा महाजन
स्टुटगार्ट, जर्मनी
No comments:
Post a Comment