Thursday, 26 September 2019

विरोधाभास

मैत्रीणीला स्टेशनवर सोडण्यासाठी गाडी काढताना ह्यांचं लक्ष गेटबाहेरील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी घातलेल्या ड्रेनेज पाईपकडे गेलं.  तिथे हे  उंदीर महाशय अडकले होते. एरवी उंदीर दिसल्यावर भीतीने किंचाळून ह्यांच्या रागाचा पारा चढवणारी मी; अगदी धिटाईने त्या उंदराकडे बघू लागले.  हे स्टेशनवरून परत येईपर्यंत म्हणजे जवळजवळ 10 मि. निरीक्षण करत होते.  एरवी उंदीर -घुशींना मारण्यासाठी विषाच्या वड्या तत्परतेने टाकणा-या मला त्या उंदराची चक्क कणव आली.  

शेवटी आमच्या खाजप्पाला फोन करून बोलावून घेतले आणि त्या उंदरड्याला सोडवायला सांगितले.  जरा वाकून बघितलं तरी चावण्याचा पवित्रा घेणारा उंदीर कुदळीनं माती खणून त्याला मोकळं करताना मात्र शांत होता. 

पिंजरा, विष या माध्यमातून ऊंदराला मारणारे आम्ही त्याची सुटका व्हावी म्हणून धडपडलो. किती विरोधाभास आहे ना हा! गंमत वाटली मला.

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment