Saturday, 30 November 2019

The secret - Keep going

It was 4 am in the morning I was soaked in sweat as I woke up and realized that there was no electric supply the previous night.  Yet another grueling day ahead!!!!!
Though I did not feel like getting up that day, I had no option but to start my routine, and eventually, the daily chores began.

There was no end to the daily activities starting right from the breakfast, the tiffin,  rush for the school timing, morning walk, early morning classes, laundry, and other household tasks.

There was no sign of rain even after we were long into monsoon season. Hence I thought of adding yet another task to my list -- a weekly visit to my parents.

I moved out in a hurry to catch the train. As I was walking towards the railway station, I realized that I was drenched in sweat, almost cursing everyone around me, including the rush, the unwanted crowd, the pollution, the sound of vehicles, scorching heat.
Not only that, few always blamed to be things like unannounced holidays of the maid, few repairing works at house, the increasing cost of goods. To add to that, I could see clouds rapidly gathering in the sky, I realized that I had not taken an umbrella. Now it was time to curse me for not being prepared or instead not being able to keep up with the pace of life.

I started to rush towards the station before the rain begins. But alas!!! It caught me, and I had to take shelter in front of a closed shop.

The entire world came to a grinding halt!!! The rain made everybody cut their pace and wait. I could still visualize a long  'to make' list to be completed. I was becoming more and more nervous. The rain had given me no option but to wait!!!

And then a thought came to my mind...What is making me do so many things at a time? What is keeping me motivated all the time? Why I am waking up early at 4 am every day? Why I do not prefer to have a good peaceful sleep on weekends? Why am I  aspiring to be perfect in everything I do? Why I m accompanying my 14-year-old daughter early at 3.30 am for her studies? Why??  I really wondered. Why I am hastily making a few tasty dishes for my parents and running all the way, taking the train journey just to see their happy faces? What keeps me organized and makes me detailing out every task to look after my beautiful home? What is that making me pursue my dreams,  testing my abilities to make me independent amid all the responsibilities? What is making me read and collect good books, listening to good songs, what is making writing, what is causing meet my friends? What is making me be able to teach my students? This way was making me nervous, and I was getting lost in my thoughts. What is that unknown form of energy, something which is not visible but flows within me which makes me care for my family, for myself? That unknown motivation.

As thoughts were picking up speed in my mind, so was the rain outside!!!!! The narrow lanes and roads were getting splashed up by water with a touch of fresh earthy scent.


The pleasant fragrance filled up my heart, it cleared my thoughts and brought peace to my heart. It seemed I got the answer to all my questions. I had a thunderstorm both inside as well as outside. There was no mandate, which was making me forcibly do things, but it was a hope which kept me going. A desire of seeing a smile on my  daughters face as she comes  back from school, a dream to create a beautiful human being from a tiny baby which I had given birth a few years back, a desire to express my love and gratitude towards my parents who live their entire life just to make me happy and successful, an aspiration to do something good , to invent myself  a desire to  make  myself a responsible human being, a feeling of satisfaction  which I get when I look at my neat and tidy home, a sense of gratification on my partners face . A kind of satisfaction when I teach my favorite subjects, contentment when parents of my students give me positive feedback. A smile I deserve when I can keep up all habits in my habit tracker. I think more than what we do for others in our close-knit circle, their happiness and their well-being matters to us the most.

Station still looked crowded, and chaos continued. Sudden downpour washed away all the dirt, and it gave me a perspective to speculate myself.

Meanwhile, the rain had stopped. I saw a small school going girl trying to catch raindrops and splashing it on her face. It was merely a joyful moment to watch her. This is life. A  small ray of happiness which gives hope.
Many times we try to achieve a lot of things at a time, and then we get stressed if we are not able to meet a deadline; we keep worrying about small things, and negativity fills up mind at a quicker rate. Life is all about dreaming with open eyes. Fighting and struggling to achieve it, Sometimes we lose sometimes we win but every time we learn. The real winner is the one who gathers up his courage to make something new and just keep himself going!!!!!!!

With that positive thought in my mind, I quickly collected my halted pace and boarded the train with a smile of happiness.


By

Vaishali Palsule

Thane, India

विक्रम और वेताल

वेताल ने विक्रम से कहा, "अपनी चतुराई और सूझबूझ से तुमने मेरे सारे सवालों के सही उत्तर दिये! इसीलिये मैं तुमसे प्रसन्न हूँ और तुम्हारे मस्तिष्क के चीथडे नही करुंगा, पर तुमने अपना मौन छोडा, तू बोला, और लो, मैं चला!!!
कहानी में ट्विस्ट...
***************
इसरो ने विक्रम से कहा, "चांद्रयान 2 मोहीमकी सारी कसौटीयां पार करते करते तुम चाँद पर उतरे, इसलिये हम और सारे भारतवासी तुमसे बहुत प्रसन्न है! माना की, चंद्र-स्पर्श के समय तुम लडखडा गये, और मायूस होकर हमसे चुप्पी साधकर बैठे हो, जबतक तुम हमसे नही बोलोगे, हम कही नही जानेवाले, कह देते है!!!

By

Akanksha Phadke

Andheri, India

Portugal Diaries - Part 2

Cabo de Roca, Sintra, Portugal
Cabo da Roca is a beautiful cliff, emerging 140 meters above Atlantic, it is said to be the most westerly point of mainland Europe. It is located about 18 km far from Sintra & about 40 km from Lisbon and surrounded by small fishing villages hidden among the forests of Sintra. The windswept cliffs of Cabo de Roca were believed to be the edge of the world up until the late 14th century, and the spectacular, desolate scenery adds to the allure of the location. The raging Atlantic Ocean waves pound the base of the massive jagged cliffs while challenging hiking trails follow the coastal paths. If you’re hoping to get there by public transportation, then the bus 403 (Cascais Line – Sintra) is the one you should look for. This bus departs from the Cascais terminal. It takes 20 minutes to get to Cabo da Roca and 35 minutes to get to Sintra’s central station. Before entering the bus, make sure it stops to Cabo da Roca since a lot of them are directing straight to Sintra. This place was amongst my favorite spots in Portugal, interestingly it also houses the oldest lighthouse in Portugal. A quick drink at this place will be the ultimate relaxation experience, but be sure to carry warm clothes too.
Wearing hiking shoes would not hurt either…….
PS – I could not have a drink because I was pregnant.
Faro, Portugal
Faro, Portugal, is well known as a sun-worshipper’s paradise. Lovely weather and unspoiled beaches are the highlights of what this spectacular region has to offer.
Ilhas Desertas – This secluded island is the perfect place to go when you want to escape the summertime crowds. To get there, you’ll take a ferry that leaves from a dock, which is a mere five-minute walk from old-town Faro. After a relaxing, forty-minute journey, you’ll disembark onto an island nearly deserted, but for the seagulls and a few other lucky visitors. There’s a restaurant here, but you can just as easily pack a picnic lunch. Don’t forget the sunscreen, either.
Old Town Faro – Travelers on their way to the beach often overlook Faro’s Old Town, but they’re missing out on one of the best things to do in Faro! Here, you’ll find winding cobblestone streets, stately old churches, plenty of shops and restaurants, and lots of lovingly restored 18th century Portuguese and Moorish-style buildings. In Old Town Faro, it’s almost like you’re stepping back in time.
Praia de Faro – This is one of Faro’s most popular beaches, and with good reason, too. The beach stretches nearly as far as the eye can see in either direction, and the water is a glittering, unbelievable blue. There are plenty of watering holes here, serving up delicious fare at affordable prices, and it’s a beautiful place for people-watching during the busy season. Kick back and enjoy the sun!

To be continued...
By
Rucha Flora Kris
Pune, India

शिक्षक पहावं होऊन आणि परदेशात पहावं शिकवून - भाग ३

"१७ जूनला म्हणजे पुढच्या शनिवारी सकाळी रुपाली तू येशील का? मी ट्रंपेट वाजवणार आहे.. ” इति मार्क. 
“जमलं तर बघीन.. शनिवारी कधी शाळेसाठी आले नाहीये तेव्हा ही बस असते की नाही मला माहित नाही सकाळी शाळेत यायला. बघून ठेवेन बसचे टाईमटेबल आणि सांगेन पुढच्या वेळेस तुला ”, मी म्हटले. 

शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक ह्यांच्यापैकी कोणीच जेव्हा मला काही सांगत नाही तेव्हा मला वाटेल तरी कसं तिथे जावसं? पण काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी ही सबब सांगून वेळ मारून नेली. पुढच्या शुक्रवारी मार्क चा पुन्हा तोच प्रश्न. 
“पाहिलस टाईमटेबल? आहे की नाही बस तुला यायला? ” 
आता आली का पंचाईत? एका टीचर कडे विषय काढला होता तर म्हणाली होती वर्षिकोत्सवाची तयारी चालू आहे असे.. पण पठ्ठी म्हणाली नाही, “ ये हो तू.." म्हणून..
पुन्हा आपले मी बसबद्दल माहित नसल्याचे सांगितले. शुक्रवारी ह्या शाळेत मधल्या सुटीच्या आधीचा एक तास घेऊन मी बोस्के मध्ये जायचे तिथल्या दुपारच्या वर्गांमध्ये.. आणि मुळातच माझ्या शहरातून ह्या गावांमध्ये येणारी बस तासाला एकुलती एक असल्याने ह्या एका शाळेतून दुसर्‍या शाळेत जायच्या वेळेस मला चालतच जावे लागे. मार्क सुटीत जेवायला जाताना त्याच्या घरापर्यंतचे थोडे अंतर आवर्जून माझ्याबरोबर चालत असे. त्या दिवशी मी बरोबर असतानाच तो मला आधी बसस्टॉप वर घेवून गेला. स्वत: बसची वेळ पाहिली आणि त्या वेळेस यायला बस आहे हे पाहून “तू उद्या येणार आहेस सकाळी ” असे त्याने ठरवूनच टाकले. मला काहीच पर्याय न राहिल्याने मी म्हटले सहजच 
“अरे पण मला कोणी सांगितले नाहीये शाळेत उद्या येण्याबद्दल.. ” 
“नको सांगू देत ना.. मी सांगतो आहे ना? तू येणार आहेस! ” 
दुसर्‍या दिवशी मला कार्यक्रमाच्या हॉल मध्ये पाहून सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो मार्क ला आणि त्या इंग्लिश च्या शिक्षिकेला, जी आजारी असल्याने गेला आठवडाभर शाळेत येऊ शकली नव्हती. बरीचशी मुलं मी त्यांचा नाच पहायला आले आहे हे पाहून आनंदली पण “मी आग्रह केला म्हणून रुपाली आली आहे ” असे सांगताना मार्क चा चेहेरा काही वेगळाच खुलला होता. 

कितीही झाले तरी मुले निरागसच असतात अशी एक आपली समजूत असते परंतु ते नेहेमीच खरे नसावे असे वाटायला लावणारा एक अनुभव तिथेच असताना आला. Tuilerie मध्ये एक मुलगा होता लार्बी नावाचा. आई-वडील मोरोक्कन होते. मला तर वर्गात त्रास द्यायचाच पण मुलांचेही त्यामुळे कामातले लक्ष उडून जायचे. सुट्टीत खेळत असतानाही इतरांबरोबर त्याची सतत भांडणं व्हायची. त्यामुळे सुटीतही शिक्षा व्हायची त्याला कोपर्‍यात उभं रहाण्याची. त्याच्या वर्गशिक्षिकेनं तर मला सांगून टाकलं होते की त्याने जर मला त्रास दिला तर मी त्याला जरूर वर्गाबाहेर काढावे आणि तिच्या वर्गात परत पाठवून द्यावे. पण मी माझी पुरी सहनशक्ती ताणून ठेवत असे आणि मला त्रास झाला तरी शक्य तेवढं दुर्लक्ष करीत असे. एक दोन वेळा वर्गातून बाहेर काढला, त्याच्या वर्गात परत पाठवला पण रोज रोज तरी त्या वर्गाला का म्हणून त्रास द्या असा विचार करून एक दिवस जेव्हा त्याची मस्ती फारच वाढली तेव्हा त्याला कोपर्‍यात उभं केलं. जरा वेळाने इतरही मुलं खूप मस्ती करायला लागली. वर्गाच्या चार कोपर्‍यात चार मुलांना उभं केलं.. पण उपयोग नाही. एकमेकांना पडद्याआडून खुणा करीत लार्बी महाशय शिक्षा भोगतायत. शेवटी मी वर्ग थांबवला आणि सगळ्यांना खाली पाठवून दिले.. त्यानंतर शाळेच्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी हाच लार्बी खेळण्यातल्या अस्वलाची उडवाउडवी करीत होता जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक वार्षिक आढावा घेत होते आणि गावचे मेयर आणि इतर प्रतिष्ठित माणसे तिथेच आमच्या मागे बसून त्याची ही मस्ती बघत होती.. ती मस्ती सहन न होऊन मी ते अस्वल हस्तगत केलं आणि कार्यक्रम संपल्यावरच त्याला परत दिलं. ह्याच सगळ्याचा राग की काय कोण जाणे पण ह्या शाळेचा निरोप घेण्यापूर्वी मी जेव्हा ग्रुपफोटो काढायला सगळ्यांना बोलावले तेव्हा हा एकटाच कितीही बोलवून शेवटपर्यंत आला नाही. खरं तर ह्या आठ वर्षाच्या मुलानं एवढे वाकड्यात शिरायची गरज नव्हती पण कदाचित इतर सगळ्या चांगल्या अनुभवांनी मीच हुरळून जाऊ नये ह्याचसाठी असा एक कडू अनुभव सुद्धा ह्या वास्तव्यात मला त्या वरच्याने दिला. 

असाच एक प्रसंग ज्यातून एका पालकातली माणुसकी मला दिसून आली. जानेवरीतल्या गारठून टाकणार्‍या थंडीत, एका संध्याकाळी साडेपाचची बस पकडायला मी पाच मिनिटं कमी असताना शाळेतून निघून बसस्टॉप वर पोहोचले.. आणि जवळजवळ पावणेसहा होऊन गेले तरी बस काही आली नाही. दर तासाला एकदाच येणार्‍या बसची वेळ होऊन गेल्यावरही तिथे कोणी उभे आहे ह्याचे अश्चर्य वाटून रस्त्यातून जाणार्‍या एका मुलीने मला विचारले की मी Valenciennes ला जायला उभी आहे का. मी अर्थातच हो म्हटले.. त्यावर ती म्हणाली “अगं आजपासून बस चा रुट बदलला आहे इथून दोन स्टॉप सोडून पुढच्या स्टॉप वर जा.. साडेपाचची बस निघून गेली आहे आता साडेसहाची बस मिळेल तुला. ” मी सकाळी आले तेव्हा बस नेहेमीच्या रुटनेच गेली होती त्यामुळे मला ही शंका काही आली नव्हती. आता तिथल्या फ़लकावर लावलेलं अशा आशयाचे पत्रक मी पाहिले आणि त्या दुसर्‍या स्टॉप पर्यंत चालत गेले. बस यायला अजून किमान चाळीस मिनिटं होती. रस्त्यावर नाही चिटपाखरूही आणि थंडी तर अगदी जीवघेणी. ख्रिस्तोफ शाळेत एका मिटिंग मध्ये होता नाहीतर त्याला सांगितल्यावर त्याने लगेच सोडले असते मला घरी. पण त्याला आज डिस्टर्ब करणं बरं वाटेना. शेवटी देवाचे नाव घेत मी तिथे उभी कारण छोटा स्टॉप असल्याने बसायचीही सोय नव्हती. एक गाडी जाता जाता अचानक माझ्या समोर थांबली. माझ्यासारख्या परदेशी मुलीला पाहून तिथे कोणीही मला रस्ता तर नक्कीच विचारणार नव्हते त्यामुळे कोणी बोलायला आलच तर नक्की काय करावे ह्याचा विचार करीत असतानाच आतून प्रश्न आला. 
Valenciennes “ला जात्येस का? बस चुकली का तुझी? ” 
गाडीत नक्की कोण आहे हे नीटसे पाहिलेही नव्हते मी.. तेवढ्यात “घाबरू नकोस मी बोस्केतल्या कीमची आई.. मी सोडते तुला घरी, बस गाडीत. ” असे शब्द कानी आले. 
मला प्रत्येक शाळेतली किमान शंभर अशी तीन शाळांतली मुलं त्यांच्या नावासकट लक्षात रहाणे कसे शक्य आहे? आणि मुलांना बघून ओळखलेही असतं मी पण त्यांच्या पालकांनाही? विचार करण्याएवढा वेळही नव्हता आणि ते बरंही दिसलं नसतं त्यामुळे मी निमूटपणे गाडीत बसले. विरुद्ध दिशेला चाललेली कीमची आई केवळ मला सोडायला वेळ काढून माझ्या घरी मला पोहोचवायला आली. मी थंडीने एवढी गारठून गेलेली असताना तिने दाखविलेल्या माणुसकीने मला पार भारावून टाकलं. तिचे अनेकदा आभार मानूनही नंतर मला काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत राहिलं. 

त्या दिवशी सकाळी बातम्या ऐकायला टी.व्ही. लावला आणि शेहेनाईचे सूर कानी पडले. बातम्यांमध्ये सुप्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाह खन निवर्तल्याची बातमी ऐकली.. खरेतर हे होणार हे माहीतच होते पण तरीही मन सुन्न झाले क्षणभर.. ती शेहेनाई ऐकताना शाळेतला तो दिवस आठवला.. भारतीय संगिताबद्दल बोलताना खास भारतीय शेहेनाई ह्या वाद्याची मी एका वर्गात ओळख करून दिली होती. शेहेनाईची सीडी माझ्या मुलांना मी ऐकवली. शेहेनाईचे अपरिचित सूर ऐकून सुरुवातीला ते विचित्र वाटून त्या सात वर्षाच्या मुलांत खसखस पिकली. पण नंतर त्या शेहेनाईचे आणि तिच्या वादकाचे फोटो बघत असताना एकीकडे त्यांचे कान ह्या नव्या आवाजाला सरावले आणि हीच मुलं नंतर गुंग होऊन गेली. जगप्रसिद्ध खानसाहेबांची कोणाला काय ती ओळख करून देणार माझ्यासारखी छोटी माणसं पण मला किमान माझ्या काही मुलांना तरी ही शेहेनाई ऐकवायला मिळाली आणि त्यांना ऐकायला मिळाली ह्याचा आज आनंद होतोय. 

असाच आनंद होतो ह्या जाणीवेतून की बोस्केतली थोडीच का होईना पण इंटरनेट क्लबच्या निमित्ताने काही मुलं भारताचा झेंडा, भारताचे राष्ट्रीय फूल, फळ, प्राणी, पक्षी, खेळ हे सगळं जाणून घेऊ शकली. आज त्यांना ताजमहाल माहित आहे. गेट वे ऑफ़ इंडिया आणि लाल किल्ला त्यांना ओळखता येतो. आणि ह्याचे अप्रूप वाटते की रुपालीला फ़्रांसमधून तिच्या घरी जायला विमानात किमान नऊ तास एका जागी बसावे लागते. पॅरीस हे नाव ऐकून माहित असणार्‍या ह्या पिलांना आपल्या देशाची ती राजधानी आहे ह्याची जाणीव होत नाही कारण त्यांची ह्या वयात तो दुसरा एक देश आहे अशी समजूत आहे पण भारताची राजधानी नवी दिल्ली आहे हे त्यांना विचारता क्षणी सांगता येतं. डिसेंबर महिन्यात साडी नेसलेल्या रुपालीने लावलेल्या टिकलीची, बालमंदिरातल्या पाच वर्षाच्या Brandon ने सहा महिन्यांनंतरही ठेवलेली आठवण पाहून माझी आई सुद्धा आश्चर्यचकित झाली जेव्हा तिची टिकली पाहून तिच्याकडे बोट दाखवत तो उद्गारला टिकली! 

Brandon ची जशी हुषारी तशी लक्षात रहाते ती Charlotte चि निरागसता. रुपाली मुंबईची आहे. तिला फ़्रेंच येत. ती Valenciennes ला रहाते हे सगळे माहित असूनही तिनं मी अच्छा करून वर्गातून बाहेर पडताना एक दिवस मला विचारलं , “ तुझे विमान कुठे ठेवलं आहेस? ” माझ्या चेहेर्‍यावर भलंमोठं प्रश्नचिंन्ह! “बागेत ठेवतेस का ते नेहेमी? ” हा पुढचा प्रश्न. “विमान नाहीये माझं. ”, मी म्हटले. “मग तू घरी कशी जाणार? ” 
रुपाली घरी जाते म्हणजे रोज नऊ तास विमानातून प्रवास करून मुंबईला जाऊन दुसर्‍या दिवशी परत शाळेत तशीच येते अशी त्या बिचारीची समजूत झाली होती हे त्या वेळेस माझ्या उघडकीसं आलं. 

जून महिन्याच्या चोवीस तारखेला, शनिवारी, बोस्केचा वार्षिकोत्सव होता. मी जरी शनिवारी शाळेत जाणार होते तरी तेवीस तारखेला सगळ्यांचा वर्गात औपचारिक निरोप घेतला कारण त्यानंतर इंग्लिशचे शाळेतले तास संपणार होते. मोठी मुलं पुढच्या वर्षी शाळेत परत येणार का विचारत होती. कागदाच्या चिठोर्‍यावर आपलं नाव, पत्ता लिहून देत होती.. काही जण माझा पत्ता लिहून मागत होती. बालमंदिरातली मात्र मी परत जाणार हे मानायलाच तयार नव्हती. अनेक वेळा सांगूनही पुढच्या शुक्रवारी भेटूच असं परत परत सांगत होती. “उद्या मी वार्षिकोत्सवासाठी येईन पण आजचा वर्ग शेवटचा. पुढच्या शुक्रवारी तुम्ही शाळेत असाल तेव्हा मी विमानात असेन आणि घरी मुंबईला परत जात असेन. ” असं सांगूनही ह्यांचे आपलं तेच. वर्गात फोटो काढून झाले, पन्नासदा अच्छा करून झालं. शेवटी वर्गशिक्षिकेच्या सांगण्यावरून प्रत्येकानी माझी पापी घेत माझा गाल चिकट करून टाकला आणि आमचं निरोप घेणं संपलं. माझा मात्र पाय निघत नव्हता. 

दुसर-या दिवशी मला पुन्हा शाळेत बघून मी खोटं सांगितले ह्याची त्यांना खात्री पटली. त्यांची समजूत बदलण्याचा मीही प्रयत्न केला नाही कारण मी परत जाणार आहे असे ठासून सांगताना मलाही काही कमी यातना होत नव्हत्या. एकंदरीत मी तिथे असल्याचा त्या लहानग्यांना खूप आनंद आहे ह्यातच मला आनंद होता. 
वार्षिकोत्सवाच्या कार्यक्रमात ख्रिस्तोफ़ने माझे आभार मानले. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्या नावाच्या आरोळ्या मारल्या.. मी स्टेजवर चढून अभिवादन केल्याशिवाय त्यांचे समाधान झालं नाही. आज निरोप घेणं आणखीच कठीण गेलं कारण आजचा दिवस नक्कीच शेवटचा हे माझेही मन मानायला नाखूष होतं. ह्याच अंगणात मी कधी मुलांसोबत बास्केटबॉल खेळले तर कधी कोणाला मारामारी केल्याबद्दल दटावले होते. कधी कोणा रडणार्‍याची समजूत काढली होती तर कधी कोणाची चेष्टा केल्याबद्दल त्याला दम भरला होता. 

माझा आणि ह्या शाळेचा सहवास वाटला तरी संपला नव्हता. शाळेचं एक पुस्तक माझ्याचकडे राहिल्याचे लक्षात आल्यामुळे मंगळवारी परत मी शाळेत गेले. परत भेटणार नाही असं सांगूनही परत शाळेत दिसल्यावर काही मुलांनी भूत पाहिल्यासारखा चेहेरा केला आणि बालमंदिरातल्या मुलांनी “रुपाली ह्या पुढे शुक्रवार ऐवजी मंगळवारी येणार आहे ” अशी गोड समजूत करून घेऊन माझे पूर्वी एवढ्याच प्रेमानं स्वागत केलं. जवळजवळ नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा मी प्रथम शाळेत गेले होते तेव्हा ह्याच चिमुकल्यांनी माझ्याकडे थोड्याशा परक्या, थोड्याशा आश्चर्यचकित आणि ब-याचशा उत्सुक नजरांनी पाहिले होते.. आज नऊ महिन्यांनी मी त्यांना इंग्लिश शिकवणारी पण जणू त्यांची मैत्रीण बनून गेले होते. मला पाहिल्यावर, बटरफ़्लाय म्हणजे पापियॉन, कॅट म्हणजे शा, हॉर्स म्हणजे शव्हाल असे मला भेटताक्षणी उजळणी करणारा Theo, मला भेटल्यावर माझ्याशेजारी आधी बसून माझं कानातलं, गळ्यातलं अगदी हातानेही चाचपून छान आहे असे सांगणारी Anaïs, माझ्याच वर्गात माझे लक्ष नाही असं बघून अगदी टिश्यु पेपरवर चित्र काढून देणारी Claire ! कोणाकोणाच्या म्हणून किती आठवणी अजूनही ताज्या आहेत. 

आज शिक्षक दिन! शाळेत असताना शिक्षकांना त्या दिवसापुरती विश्रांती देऊन अगदी शिपायापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांची जवाबदारी विद्यार्थांनी पार पाडायची अशी आमच्या शाळेची पद्धत होती. मी कधीही त्या थोड्या वेळासाठीही शिक्षकाच्या भूमिकेत शिरायला गेले नाही. आज एवढ्या वर्षांनी मी तेही धाडस केलं. “मी केलं ” असं म्हणण्यापेक्षा कदाचित माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडून करवून घेतलं असे म्हणणं जास्त योग्य ठरेल. मला अनेक बरे-वाईट अनुभव देताना मला खूप सारा विचार करायला लावला. मला शिक्षक व्हायची पहिल्यांदाच संधी दिली. त्यांच्यापैकी पुन्हा कोणी मला भेटणार तर नक्कीच नाही. पण त्यांची आठवण मला आहे आणि कायम राहिल. केवळ त्यांच्यामुळेच मी औटघटकेची का होईना पण शिक्षिका म्हणवून घेत्येय ह्याची मला जाणीव आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानून मला ऋणातून मोकळे व्हायचे नाही म्हणूनच आजच्या दिवशी मी त्यांच्याच आठवणी कायमसाठी शब्दबद्ध केल्या.

By

Rupali Sohoni Kamat

Belgaum, India

चंचल मनाला काबूत कसे आणावे?


आपल्याकडे एक म्हण आहे – वळले तर सूत नाही तर भूत! इतर कोणाला ती लागू होवो न होवो पण मनाला मात्र ती तंतोतंत लागू होते. अत्यंत चंचल अशी मनाची स्थिती असते. आत्ता एक गोष्ट करायला घेतो की पुढच्याच क्षणी यापेक्षा हे करु, नको नको ते करु अशी अवस्था होत असते आपली अनेकदा. बहिणाबाई आपल्या एका कवितेत मनाचे खूप छान वर्णन करतात. ते इतके चंचल आहे की आत्ता जमिनीवर असते तर क्षणात आकाशात जाते. पिकात शिरलेल्या ढोरासारखे कितीही हाकलले तरी पुन्हा पुन्हा विषयांकडेच वळते. त्यात इतके विकार उद्भवतात की कुठेही ते चटकन स्थिर होत नाही.

समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला काबूत आणण्यासाठीच्या प्रयत्नांना सहाय्य व्हावे म्हणून २०५ श्लोकांची योजना केली. भगवद् गीतेच्या सहाव्या अध्यायातही अर्जुनाने या चंचल अशा मनाला काबूत ठेवणे हे वाऱ्याला अडविण्यासारखे दुष्कर आहे असे म्हटल्यावर भगवंतांनी मनाची चंचलता मान्य केली; मात्र त्यावर अभ्यासाने आणि वैराग्याने अंकुश ठेवता येतो असे सांगितले आहे.

आपली उन्नती करुन घेण्यासाठी उत्तम गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. त्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास आवश्यकच असतो. इथे मनाचा अभ्यास आवश्यक आहे. आपले मन कशात रमते, कशाला घाबरते हे जाणून त्याला कशात रमवायचे व कोणत्या गोष्टीसाठी त्याला धाकात घ्यायचे याचाही अभ्यास करणे इथे अपेक्षित आहे. इंद्रियांवर निग्रह ठेवला नाही तर आरोग्य धोक्यात येईल हा धाकही उचितच असतो. भौतिक गोष्टीतली विफलता कळली की विषयासक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे तशा स्वरुपाच्या घटनांची उजळणी नैराश्य येणार नाही याची काळजी घेऊन करता येते.

सुख आणि दुःख या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली कोणतीच कायम राहणारी नाही. आपण जन्माला आलो आहोत तेव्हा मृत्यू हाही अटळ आहे याची जाणीवही माणसाला योग्य तेवढेच इंद्रियोपभोग घेण्यापर्यंत सिमित करु शकते. वैराग्य निर्माण करु शकते. नित्य टिकणारे सुख म्हणण्यापेक्षा आनंद हा परमात्म्याच्या चिंतनाने मिळतो ही अनुभूती आली की त्याची गोडी मनाला लागते. त्यामुळे मनाच्या चंचलत्वाला काबूत आणण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींचे सहकार्य होते.

अभ्यास ही विधायक गोष्ट आहे. वैराग्य ही विध्वंसक क्रिया आहे. असे विनोबाजी त्यांच्या प्रवचनात आवर्जून सांगत. त्यासाठी ते शेतात बी पेरण्याचे आणि तण उपटून टाकण्याचे उदाहरण देत. मनात सद्विचारांचे पुन्हापुन्हा चिंतन करायचे हा झाला अभ्यास. आणि मनातील नको ते विचार काढूनच नाही तर फेकूनच द्यायचे हे झाले वैराग्य.


By

Padma Dabke

Pune, India

मराठी कविता

चौकट

ती गुदमरली,
अखिव-रेखीव चौकटीत ती एकदा गुदमरली,
म्हणून चौकटी बाहेर पडली...
आणि तिच्यासाठी चौकट कायमची मिटली....

तो ही एकदा गुदमरला,
आणि चौकटी बाहेर पडला...
मोकळ्या हवेत मोकळा होऊन,
पुन्हा परतला...

त्याच्यासाठी मात्र चौकट उघडीच होती,
'सुबह का भुला, श्याम को लौट आया' म्हणत
त्याचं स्वागत केलं सर्वांनी...

आणि 'राह भटक गयी' म्हणत
तिला मात्र टोचून खाल्लं 
असंख्य गिधाडांन्नी...

---

असेही कधी व्हावे

कधी हसावे कधी रडावे,
आयुष्याचे मज कोडे उमगावे;
वारा उनाड होऊन, 
स्वच्छन्दी नभी उडावे;
असेही कधी व्हावे...

सुर मज नवे कधी गवसावे,
हृदयीच्या छेडीत तारा,
तुजसंग मग बेभान मी व्हावे;
असेही कधी व्हावे...

क्षण एकांती धुंदी चढावे,
पदरी माझ्या आभाळ बरसावे;
अन् चिंब मी होऊनि
तुझ्या प्रेमरंगात न्हावे;
असेही कधी व्हावे...

पिसारा मनमोराचा फुलून,
सप्तरंगी मी, तुझ्या अंगणी सजावे;
अश्रू नयनीचे होऊन,
तुझ्याच गाली ओघळावे;
असेही कधी व्हावे...

न्हाऊन लक्ष चांदण्यांत तुजसवें,
ओठांतून मी कधी ओथंबावे;
विरता तुझ्यात, गंधित मी व्हावे;
असेही कधी व्हावे...

चांदणरात होऊन कधी तू,
ओंजळीत चांदणं भरावे;
लक्खं मी होऊन, तुझ्यातच विरावे;
असेही कधी व्हावे...

तुझ्याच सुरांत मी, एकाकी रे सरावे;
नि तुझ्या नयनी रम्य, मी जगावे;
असेही कधी व्हावे...
असेही कधी व्हावे...

By

Dipti Ajmire

Karlsruhe, Germany

Friday, 1 November 2019

Dance - My passion, my life


Since childhood, we all have been looking upon people, personalities, celebrities and so on.  But what we feel happy was always different from what we wanted to be. Little did we know what makes us really happy and it was never our aim in life.  

Same was with me being a graduate and housewife I forgot my passion for dance with the change of responsibilities and priorities. Little did I know and feel I could make it my dream as a dancing Guru for many children who want to learn dance. 

I had been a performer throughout my school and college days.  Later had given up with the same as time changed and with time I changed too. I always felt happy to dance may it be the Ganpati festival or Navratri Garba. I couldn't resist myself as I felt it was in my blood.  
             
Post my younger one I met with a major accident and was asked to follow an exercise pattern.  So  I started coaching with Bharatanatyam right from scratch. I finished my graduation and doing my post-graduation currently in the same subject. I have my classes running successfully with two branches and 37 students. 
           
What makes me happy is the fact that what was my passion has become my profession now. I couldn't ask for more from God. My students perform at various stages and temples in India.  The smile on the faces of the audiences, my students and their parents when they see their tiny tots perform on the stage keeps me motivated. 
               
I and my partner choreograph for various social causes and different events. It is now our motto to present the classical dance form in the way the masses can connect to. It makes us different from all the other classes. 
             
Thus we connect dance with society and the same keeps us motivated as there are so many changes we want to bring in our society for our future generation to have a safe environment and country to live in. 
             
The appreciations we get from different people and professions in society and parents keep us motivated to achieve our goal to make Indian classical dances famous across the globe.

By

Sarala Bhagat,

Diva, India 


Tears, I love you...


Tears, I love you...
Tears, which travel through the soul
and touch the eyes.
Tears, which travel through the soul
and bring a smile on the lips.
Tears, which travel through the soul
and fill the heart with all the goodness.
Tears, which travel through the soul
and bring back the goodness in you,
bring back the faith in goodness,
bring back the faith in truth,
bring back the faith in true beauty,
bring back the faith in people.

So... love you, my tears.
I wish you all the smiles in the world.

By

Mrunal Kulkarni,

USA


हाम हाम

‘‘थँक यू’’ आपल्या पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशनची शेवटची स्लाईड इरावतीने दाखवली आणि ती थकून खुर्चीवर बसली. गेले कित्येक दिवस या प्रेझेन्टेशनची तयारी चालू होती. दिवस कुठे सरायचा पत्ताही लागत नव्हता. सुदैवाने तिचं काम सगळ्यांना आवडलं होतं. झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या सगळ्या भागात खाडिया, मुंडारी आणि कुडुख भाषा बोलणा-या लोकांचीलिंक लँग्वेजम्हणून ओळखली जाणारी सादरी किंवा सदनी किंवा लाटिया या भाषेवर तिनं केलेलं काम महत्त्वाचंच होतं. या विषयीचा तिचा पेपर लवकरच अमेरिकेत सादर केला जाणार होता.

चर्चा संपल्यानंतर अनौपचारिक प्रश्नोत्तरं आणि गप्पाही खूप वेळ चालू राहिल्या. थकलेली असूनही ती अतिशय प्रसन्न मनःस्थितीत होती. काम कडेला नेण्याचा आनंदच तेवढा होता. मिस पार्क, जून, जेसिका, वॉन्टॉक, पॅट्रोविच वेगवेगळ्या देशातले हे तिचे मित्र, त्यांनी असंख्य प्रश्न विचारले. शेवटी तिचं तोंड भरून कौतुक केलं.

जिना उतरताना मागून हाक आली,
‘‘हाम, इरू, हाम.’
हाम? इरावतीनं वळून पाहिलं. जेसिका मराठी शिकत होती. शब्दांच्या अनेक गफलती करायची. आत्ताहीथांबऐवजीहाम, हामम्हणत मागे येत होती.

हाम!’ रस्त्यावरून चालताना अचानक एखादी धून ऐकू यावी, कडक उन्हात घामाच्या धारा लागलेल्या असताना अनपेक्षितरीत्या मानेवर एखादी गार झुळूक फिरून जावी असं तिला त्याहामशब्दाने झालं. 
   
जेसिका जवळ आली. ‘‘तू परवा येणारेस का?’’ वगैरे असलंच काहीतरी तिला विचारायचं होतं. विचारलं न्गेली. मागेहामशब्द ठेवून गेली.

इरू कारजवळ आली. लॉक उघडलं. मागच्या सीटवर लॅपटॉप ठेवला. पुस्तकं ठेवली. कार सुरू केली.

गाडी चालवताना तिच्या मनात प्रेझेंटेशनचेच विचार चालू होते. कुणी कुणी काय काय मुद्दे काढले, आपण कशी उत्तर दिली?

या विचारशृंखलेच्या बॅकग्राऊंडला मधूनच एक शब्द वाजायचा ‘‘हाम!’’ क्षणभर ती घुटमळायची. तिची विचारशृंखला विस्कळीत व्हायची. पुन्हा ती स्वतःला प्रेझेंटेशनच्या विचारांकडे घेऊन जायची की विचार सुरू. मध्येच शब्द यायचा,‘‘हाम!’’ की पुन्हा कट्.

असं होत होत ती घरी पोचली. कार पार्किंगमध्ये लावून घरात गेली.फॅन सुरू केला. हातपाय धुऊन फ्रीजमधली पाण्याची बाटली काढली. सोफ्यावर बसून अर्धी बाटली पाणी प्यायली. पोटात गार वाटलं. डोक्यावर पंखा. आलेला शीण. सोफ्यावरच तिला डुलकी लागली.

गाढ झोपेत एकदम शब्द ऐकू आला, ‘‘हाम, हाम!’’ नंतर त्यात अजून एक हाक अॅड झाली. ‘मा, मा, हाम, हाम!’’ 
   
इरू खडबडून जागी झाली. पुष्कळ घाम आला होता. उठून तोंड धुतलं. फोन वाजायला लागला. किरणचा फोन. ‘‘हॅलो, कसं झालं प्रेझेंटेशन?’
   
‘‘चांगलं झालं
‘‘आता विश्रांती घे जरा. खूप दिवस चाललंय काम हे.’
‘‘छे ! पेपर पाठवायचाय आठ दिवसात.’
‘‘आता काय तुझं रेडीच आहे की सगळं.’
‘‘हो, तरी पण पाच-सहा दिवस लागतीलच.’
‘‘विश्रांती घे अन्मग कर.’
‘‘खरं रे, मला फार गरज आहे विश्रांतीची.’
‘‘म्हणूनच सांगतोय, एखाद्दुसरा दिवस विश्रांती घे. जरा विश्रांती झाली की काम आणखीन चांगलं होतं.’
 ‘‘ठीक आहे. आज तू कधी येतोयस घरी?’
‘‘आमची नेहमीचीच कटकट आहे. तेनोल्टं बिल्टंसगळे घेऊन आज जेवायला जायचंय. रात्री उशीर.’
‘‘जर्मन लोक का?’
‘‘हो इतकं बोअर होतं ना, रोज बाहेरचं खाऊन
 ‘‘ठेवता कशाला मीटिंगा रात्रीच्या?’
‘‘जाऊ दे. जे आहे त्यात काही बदल होणं शक्य नाही. अॅक्सेप्ट इट.’
 कानात शब्द वाजला. ‘‘हाम, हाम!’
चल मग. ये शक्यतो लवकर.’’ बोलण्याचा समारोप कसा करायचा. रात्री बोलू म्हणावं तर हा रात्री उशीरा येणार. आपण झोपेत. तो कंटाळलेला. उद्या बोलू म्हणावं तर नव-याला उद्या भेटू कसं म्हणायचं.

या शहरात आल्यापास्नं हे असंच चाललंय. गेली वीस वर्ष नुसती झुंज. अस्तित्व टिकवण्यासाठीची. आपण एकमेकांबरोबर नुसते आहोत. पण खरंच आहोत का? तो धावतोय, आपण धावतोय, आपली पोरगी धावतेय, तिचे कथक नृत्याचे प्रोग्रॅम, प्रॅक्टिस, धावपळ. कनिष्ठ मध्यमवर्गाकडून वरिष्ठ मध्यमवर्गाकडे झालेल्या प्रवासाचं हे फलित.
   
कित्येकदा ते तिघं ठरवून बाहेर हॉटेलमध्ये भेटायचे. एकत्र जेवण करायचे. मग बरोबर घरी.

एकत्र जेवायला जरी आले तरीसतलजची चिवचिव चालू रहायची. माझा हा प्रोग्रॅम, तो प्रोग्रॅम. इरूजवळ सांगण्यासारखं पुष्कळ असायचं. पण किरणच्या जगात त्या गोष्टी अगदी किरकोळ होत्या. कधी कधी ती उत्साहात येऊन सांगायला लागायची, ‘‘तुम्हाला माहिताय, या दोन्ही भाषा एका ग्रुप मधल्या आहेत. एका फॅमिलीतल्या. पण त्या एकमेकांना कळण्यासारख्या नाहीत. म्हणून लिंक लँग्वेज आहे ती दुस-या फॅमिलीतली.’

अशा वेळेस किरण आणि सतलज एकमेकांकडे सूचक पहायचे, कधी कधी हसायचे, मग सतलज म्हणायची, ‘‘आई, तू काहीतरी लहान मुलीसारखं सांगत असतेस..’

मग एकमेकांशी इथं भेटून काय बोलायचं? शेजारचेपाजारचे, नातेवाईक,... कुणाविषयी बोलायचं ! चांगले पिक्चर्स, गाणी, चांगली पुस्तकं, संबंधांमध्ये इतकी जवळीक असते की असले त्रयस्थ विषय बोलताच येत नाहीत. आपण एकही झालेलो असतो तरीही काही मोठ्या फटी राहिलेल्या असतात, ज्या भरता भरत नाहीत. प्रत्येकाला आपलं आपलं काम असलं, की या फटींचा फारसा प्रश्न येत नाही. फक्त एकमेकांच्या सहवासात आलं, की काय बोलायचं हा प्रश्न असतो. मग एकटेपणा बरा वाटतो. 

या शहराचं पोतच आता असं झालंय. जगणं अगदी वैयक्तिक झालंय आणि एकाकीसुद्धा. नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकवणारी कॉलेजेस्‌, युनिव्हर्सिटीज ओपन होतायत. परप्रांतातल्या विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी येताहेत. होस्टेल्स भरून गेलीयत, सोसायट्या भरून गेल्यायत. हॉटेल्समध्ये, पँटमधून ढुंगणाची फट दाखवणा-या लठ्ठ लठ्ठ मुली, कोप-यापर्यंत बांगड्या घातलेल्या, हात पाय, तळपाय, कोप-यापर्यंत मेंदीने सजलेल्या, दागिन्यांनी लडबडलेल्या आणि सिगरेट ओढणा-या मुली, विमान चालवल्यासारखी बाईक चालवणारी मुलं, दुकानांसमोर साठणारे सिगरेटच्या धुराचे ढग, गांजा, चरस, मावा या सगळ्यांची रात्री उशिरा उघडणा-या दुकानांमधून देवघेव, मध्यरात्री तीन वा. ‘तुने क्या जुल्म किया हैवगैरे वगैरे आळवणारी गाणी, टेरेसमध्ये उभं राहून सगळ्या जगासाठी फोनवर बोलणं, मध्यरात्री केव्हाही टरर्र्र् गाड्या उडवत, लोकांच्या झोपा मोडत सगळं जग आपल्याच बापाचं असल्यासारखं उद्दामपणे वागणं, मध्यरात्री चालणा-या डान्स, गाणी, बियरच्या पार्ट्या, कुणीही कुणाशीही कशाशीही बांधील नसल्यासारख्या, पाण्यावरच्या तेलाच्या तवंगासारखा प्रत्येक जण, बाहेरून इथे.

आपल्या फ्लॅटच्या सुंदर टेरेसमध्ये मस्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत, गार वा-याच्या झुळुकांमध्ये शांत झोपावं म्हणून तिने कौतुकाने टेरेसमध्ये झोपायचा प्लॅन केला. रात्री बारा वा. तिला असं फीलिंग आलं की आपण भर बाजारात गादी टाकून झोपलोत. इतकी विविध भाषांमधून, मोठ्याने चालणारी बडबड, मोठ्याने हसणं.
   
तिची चिडचिड झाल्यावर किरण म्हणाला, ‘‘तू पण चक्रमच आहेस. टेरेसमध्ये काय झोपायचं मध्यमवर्गीय माणसासारखं. किती दिवस म्हणतोय तुला एसी बसवून घेऊ तर तुझं काहीतरी तिसरंच. नॅचरल वारं पाहिजे, म्हणे.’
   
मोठ्या धबधब्यात एखादी गोष्ट सोडली की तिच्यावर कुणालाही कंट्रोल नसतो वाटेल तशी वाहत जाते ती. तसंच आहे इथलं आयुष्य. एकदा ते धबधब्यातून ढकलून दिलं की थांब म्हटलं तरी कुठलं थांबतंय. थांब? हाम?
   
तिला पुन्हाहामशब्द आठवला. भूतकाळात रमत बसण्याची अजिबात आवड नसल्यामुळे तिने तो शब्द परत कधीच आठवला नव्हता. गाव सोडल्यानंतर पण आता सकाळपासून तो शब्द जणू तिचा पाठलागच करत होता.

तिचं गाव खेडेगाव तर नव्हतंच पण तालुका प्लेस सुद्धा नाही, चांगलं जिल्ह्याचं गाव. पण महानगरीय रूप त्याला कधीच मिळालं नाही खेडेगावाचंच पोत होतं त्या गावाला. ‘अपार्टमेंटनावाच्या काडेपेट्या अजून फारशा निर्माण झालेल्या नसताना एका काडेपेटीत ती राहात होती. दोन खोल्यांचा फ्लॅट, हॉल आणि छोटंसं किचन. यापूर्वी कधीच फ्लॅटमध्ये राहिलेली नसल्याने तिला त्याचंही तेव्हा काय कौतुक. बेसिन पाहिल्यावर ती प्रचंड खूष झाली. वाड्यात कॉमन संडासच्या जागेत वर्षानुवर्षे राहिल्याने आपल्या घरात आपल्यासाठी संडास बाथरूमसुद्धा आहे याचंच कौतुक. शिवाय किचन ओट्याचं कौतुक, वाड्यात आपण दोन मोठमोठे हॉल, स्वयंपाकघर, गच्ची, गॅलरी, व्हरांडा, अंगण इतके प्रकार असणा-या घरात राहात होतो आणि इथे दहा बाय दहाच्या रूम्स आहेत हेही तिला जाणवलं नाही. खुशीत राहिली ती तिथे. एका मजल्यावर चार फ्लॅटस्‌. सगळ्यांची दारं  उघडी असायची कुणी कुणाच्याही घरात केव्हाही पसरलेलं असायचं. एकत्र जेवण, कुठलीही वस्तू आणायची तर मिळून वाजत गाजत. पाणी फक्त खालून आणावं लागायचं.

एकदा तिच्याकडे एक गृहस्थ आले होते. पण नव-याला रात्रीची मीटिंग होती. किरण त्या गृहस्थांना म्हणाला, ‘‘बरं येतो जाऊन मी.’’ इरूलायेतोम्हणाला. शेजारच्यांच्या दरवाजातनं ते काका उभे दिसले तर त्यांना म्हणाला, ‘‘येतो जाऊन मी.’

इरूकडे बसलेले गृहस्थ म्हणाले, ‘‘हा काय प्रकार आहे? हा काय युद्धावर चालला का काय?’
असलं त्या गावातलं वातावरण.

शेजारी जॉन कांबळेचा फ्लॅट होता. त्याच्या घरी तो, त्याची आई, बायको, तीन मुलं होती. त्याची आई नर्स होती. सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिच्याच जिवावर त्याचं कुटुंब जगत होतं. जॉन मॅट्रिकसुद्धा पास नव्हता. इलेक्ट्रिशियनची कामं करायचा. दारू प्यायचा पण सज्जन गृहस्थ होता. आजीबाईंची सगळ्या घरावर हुकूमत असायची. पोरांना शिस्त लावणे, मारमारून अभ्यासाला बसवणे, संध्याकाळची प्रार्थना म्हणायला लावणे या सगळ्यांची जबाबदारी आजीबाईंची होती. सून म्हणजे साक्षात गरीब गाय. अहोरात्र राबत असायची.

अशात दुष्काळात तेरावा महिना तसाच जॉर्जचा जन्म झाला. ‘अनवॉन्टेडहे त्याच्या जन्मावर आधीच शिक्कामोर्तब होतं. तीन दिवसानंतर आशाबाई जेव्हा छोट्या जॉर्जला घरी घेऊन आल्या तेव्हा इरू धावत त्याला पाहायला गेली. काळ्याभोर, लुकलुकत्या डोळ्यांच्या जॉर्जला तिनं प्रेमानं जवळ घेतलं. पहिले काही दिवस गेल्यानंतर जॉर्जला घेऊन त्याच्याशी खेळायला लागली. पुढे पुढे तिच्याकडे जॉर्जला ठेवून आशा कामाला जायला लागली. जॉर्ज आरामात राहायचा. आशाच्या बाकीच्या मुलांना दूध पाहायला मिळत नसताना जॉर्जला इरू रोज ग्लासभर दूध पाजायचीत्याला रोज सतलजबरोबर जेवायला द्यायची. जॉर्जच्या भावंडांना जॉर्जचा हेवा वाटायचा पण ती मोठी होती. आजीबाई त्यांना जाऊ द्यायच्या नाहीत.

रोज दुपारी किरण घरी जेवायला यायचा तेव्हा सतलज शाळेत गेलेली असायची. तेव्हा जॉर्जला आणलंच पाहिजे. शेजारी त्याला बसवून मधून मधून त्याला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल करत किरणचं जेवण व्हायचं. सतलजला शाळेत सोडायला जॉर्जने इरूबरोबर जायचं. कुठेही, भाजीला वगैरे जायचं तरी ती जॉर्जला कडेवर घेऊन जायची.

अशात एक दिवस किरणची बदली झाली. अर्थात किरणच्या इच्छेनेच महानगरात. महिनाभरात जायचं निश्चित झालं. सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना पडला जॉर्जचा. आता जॉर्जला सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

जॉर्जला सोडून जायचं? त्याच्याशिवाय जगायचं? सवय करायला हवी. दुस-या दिवशीपासून सवय करण्याचा प्रोग्रॅम सुरू. दुपारचं त्याला घरी आणणं बंद झालं. इरूच्या घरी चांगलं खायची, ग्लासभर दूध प्यायची सवय झालेल्या जॉर्जला हे जड गेलं. घरी जे असेल ते खायचं. शिळ्या पावाचे तुकडे अर्धा कप चहात बुडवून खायचे. इरू त्याला बाहेर नेईनाशी झाली. तो आला तर ती त्याच्याशी खेळायची, गप्पा मारायची पण स्वतःहून बोलावणं बंद झालं.

एकदा तर ती बाहेर जाताना त्याने पाहिलं, ‘माम्हणत असे तिला. ‘मा, हाम, हाम. मी येतो. मा, हाम, हाम’’ म्हणत मागे लागला. तोपर्यंत त्याच्या आजीने त्याला आत ओढलं. दार बंद झालं. आतून दूरपर्यंत त्याच्या रडण्याचा आवाज येत राहिला.

सोपं नव्हतं हे. एका जिवाचे मायेचे बंध तोडून येणं. महानगरात इरू राहायला आली तेव्हा गार भिंतीना पाठ टेकवून उभी राहायची आणि एकटीच रडायची जॉर्जच्या आठवणीनं.

आज पुन्हाहाम हामशब्दाबरोबर तिला जॉर्ज आठवला. आणि विश्वासाच्या, प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यांची वीण असलेलं ते गाव. जणू इथल्या संवेदनशून्य प्रवाहात वाहत जाताना कुणीतरी कड्याच्या टोकावरून विरून जाणा-या हाका मारत असावं,
   
‘‘हाम हाम ! हाम हाम !’

By

Sujata Mahajan

USA