Wednesday 29 April 2020

डोळे

डोळे हा मनाचा आरसा आहे.
मनातले सर्व डोळ्यांतच दिसते.
काय काय दिसते डोळ्यांतॽ वाचू या.
डोळ्यांत भाव आहे, डोळ्यांत हाव आहे।
डोळ्यांत घाव आहे, डोळ्यांत धाव आहे।
डोळ्यांत साज आहे, डोळ्यांत बाज आहे।
डोळ्यांत लाज आहे, डोळ्यांत माज आहे।
डोळ्यांत आग आहे, डोळ्यांत राग आहे।
डोळ्यांत जाग आहे, डोळ्यांत बाग आहे।
डोळ्यांत क्रौर्य आहे, डोळ्यांत शौर्य आहे।
डोळ्यांत धैर्य आहे, डोळ्यांत वैर आहे।
वेदना डोळ्यांत आहे, करुणा डोळ्यांत आहे।
वासना डोळ्यांत आहे, तृष्णा डोळ्यांत आहे।
ममता डोळ्यांत आहे, नम्रता डोळ्यांत आहे।
गूढता डोळ्यांत आहे, भक्त्ती डोळ्यांत आहे।
लबाडी डोळ्यांत आहे, खोडी डोळ्यांत आहे।
प्रौढी डोळ्यांत आहे, गोडी डोळ्यांत आहे।
भावभावना साऱ्या या कळण्याची दृष्टी हवी।
दिसणारे जे जे सारे समजण्याची सृष्टी नवी।
डोळ्यांत रुप आहे, दिठीत स्वरुप आहे।
डोळ्यांत सौंदर्य आहे, दिठीत पावित्र्य आहे।
डोळे दिले देवाने, संतांनी दिली दृष्टी।
उतराई व्हावे कसेॽ ऋणातच रहावे असे।
ऋणातच रहावे असे.

सौ. शितल शशीकांत जोशी.

डोंबिवली.

No comments:

Post a Comment