भीतीने
का होईना मी थांबवतेय स्वतःला !थोडे डोकावायला जमतय स्वतःमधे ..थोडे
घराकडे ..थोड स्वतःच्या आत आणि थोडे आजूबाजूला ..काहीच अजेंडा नसतानाही
चालू शकत आयुष्य ..काही प्लॅन न करताही जगता येते ..वेळेच्या विळख्यातून
स्व्तःच स्वताला सोडवता येते हे आता मान्य करावच लागणार.
खर तर भिती मला नाहीच वाटत आजकाल खुप सुरक्षित वाटते कारण, आजकाल मला जमायला लागलय माणूस म्हणुन माझा कंट्रोल सोडून सर्प्राईझेस ना सामोरे जाणे !
ज्याला being a part of flow म्हणतात ना तसे जगणे ,मला जमू लागलय त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे.. कारण मला उमगलय की हा अनिवार्य अंक आहे माझ्या आयुष्यातल्या मीच रचलेल्या नाटकाचा. यातील पात्रही मीच निवडलेली आणि त्यातुन घ्यायचा संदेशही मीच आत्मसात करण्यासाठी निवडलेला !
सगळे ठरलेले ..मग मी हे बदलू पाहणारी कोण ?
हे सगळे बिल्कुल निगेटिव्ह नाही मी स्वतःला कटपुतळ्या बाहुलीची उपमा नाही दिली तर या परिस्थितीमुळे मला कळाला सरेंडरिंग चा खरा अर्थ त्या अनादी अनंत शक्ती समोर नतमस्तक होणे म्हणजे काय याची उत्तम अनुभूती या कोरोना प्रकरणामुळे मला आली .
निसर्ग सांगतोय बाबा रे ..स्लो डाउन.. धाऊ नकोस नुसताच ..थोडे प्रेम कर स्वतःवर.. तुझ्या लोकांवर ..बस थोडा.. गप्पा मार ..आनंद शोध कारण "Less is More"
निसर्ग सांगतोय गरजा कमी कर ,आनंदाची साधने बदल आणि मुख्य म्हणजे भिती सोड.. उद्याची चिंता सोड ..माहीत होते का ही भीती डोक्यावर टांगती तलवार तळपत ठेवणार आहे ..पण तरी सगळ्यांची सगळी व्यवस्था चोख असणार आहे.. मध्यवर्गीयांसठी अत्यावश्यक सेवा चालु आहेत गरीबांना मदत होत आहे. जे तयार नाहीत त्यांचे मरणाही लिहिलेले असेल पण सगळे पार पडणार जसे पडायला हवे ना अगदी तसेच ..यात ज्याना आयुष्य सांगतय ना वेग कमी करायची गरज आहे ते घरी आहेत ..ज्यांचा रोल इथेही To Serve aahe ते याही परिस्थितीत काम करत आहेत यातुन जो तो शिकतोय जे आत्ता ज्याला त्याला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे तेच... आपण फक्त ते आत झिरपु देणे फार महत्त्वाचे आहे.
मी
शिकतेय माझी नाव वल्ह थोडे सोडून त्याच्यावर सोपवायला आणि मस्त वाटतय हे
give up नाही. समर्पण आहे आणि हाच चिंतेच्या पल्याड जायचा मार्ग आहे
..ह्याही परिस्थितीत उत्तम काय तर माणुस खुप दिवसानी आपल्या सारख्या
माणसाचा विचार करतोय ..त्याला ऐकतोय ..एकत्र बसतोय फक्त स्वतःसाठी नव्हे तर
सगळ्या भारतासाठी साऱ्या जगासाठी प्रार्थना करतोय कारण आपला सोर्स एकच आहे
केंद्रबिंदू एकच आहे म्हणून कोरोना ही सुरुवात ठरूदेत नवीन अंकुर रुजायची
..नवा माणूस यातुन घडू देत ..रोबोटिक माणसाचा अंत आणि मनाने ..हृदयाने
जगणारा मनु तयार होवु देत..
वस्तू नाही ..एकमेकांना मनांत साठवणारा माणूस यातुन जन्माला यावा.
चिमणी
कावळा करतात का अनावश्यक साठा ?घरट्यावर मालकी हक्कही नाही सांगत कारण
त्यांचा विश्वास अभेद्य आहे नियंत्यावरचा त्याना ठावूक आहे मला आवश्यक ते
अन्न आणि उबदार घरटे मिळणार आहे. झाडे कधीतरी फळे साठवून ठेवतात का या
असुरक्षीततेने की न जाणो पुढच्यावेळी बहरच नाही आला तर उलट सगळेच देवुन
टाकतात निरपेक्षपणे ..आणि दरवर्षी बहरतात आणि नाही आला एखाद्या वर्षी बहर
तरी तेही स्विकारतात तीतक्याच मोकळ्या मनानी.
कदाचीत
हेच सरेंडरींग माणसाकडुन अपेक्षित आहे ..तु रहा तु उभारलेल्या घरात
हक्कही दाखव पण किमान कृतज्ञ रहा त्या पृथ्वी आईचा.. जीने कोणतीही अपेक्षा न
ठेवता तुला इथे इतके सुरक्षित ठेवलय आणि फार काही नाही रोज निदान एकदा
तरी तिच्यावरील प्रेम व्यक्त कर माणसासारखे वागुन ..तीला स्वच्छ ठेवुन
..तिच्या निर्मिती चा आदर ठेवून.
थोडा थोडा कंट्रोल सोडुयात ..अभेद्य विश्वासाला जागवुयात
मनामनात..भिती नव्हे भान आणुयात. समर्पण सोपे असते एखादे बाळ चेक करते का
आपली आई पाडणार तर नाही ना आपल्याला असे.नाही ना मग आपणही बाळ आहोत की
आपल्या नियंत्याचे ..आत्ताच्या परीस्थितीत त्याच्याशी असलेली नाळ तुटू
देवुया नको.. माणूस होवुयात आत धडधडणाऱ्या त्या इवल्याश्या हृदयामुळे आपण
वेगळे आहोत रोबोपेक्षा हेच लक्षात घेवुयात तेव्हाच आपला आतला आवाज ऐकू
येइल् आपल्याला जो खुप आश्वस्त आहे सगळ्याच्या पल्याड नेणारा... या
तिथे...वाट पहाते.
By
Prachi Nikhil Apte
By mistake it got typed as Sapre. My surname is Apte. Thnx a lot for adding this to your page. I am a practicing psychologist. Stays in Mumbai. Please let me know if i can write here for your page. In deep gratitude.
ReplyDeletePrajkta Joshi & Antarang Team.