दर उन्हाळ्याच्या सुट्टीत,
मी तिच्याकडे जायचे,
काय काय करायचं,
ते आधीच ठरलेलं असायचं
कधी चौपाटी, कधी राणी ची बाग,
कधी मत्सालय, तर कधी म्हातारीचा बूट,
कधी सिनेमा, कधी डोसा पार्टी,
तर कधी असायची घरी खाऊ ची लयलूट
चाळीत असायची भलतीच गम्मत
भरपूर सवंगडी आणि खूप सण
गणपती, होळी, दिवाळी
असायची फारच रैलचैल आणि यायची खूप मौज
ती मला खूप गोष्टी सांगायची,
युरोप मधल्या तिच्या अनुभवांनी न्याऊ घालायची,
तिच्या जुन्या साड्यांची मस्त पांघरुणं घेऊन,
मला शांत झोप लागायची
आजी आता तू नाहीस,
आता तर मला आजोळ ही उरलं नाही,
प्रेमाने हाक मारणारे आणि कुशीत घेणारे,
असं कोणीच उरलं नाही
माझं लहानपण समृद्ध केलंस,
त्याबद्दल तुझे आभार कसे मानू?
देव प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी आजी
नक्कीच देवो
नक्कीच देवो
By
Mrunalini Dabke
मी तिच्याकडे जायचे,
काय काय करायचं,
ते आधीच ठरलेलं असायचं
कधी चौपाटी, कधी राणी ची बाग,
कधी मत्सालय, तर कधी म्हातारीचा बूट,
कधी सिनेमा, कधी डोसा पार्टी,
तर कधी असायची घरी खाऊ ची लयलूट
चाळीत असायची भलतीच गम्मत
भरपूर सवंगडी आणि खूप सण
गणपती, होळी, दिवाळी
असायची फारच रैलचैल आणि यायची खूप मौज
ती मला खूप गोष्टी सांगायची,
युरोप मधल्या तिच्या अनुभवांनी न्याऊ घालायची,
तिच्या जुन्या साड्यांची मस्त पांघरुणं घेऊन,
मला शांत झोप लागायची
आजी आता तू नाहीस,
आता तर मला आजोळ ही उरलं नाही,
प्रेमाने हाक मारणारे आणि कुशीत घेणारे,
असं कोणीच उरलं नाही
माझं लहानपण समृद्ध केलंस,
त्याबद्दल तुझे आभार कसे मानू?
देव प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी आजी
नक्कीच देवो
नक्कीच देवो
By
Mrunalini Dabke
आजीच्या स्मृती जागवल्यास.
ReplyDeleteठिकाण कुठलेही असो, आजोळ हे आजोळच असते. प्रत्येकाच्या मनात त्यासाठी जागा असतेच.
ReplyDeleteछान लिहिलं आहे
Brought tears to my eyes. So we'll written. Happy memories ❤️
ReplyDelete