प्रत्येक क्षण पारिजात!
पारिजात हळुवार टिपावा तसा, पारिजात हळुवार जपावा असा!
पारिजात जसा नकळत बोटांवर आपला ठसा उमटवतो तसा प्रत्येक क्षण,
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मनाला हळुवारपणे स्पर्शून जाणारा,
मनावर नकळतच तुझी मोहोर उमटवणारा!
तुझ्यासाठी एक तास म्हणजे एक दिवस,
पण तुझ्या सहवासातला माझा प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन फुलणारा,
मला उलगडणारा दिवस!
प्रत्येक क्षण नाजूक, मोहरून, भुरळ टाकणारा,
क्षणात ताजा, क्षणात कोमेजणारा...
पारिजातसारखा, हळुवार टिपावा तसा, हळुवार जपावा असा!
By
K. Vrishali
No comments:
Post a Comment