Thursday, 30 April 2020

काहूर


*काहूर*

दाटून आलेले ढग 
अन् 
मनात दाटलेला काहूर,
दूर दूर च्या क्षितिजावर 
आठवणींची चाहूल.
आता कोसळेल 
मग कोसळेल,
आधी मन 
कि आधी मेघ!
कातर सांजवेळ 
कोसळण्याच्या आशेवर,
चालू आहे नुसताच 
पाठशिवणीचा खेळ.
शेवटी तो कोसळला 
क्षितिजावर बरसला,
आठवणींचा बुरुज 
क्षणार्धात ढासळला!

         *सौ. सुगंधा पंकज रागळवार*
                    जर्मनी


4 comments: