बाबा..थांब ना रे तू..जाऊ नको दूर..असा मला तुला थांबवता आलं असत तर कधीच जाऊ दिलं नसतं. १४ मे २००६ हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखद दिवस.माझ्या वडिलांची प्राणज्योत ह्याच दिवशी मालवली.अजून हि तो दिवस मी विसरू शकत नाही आणि या आदी माझं दुःख मला जास्त व्यक्त हि करता आला नाही कारण मलाच सगळ्यांना धीर द्यायचा होता,पण या धीराच्या मुलीला हि कधी कधी धीर लागतोच कि,म्हणूनच हा छोटा सा प्रयत्न तुझी आठवण म्हणून आणि माझं मन हि मोकळं व्हावं म्हणून.
२००० लोकांपेक्षा हि कमी लोकसंख्येचा गाव आमचा,त्यात माझे वडील सगळ्यांच्या ओळखीचे आणि जवळचे.गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत,नात्यांमदे,चुलत-सक्खे ,शिक्षित-अशिक्षित असा त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.कुणाचे काम केले नाही असे नाही.७ वी शिकलेला माणूस पण त्याचा दरारा फार,तसा त्याचा अभिमान ही सर्वानां.शासकीय वाहनचालक पण मोठे मोठे अधिकारी पण ह्यांना मान देणारे.आज इंजिनेर असूनही मला ल्लख इंग्लिश बोलता येणार नाही, पण १५ वर्ष्यापुर्वी हे इंग्लिश पेपर आणि इंग्लिश सिनेमा बगायचे.महिना ६००० पेक्षा हि कमी पगार,तरीसुद्धा ८ माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी अगदी नीटपणे पार पाडायचे.कधी हि कश्याची उणीव नाही.कपड्यांपासून ते पेन्सिल पर्यंत सगळं अगदी भारी.जबाबदारी ची नोकरी असूनही,शेती ची आवड ठेवणारे,एकाद्या शेतकऱ्याला हि लाजवतील अस्सं पीक घेणारे..शिकारीचे आवड असणारे आणि जीवापलीकडचा मित्र वर्ग जपणारे...किती सांगू एक ना अनेक...खूप काही आहे..म्हणूंनच तुमच्या अखेरच्या भेटीला एकाद्या लग्न
समारंभाला जमणार न्हाईत इतके लोक जमा झाले असतील ते हि न आमंत्रण देता.. माझ्या आयुष्याला तुम्ही जी कलाटणी दिली त्याबद्दल माझ्या आठवणी..त्या थोड्या शब्दात मांडायचा प्रयत्न ..तुमची आठवून म्हणून..लहान वयात संसाराची जबाबदारी आल्याने,वडील नसतानाही हि,चुलत्यांच्या बरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी उचलली.आपण शिकला नाहीत,म्हणून मुलांना शिक्षणाचे मह्त्व सांगितलं.माझी अभ्यासातील आवड लक्षात घेऊन
कायम त्या दृष्टीने पाऊले उचलीत.माझ्या ७ वी नंतर च्या शिक्षणसाठी तुम्ही कारखान्याच्या शाळेत माझा प्रवेश केलात,तेही माझी इच्छा नसताना.गावातून एकटी मी तिकडे जायचे,मला रडू यायचे,पण तुम्ही म्हणायचे: काही वेगळा करायचं असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागतो,६० मुलां मध्ये मी एकटीच मुलगी,कारण तांत्रिक शिक्षण.घरातले सगळे म्हणायचे अर्रे!! कशाला हवं मुलीला तांत्रिक शिक्षण,बिचारी ला एकट नको वाटते!.पण एक ना दोन..ह्यांचा निर्णय म्हणजे निर्णय..तुझे प्रयत्न कशे वाया जाऊ देशील..चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तू प्रयत्न करत होतास..मला एकटं वाटू नये म्हणून, तू मग प्रवीण चे ५ वी ला तिकडेच ऍडमिशन केलं..तेवढाच मला धीर..९ वी पासून रोज मला सकाळ घेऊन जाणार सोबत, कारण तांत्रिक शिक्षण असल्यामुळे आमचे वर्ग लवकर चालू व्हायचे आणि प्रवीण मला डब्बा घेऊन यायचा मागून शाळेच्या वेळेत..१० वी झाली,निकाल आला आणि तुझा आनंद
उफाळून आला..मुलगी केंद्रात पहिली अली,,तुज्या प्रयत्नांना यश आलं होतं..तुज्या अधिकारी लोकांच्या मुलांना माझ्या इतके मार्क्स मिळाले नव्हते,तुझं कौतुक होत होतं...तुज्या कष्टाचे चीज होणार होते हे तुला दिसत होते..तुझ्या मुलीकडे तू तुझा मुलगा म्ह्णून पाहत होतास..
२ री पायरी म्हणजे माझं कॉलेज,त्यासाठी तू पुण्याला गेलास,फार फिरलास,चांगल्या कॉलेज (Fergussion )ला प्रवेश मिळाला हि..पण तू परत विचार केलास..गाव ची पोर,हिरमुसलं तर काय करणार..शेवटी विवेकानंद कॉलेज ला प्रवेश घेतला..कोल्हापूर मधले बेस्ट..ह्यात हि कधी माघार नाही..कायम बेस्ट तेच हवं...११ वी ला नेहमी मला सकाळी सोबत घेऊन येणार..रोज १ तास सकाळी प्रवास तुझ्या स्कूटर वरून...गाव ते कोल्हापूर नवीन वाटचाल...कधी कधी संद्याकाळी सोबत परत घरी येत असताना रंकाळा तलावा बाजू वडा पाव आणि वजनावरचे ice cream ..खिश्यात पैसे नसले तरी तू खाऊ देणार हे समजत होतं मला..पण मला कॉलेज मध्ये वावरताना कोणताहि कॉम्प्लेक्स नको म्हणून तू नेहमीच प्रयत्नशील..चांगल्या वह्या,पेन्स,कपडे,बॅग..काय तर काय त्या वेळी ३० rs ची छत्री म्हणजे खूप महाग..पण तू २०० rs घेतली..कारण माझे वर्गमित्र श्रीमंत..मला जमवून घेता यावं हाच हेतू..जर्मन भाषा हि निवडली दुसरी भाषा म्ह्णून..अहो किती ती दूरदृष्टी...मला आपलं काहीच माहित नाही..का ही उठाठेव..!त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्यांचा परिणाम....पण किती चौकस बुद्दी...१२ वी ला हॉस्टेल ला ठेवायला पैश्यांची टंचाई..रोज चा प्रवासाचा वेळ वाचावा..त्यावर उपाय म्हणून मित्रा च्या फॅमिली मध्ये राहण्याची सोय..खाजगी क्लास घेण्याची ऐपत नाही म्ह्णून,पाहुण्यांचे क्लास शोधले..पण कमी कुठेच पडले नाही..सगळ्या समस्यांवर उत्तर म्हणा किंवा पर्याय असायचाच त्यांच्याकडे..१२ वी झाल्यावर,Bsc करायचा हेच मला माहित होतं कारण आपली आर्थिक परिस्तिथी इंजिनेर किंवा डॉक्टर होणे नाही हे मी जाणून होते किंवा माझा अट्टाहास हि तसा नव्हता...पण हे थांबतील तर....१२ वी च्या शेवटचा पेपर झाल्यावर मला सांगतात..मी तुझा चाटे कोचिंग ला क्रॅश कोर्से साठी प्रवेश घेतला आहे..CET तयारीसाठी...आता मात्र मला घाम सुटला!!..काहीच तयारी नाही आणि मी कसं करणार..इत्तक्की मोठी रक्कम क्लास साठी भरली आहे आणि मला चांगले मार्क्स नाही मिळले तर सगळी वाया..२ दिवस रडून गेले..नको नको झालं तरी..प्रवेश झालाच!!!..क्लास सकाळी ७ ते रात्री ७.सकाळी माझा डब्बा गावावरून घेऊन यायचे आणि फुले वाल्याकडे देऊन जायचे..ऑफिस सुटलं कि मला घ्यायला यायचे ..मित्रा च्या घरी सोडून जायचे..४५ दिवस हेच चालू होतं...परीक्षा झाली..निकाल लागेपर्यंत तू पर्याय शोधतच होतास काय करता येईल याचा..क्रॅश कोर्से साठी तू कुठून पैसे जमा केले होतेस काही सांगितलं नाहीस..आता तुला मला इंजिनेर बनवायची आस लागली होती..त्याची जमवा जमव कशी कशी करता येईल हे तू पाहत होतास..आम्हाला कोणालाही त्याची भनक नव्हती...
३ री पायरी इंजिनेर,,CET निकाल आला आणि प्रवेश प्रक्रिया चालू झाली..नेट कॅफे मध्ये जाऊन फॉर्म भरणं,चांगली कॉलेज शोधणं चालूच होतं..मार्क्स ठीक ठाक होते..तरीही इतक्या कमी वेळात तयारी होऊनही बाकी च्यान पेक्षा(जवळचे ओळखीचे शर्यतीत असलेले) जास्त च होते,त्यामुळे ते खूषच होते..ह्या वेळी हि पुणे राऊंड झालाच पण मार्क्स कमी होते..शासकीय कॉलेज मिळाले नाही..खाजगी चांगले मिळत होते पण पैसे??? मग उरला पर्याय कराड आणि सांगली..त्या वेळी मात्र मला म्हणाले..कराड किंवा सांगली कॉलेज मिळाले तर इंजिनीरिंग नाहीतर आपण Bsc ऍग्री किंवा Bsc करू..मला काहीच फरक पडत नव्हता...मला Bsc च करायचा होतं कारण कोल्हापूर मध्ये राहता आलं असता..पण नशीब म्हणा किंवा त्यांची प्रबळ इच्छा, कराड ला इलेक्ट्रिकल साठी नाव आलं...मग काय स्वारी ज्याम खुश..पैश्यांची सोय केली होती आधीच..पण इतक्या सहज नव्हतं काही होणार..बहिणीच्या मुलाचे बारसं आलं,आजी ला लकवा मारला..सारी रक्कम त्यात गेली...शेवटी एका जिवलग अधिकाऱ्याने मदत
केली..पैसे जमा झाले..प्रवेश घेण्यासाठी फक्त २ न च दिवस उरले होते..कॉलेज या आदी पहिल नव्हतं..आता बघायला वेळ हि नव्हता...लागलीच प्रवेश घ्यावा लागणार होतं...ज्या दिवशी आह्मी कराड ला जाणार..त्या आदल्या दिवशी खूप मोठा पाऊस झाला होता..रस्ते बंद होते,कोल्हापूर ला जायला नदी पार करायची होती,छाती पर्यंत पाणी रॊड वर होते..त्यातून आम्ही निघालो..एके हातात छत्री आणि एका हातात तुम्ही धरलेला माझा हात..अजूनही अंगावर काटा शहारतो तो प्रसंग आठवला तर..एका बापाची कहाणी..त्याची जिवा पाड चाललेली धडपड..पराकाष्टा..घरातील काही शिकलेल्या लोकांनी सल्ला दिला असताना..कशाला पैसे नसताना मुली ला शिकवतो..शेवटी लग्न होऊन जाणारच ना..तरीही जिद्द न सोडणारा..जीवाचं रान करून शिक्षण मिळवण्यासाठी धडपडणारा माझा बाप..१२ तास पावसात छत्र धरून माझा प्रवेश घेऊन गड जिंकणारा माझा सिंह होता तो..
कराड कॉलेज ला माझं शिक्षण चालू झालं..सुरवातीला जरा जड गेलं, पण रुळले मी..प्रत्येक वेळी सुट्टीला कोल्हापूर ला आले कि हॉटेल ला घेऊन जाणे...पोरगी चे जेवणाचे हाल होतात म्हणून चांगले जेवायला घालणे,,आई ला फोने करून सांगणे,,आम्ही दोघे आज बाहेरच जेवून येतो..हॉस्टेल च्या कॉइन बॉक्स वर रोज ५ वाजता न चुकता फोन करणे,कोल्हापूर वरून कोणी कराड ला जातंय हे समजलं कि खाऊ पाठवूंन देणे..इतकं सगळं करायचा पण कधीच चांगले मार्क्स मिळाले म्ह्णून तोंडावर कौतुक नाही..कायम म्हणायचा..अजून चांगले हवेत..उद्देश एकच..आणखी प्रगती व्हावी...पहिल्या वर्ष्याची २ री सेमिस्टर..३ दिवसच राहिले होते परीक्षा सुरु होण्यासाठी...गाव ची माही (जत्रा )होती. खूप मोठी,बऱ्याच वर्ष्यानी..एकत्र कुटुंब असल्याने सर्व मंडळी जमा झाली होती..फक्त मीच
नव्हते..कुणी मला सांगितले हि नाही..कारण माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही..दररोज येणारा ५ चा फ़ोन मला आदल्या दिवशी आला नव्हता..मन सैरभैर झालं होतं..का बर्र मला फ़ोन आला नसेल..सकाळ पासून कश्यातच लक्ष्य लागत नवतं..अभ्यास चालू असताना झोप येत होती..शेवटी रूम वर जाऊन जोपले..अस्सं कधीच झालं नव्हतं..थोड्या वेळाने मला जीप न्यायला आली..वडील दवाखान्यात आहेत म्हणून तुला बोलावलं आहे असं सांगितलं..पण मला समजलं होतं..काहीतरी खूप मोठं झालंय..स्वतः लाच धीर देत होते..१ तासाचा प्रवास आज संपावा असं वाटत नवतं..सत्य पचवता येईल का माहित नव्हतं...मना ला समजावत होते..दुसरं काहीतरी झालं असेल..आज्जी गेली असेल..वाहनचालक आहेत,कार अपघात झाला असेल.. पण मनात निर्धार केला होता, काही झालं तरी परीक्षा द्यायची कारण ज्यांनी आता पर्यंत जीवाच रान केलं त्यांना हरताना मला पाहायचा नव्हतं...तुला शेवटचं पाहिलं आणि तुटून पडले ..कुणालाही जाणीव न होऊ देता जागच्या जागी प्राणज्योत मालवली..आज १४ वर्षे झाली पण एक हि आठवण पुसली नाही..कधी बोलले नाही कि कुणासमोर काही शब्द हि नाही..तू दिलेल्या वाटेवर चालत राहिले..तुज्या नंतर कुटूंबाचा आधार बनले..तू दिलेस त्याने आयुष्य सुंदर झाले..तुझ्या कष्टामुळे आज मी जर्मनीत आहे आणि कमवू शकते,एक अतिशय चांगलं जीवन जगते आहे... त्या दूरदृष्टी ला प्रयत्नांना,प्रेमाला,दृढनिश्चयी ,त्यागी स्वभावाला माझा सलाम..म्हणूनच खालील बोल मला कायम तुझी आठवण करून देतात.
साद हि घालते, लाडकी तुला
जगण्या तू दिला
माझ्या जीवा अर्थ खरा
बाबा.. थांब ना रे तू
बाबा.. जाऊ नको दूर
बाबा..
दैव होता तू, देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणी होती मी, वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू
आज तू फेडू दे, सारे पांग मला
जगण्या रे मला अजुनही तूच हवा
बाबा..
By
Yogita Desai
No comments:
Post a Comment